पायथॅगोरसचा सिद्धांत हा गणिताच्या इतिहासातला मलाचा दगड मानला जातो. मात्र पायथॅगोरसच्या शेकडो वर्षे आधीपासून जगभरच्या विविध संस्कृतींना हा सिद्धांत ज्ञात होता. या सिद्धांताच्या उपलब्ध असलेल्या, तीनशेहून अधिक सिद्धांतांत पायथॅगोरसच्या नंतर, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या युक्लिड या महान ग्रीक गणितज्ञाच्या सिद्धतेचाही समावेश आहे. युक्लिडने ‘एलिमेंट्स’ या आपल्या ग्रंथात ही सिद्धता दिली आहे. पायथॅगोरसच्या सिद्धांताचे विधान विचारल्यावर ‘क वर्ग बरोबर अ वर्ग अधिक ब वर्ग’ असे आपण बोलून जातो. परंतु पायथॅगोरसच्या काळात ही बीजगणिती भाषा जन्मालाच आली नव्हती. त्यामुळे युक्लिडचे विधान ‘काटकोन त्रिकोणात, कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतके असते’ असे क्षेत्रफळांच्या भाषेत दिले आहे. युक्लिडच्या सिद्धतेत काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौरस दोन आयतांमध्ये विभागला असून, या प्रत्येक आयताचे क्षेत्रफळ अनुक्रमे इतर दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळाइतके असल्याचे दाखवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा