रंग, रूप, आकार, वजन, शरीराची ठेवण या गुणांवरून कोंबडय़ांच्या जाती ठरवण्यात येतात. उपयुक्ततेनुसार या जातींचे वर्गीकरण जास्त अंडी देण्याची क्षमता, जलद वाढ, खाद्याचे रूपांतर मांसात करण्याची क्षमता इत्यादी बाबींवर केलेले आहे.
जास्त अंडी देणाऱ्या कोंबडय़ांच्या महत्त्वाच्या दोन जाती आहेत. अ) व्हाइट लेगहॉर्न ब)ब्लॅक मिनॉर्का.
अ) व्हाइट लेगहॉर्न : इटलीतील लेगहॉर्न हे गाव या जातीचे मूळ आहे. या कोंबडय़ा पांढऱ्याशुभ्र, भारी चपळ व दीड ते पावणेदोन किलो वजनाच्या असतात. यांना खाद्य कमी लागते, पण त्या अंडी जास्त देतात (वर्षांला २८०-३३०). अंडय़ासाठी त्या जगात सर्वोत्कृष्ट आहेत. त्या पांढऱ्या रंगाची अंडी देतात. यांच्या डोक्यावर लाल रंगाचा मोठा तुरा असतो. कानाची पाळी पांढऱ्या रंगाची असते. पायावरील कातडीचा रंग पिवळा असतो. या जातीतून निवड पद्धतीने काही उपजाती व व्यावसायिक सहजाती तयार केलेल्या आहेत. उदा. व्हेनकॉब-३००. व्यावसायिक जातीची निवड आपल्या वातावरणाप्रमाणे तसेच व्यवसाय योग्यतेप्रमाणे करण्यात येते.
ब) ब्लॅक मिनॉर्का : या कोंबडय़ा आकाराने लहान असतात. रंग काळा, तुरा लाल व कानाची पाळी पांढरी असते. त्या पांढरी अंडी देतात. साधारणत: २५०-२८० अंडी वर्षांला त्यांच्यापासून मिळतात.
मांसासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या कोंबडय़ांच्या महत्त्वाच्या जाती आहेत- अ) व्हाइट फ्लाय माऊथ रॉक ब) रेड कॉनिश.
अ) व्हाइट फ्लाय माऊथ रॉक : यांच्या शरीरावर काळे व पांढरे पट्टे असलेले पंख असतात. वजनाने भारी असल्यामुळे मांसासाठी ही जात जगप्रसिद्ध आहे. ब्रॉयलर पक्षी या जातीपासून निर्माण केले आहेत.
ब) रेड कॉनिश : यांचे डोळे मोठे असतात. त्यांचा उपयोग संकरित पक्षी तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर होतो. यामध्ये निळ्या व हिरव्या रंगांचे मिश्रण मुख्यत्वे सापडते. त्यावर तपकिरी रंगाची झालर असते. कानाची पाळी लाल रंगाची असते. मांसासाठी त्या जगात प्रसिद्ध आहेत. नराचे वजन साडेतीन किलो, तर मादीचे अडीच किलो असते. या कोंबडय़ा वर्षांतून फक्त १६०-१८० अंडी देतात.
कुतूहल – कोंबडय़ांच्या जाती- १
रंग, रूप, आकार, वजन, शरीराची ठेवण या गुणांवरून कोंबडय़ांच्या जाती ठरवण्यात येतात. उपयुक्ततेनुसार या जातींचे वर्गीकरण जास्त अंडी देण्याची क्षमता,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of chicken