टकळीचा उपयोग सूतकताईसाठी कित्येक हजार वष्रे केला जात होता; परंतु टकळीवर सूत कातणे हे खूपच श्रमाचे व जिकिरीचे काम होते. टकळीवर कातल्या जाणाऱ्या सुताची लांबीही मर्यादित असे. याशिवाय ही टकळीच्या गतीला मर्यादा असल्याने या प्रक्रियेची उत्पादन क्षमता फारच कमी होती. टकळीला पर्याय शोधण्याचे काम सतत सुरू होते. या शोधाला ११व्या शतकात फळ आले आणि सूतकताईसाठी चरखा विकसित झाला. इतर देशांमध्ये या यंत्राला ‘सूतकताईचे चक्र’ (स्पििनग व्हील) असे संबोधले जात असे. भारतात याला चरखा असे नाव पडले.
बगदाद (इ.स. १२३७), चीन (इ.स. १२७०), युरोप (इ.स. १२८०) येथे सूतकताई चक्राचा उपयोग होत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. भारतात वापरला जाणारा चरखा सूतकताई चक्राचा एक सर्वात जुने उदाहरण आहे. चरख्याला जगात ‘इंडियन स्पीिनग व्हील’ या नावाने ओळखले जाते. चरखा हा शब्द पíशयन भाषेतील चरख (चाक) या शब्दावरून आला असावा.
चरखा हा भारतामध्ये फक्त एक सूतकताईचे साधनच राहिला नाही तर महात्मा गांधींमुळे तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रतीक बनला. महात्मा गांधींनी त्याच्या शिकवणीतून चरख्याचा वापर सर्वदूर पसरविला. चरखा हा लोकांना स्वयंपूर्ण व स्वतंत्र बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल अशी गांधीजींची खात्री होती. चरख्यावर सूत काढून त्यापासून बनविलेल्या खादीच्या कापडाचे कपडे वापरण्याचा संदेश गांधीजींनी लोकांना दिला. ते स्वत: रोज चरख्यावर नियमितपणे सूत काढत असत.
कापूस किंवा तत्सम आखूड तंतूंपासून सूत कातण्यापूर्वी या तंतूंमध्ये मिसळलेला कचरा, इतर विजातीय पदार्थ काढून टाकून तंतूंची स्वच्छता करावी लागते. तंतू िपजावे लागतात. सूतकताईच्या प्रक्रियेमधील ‘िपजण व स्वच्छता’ (ओपिनग अँड क्लििनग) ही पहिली प्रक्रिया होय. तंतू िपजून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून पेळू तयार करावा लागतो. या पेळूची जाडी हळूहळू कमी करून सूत कातण्यायोग्य अशी करावी लागते. कमी जाडीच्या अशा पेळूस ‘वात’ म्हटले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा