– डॉ. निधी पटवर्धन nidheepatwardhan@gmail.com

‘‘बच्चा, हे होमवर्क फिनिश केलं नाहीस तर मी तुला पनिश करेन.’’, ‘‘सॉरी ममा, पण पहिलं मला लर्न करू दे. नंतर मी हे राइट करते, प्रॉमिस, पक्कावाला’’ हे संवाद अगदी सहज मराठी घराघरांत ऐकू यायला लागलेले आहेत. छोटय़ांची ही तऱ्हा तर मोठय़ांची आणखी वेगळी. ‘लेट झाला’, ‘कॉल मिस झाले’, ‘मिस यू डिअर’, ‘एन्जॉय कर, डोन्ट वरी’, ‘ट्राय आऊट तर करायला पाहिजे यार’,  ‘प्लीज’, ‘सॉरी’, ‘थँक्यू’सतत म्हणायला आम्ही सरावलो आहोत. व्यक्त होते ती व्यक्ती आणि ज्या पद्धतीने व्यक्त होते ते अभिव्यक्ती! मग आमची अभिव्यक्ती परभाषेतून व्यक्त का व्हावी? त्याची कारणे काय? परभाषेतून आलेल्या या शब्दांचं आदान आम्ही किती आणि कसं घ्यायला हवं?  कोणत्याही भाषेची वाढ होण्यामध्ये इतर भाषांचे साहचर्य, प्रभाव यांचा हातभार लागत असतोच. मराठीनेही वेळोवेळी संस्कृतसह अरबी, फारसी, इंग्रजी अशा अनेक भाषांकडून काही शब्द तसेच्यातसे घेऊन तर काहींना मराठी अंगडी-टोपडी घालून आपलेसे केले आहे. एखाद्या भाषारूपी नदीने इतर भाषांचे प्रवाह स्वत:मध्ये सामावून स्वत:ला विशाल करणे वेगळे आणि इतर प्रवाहांच्या लोंढय़ापुढे स्वत:चे अस्तित्वच गमावणे वेगळे. मराठीतून सोपे अर्थवाही शब्द वापरणं, त्याची सवय स्वत: करणं नंतर दुसऱ्याला लावणं, समाजाचा कान चांगला तयार करणं, ही जबाबदारी आपलीच आहे आणि आपणच ती पार पाडायची आहे. म्हणूनच रोजच्या वापरातल्या परभाषेतील शब्दांऐवजी वापरता येण्याजोग्या जुन्या-नव्या मराठी धाटणीच्या शब्दांवर चर्चा करणे, काही शब्द सुचवणे आणि यानिमित्ताने नव्या शब्दघडणीवर काही मंथन करणे हा या सदराचा हेतू असणार आहे. अर्थात, यामध्ये वाचकांच्या प्रतिक्रिया आणि सूचना मोलाच्या असणार आहेत. कारण आपण सगळे मिळूनच हे शब्द स्वीकारणार आणि वापरणार आहोत. यात आम्ही सुचवलेले शब्दच योग्य असतील असा आमचा दावा मुळीच नसेल. तसेच काही शब्द इतर काही शब्दविषयक चर्चागटांमध्ये येऊन गेलेही असू शकतील. कदाचित वाचक नवे शब्द सुचवतील. सदर लेखिका मी व वैशाली पेंडसे-कार्लेकर आम्हा दोघींची भूमिका नेहमीच स्वीकारशील असेल. भेटू या मग दर आठवडय़ाला.

Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Oxford University picks brain rot as word of the year
अग्रलेख : भाषेची तहान…
pratap jadhav
“आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य, पंख छाटण्याचा हा प्रकार…”, ‘या’ नेत्याची खासदार व आमदाराच्या वादात उडी
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
finding development option
तथाकथित विकासाला पर्याय शोधण्याचा ‘वेडेपणा’ करायलाच हवा…
Story img Loader