डॉ. आदिती पंत या अंटाक्र्टिका खंडावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समुद्रवैज्ञानिक आहेत. १९८३ मध्ये प्रदीप्त सेनगुप्ता या भूगर्भशास्त्रज्ञाबरोबर इंडियन अंटाक्र्टिक कार्यक्रमांतर्गत त्यांनी अंटाक्र्टिकाला जाऊन विशेष अभ्यास केला. आप्पासाहेब पंत या भारत सरकारच्या राजनैतिक उच्चयुक्तांची कन्या असलेल्या आदिती यांचा जन्म ५ जुलै १९४३ रोजी नागपूर येथे झाला. त्यांची आई वैद्यकीय डॉक्टर होती. तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. केल्यावर ‘अॅलिस्टर हार्डी’ यांचे ‘ओपन सी’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले, तेव्हाच समुद्रविज्ञानात करिअर करायचे त्यांनी ठरवले. अमेरिकेतील हवाई विद्यापीठात समुद्र विज्ञानपदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. येथे त्यांनी सूर्यप्रकाशाची उपलब्धता आणि त्याचा प्लवकांच्या
समुदायात घडणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होणारा परिणाम या विषयावर प्रबंध लिहिला.

लंडन विद्यापीठाच्या वेस्टफिल्ड महाविद्यालयातून त्यांनी समुद्र शैवालांच्या शरीरक्रियाशास्त्रावर पीएच.डी. केले. त्यानंतर त्यांनी भारतातील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत (एन.आय.ओ.) १७ वर्षे काम केले. त्या वेळी अंटाक्र्टिक समुद्राचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे कार्यक्रम राबवले जात. नंतर त्या पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये संशोधन करू लागल्या. अन्नसाखळीमधील काही ठरावीक क्षार-प्रेमी सजीवांच्या विकरांवर त्यांनी संशोधन केले. २००३ ते २००७ या काळात पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात त्या मानद प्राध्यापक झाल्या.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

डिसेंबर १९८३ ते मार्च १९८४ या चार महिन्यांत डॉ. आदिती यांनी अंटाक्र्टिका खंडावरील अन्नसाखळीचा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. तेथील अतिशय खडतर हवामानात ‘दक्षिण गंगोत्री’ या अंटाक्र्टिकावरील पहिल्या भारतीय शास्त्रीय संशोधन स्थानकात राहून त्यांनी समुद्रविज्ञान आणि भूगर्भशास्त्र या विषयांत भरीव संशोधन केले.

त्यांना एकूण पाच स्वामित्वहक्क (पेटंट्स) मिळाले असून त्यांचे ६७ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारत सरकारने त्यांना ‘अंटाक्र्टिक अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले आहे. एन. के. पणिक्कर या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या आणि सीएसआयआर संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आदिती पंत यांनी समुद्रविज्ञानात भरारी घेतली. भारताच्या वेरावळ ते कन्याकुमारीपर्यंतचा पश्चिम किनारा तसेच मन्नारचे आखात अशा भागांचा सागरी अभ्यास करताना त्यांनी यशस्वी महिला समुद्रवैज्ञानिक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.
(डॉ. आदिती पंत)

Story img Loader