दिलेले लाकूड, मनुष्यबळ व वेळ अशा संसाधनांच्या मर्यादेत राहून किती खुर्च्या आणि कपाटे तयार करावीत ज्यामुळे कमाल नफा मिळेल असे प्रश्न व्यवस्थापकाला पडतात. अमेरिकेच्या वायुसेनेसाठी त्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी रेषीय प्रायोजन (लिनिअर प्रोग्रामिंग) हे व्यापक गणिती प्रारूप १९४७ साली मांडले गेले. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ‘सिम्प्लेक्स पद्धत’ विकसित करण्यात आली, जी संगणक वापरासाठीही चपखल आहे. सदर पद्धतीत उत्तर मिळण्यासाठी लागणारा वेळ खुर्च्या आणि कपाटे यांसारख्या निर्णय घेण्याच्या चलांच्या संख्येवर अवलंबून असतो. मात्र प्रचंड संख्येत चल असलेले महाकाय रेषीय प्रायोजन प्रारूप सोडवण्यासाठी सिम्प्लेक्स पद्धत संगणकावरही दीर्घ काळ घेते. टेलिफोन्सच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या जाळ्याचा इष्टतम वापर किंवा आंतरराष्ट्रीय विमान सेवा आखताना असे प्रश्न पडतात. त्यामुळे मूळचे भारतीय अभियंता व गणितज्ञ डॉ. नरेंद्र करमरकर यांनी त्यासाठी एक सर्वस्वी नवी गणिती पद्धत विकसित केली. ती ‘करमरकर रीत (अल्गोरिदम)’ म्हणून जगप्रसिद्ध झाली. तिचा वापर अनेक उद्योग व सेवा क्षेत्रांमध्ये कळीचा ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा