तुरळक देश वगळता दहशतवादामुळे अनेक देशांवर परिणाम होत असताना हल्ली आढळतो. पण अशा देशांना त्याची झळ कितपत लागलेली आहे, हे समजत नाही. याचे मोजमापन करण्याचे काम ‘इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीस’ ही स्वयंसेवी संस्था करते. अमेरिकतील मॅरिलॅण्ड विद्यापीठात अद्ययावत असलेल्या जागतिक दहशतवादाच्या घटनांचा माहितीसाठा या कामी वापरला जातो.

या संदर्भात वरील संस्थेने २०१२, २०१४, २०१५ आणि २०१६ साली अहवाल प्रसिद्ध केले आहेत. सदर अहवालात मागील १० ते १५ वर्षांत दहशतवादाचे घडलेले परिणाम म्हणजे जीवितहानी, वित्तीय नुकसान, त्यांचा कल, दहशतवादी संघटना, त्यांची कार्यपद्धती आणि इतर बरीच उपयोगी माहिती दिली जाते.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?

‘धमकावून किंवा प्रत्यक्षपणे अवैध बळ आणि िहसेने कुठल्याही अवैधानिक संघटनेने राजकीय, आíथक, धार्मिक किंवा सामाजिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जरब, बळजबरी किंवा भिववणे यांचा वापर करणे म्हणजे दहशतवाद,’ अशी दहशतवादाची परिभाषा केलेली आहे.  या संस्थेने ‘जागतिक दहशतवाद निर्देशांक’ विकसित केला आहे. दहशतवादी घटनांच्या परिणामांनुसार देशांना क्रमवारी दिली जाते. तत्त्वत: दहशतवादाची व्याप्ती व प्रभाव समजणे आणि मोजणे, हे या निर्देशांकाचे उद्देश आहे. त्याचे चार घटक आहेत, १. वर्षभरात घडलेल्या एकूण दहशतवादी घटना, २. वर्षभरात दहशतवादामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या,  ३. वर्षभरात दहशतवादामुळे झालेल्या एकूण जखमींची संख्या, ४. वर्षभरात दहशतवादामुळे झालेले स्थावर मालमत्तेचे नुकसान.

वरील घटकांच्या आकडेवारीवर गणिती प्रक्रिया करून ० ते १० मधील संख्येत एक संयुक्त दहशतवाद निर्देशांक प्रत्येक देशासाठी काढला जातो. २०१६ सालच्या यादीत निर्देशांकाप्रमाणे दहशतवादबाधित झालेले पहिले १२ देश उतरत्या क्रमाने असे आहेत :

इराक- ९.९६०, अफगाणिस्तान- ९.४४४, नायजेरिया- ९.३१४, पाकिस्तान- ८.६१३, सीरिया- ८.५८७, येमेन- ८.०७६, सोमालिया- ७.५४८, भारत- ७.४८४, इजिप्त- ७.३२८, लिबिया- ७.२८३, युक्रेन- ७.१३२ आणि फिलिपाइन्स- ७.०९८.

कमी-अधिक तीव्रतेने २०१६ साली जगातील १६३ पकी १२९ देश दहशतवादबाधित झालेले आढळतात. मात्र त्यातील ३६ देशांचा दहशतवाद निर्देशांक एकपेक्षा कमी आहे आणि उल्लेखनीय म्हणजे ३४ देशांचा दहशतवाद निर्देशांक शून्य आहे.  तथापि २००० साली दहशतवादाने जगात सुमारे २,००० तर २०१५ मध्ये १२,५०० नागरिकांचा बळी घेतला होता; हे चिंतेचे कारण आहे. भारतात दहशतवादामुळे २००० ते २०१५ दरम्यान एकूण ७,८३५ लोक मृत्युमुखी पडले, असे दिसून येते. या मोजमापनामुळे दहशतवादाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी बरेच मार्गदर्शन मिळते.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

सुभाष मुखोपाध्याय : सन्मान

As day is Breaking या नावाचा सुभाष मुखोपाध्याय यांच्या निवडक कवितांचा अंजन बसू यांनी इंग्रजीत अनुवाद केलेला संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित झाला आहे. पूर्व युरोप, रशिया, जर्मनी, इंग्लंड, जपान, इजिप्त, फ्रान्स इ. देशांचे सदिच्छा दौरे त्यांनी केले, तेव्हा तेथील सामाजिक, राजकीय, जीवनाचे निरीक्षणही केले. त्यांच्या काव्य लेखनाविषयी त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले होते, खरं तर कवी हा त्याच्या तारुण्यातच उत्कृष्ट आणि खळाळतं काव्य देऊ शकतो. काही काळानंतर त्याच्या काव्यात धाडस, नावीन्य शिल्लक राहत नाही. फक्त काव्यलेखन चालू असतं इतकंच.. माझ्या कोणत्याच कवितेमुळे मला पुरेपूर समाधान लाभलेलं नाही. एकदा कविता लिहून झाली की, मी परत तिच्याकडे वळून बघायचे टाळतो. कारण तसं केलं तर मी अस्वस्थ होईन. आणि तीच कविता मी पुन्हा वेगळ्या तऱ्हेने लिहून काढेन. पण ते करणंही शक्य नसतं.. ‘जीवन म्हणजे रोजचा उत्सव, बाकी सारा निव्वळ भ्रम..’

५० वर्षांहून जास्त काळ त्यांनी कवितालेखन केलं. त्यांच्या कवितेतून मानवतेविषयी आपुलकी असणारे भावुक हृदय आपल्याला भेटत राहते. देशविदेशात अनेकवेळा साहित्यिक कारणासाठी प्रवास करणारे सुभाषदा आपल्या देशातील अत्यंत लोकप्रिय कवींपैकी एक आहेत. जनकवी आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९६४ मध्ये ‘जत दूरेई जाम’ (काव्यसंग्रह) साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९७७- आफ्रो आशियाई लोटस पुरस्कार. १९८२- कुमारन आशान् पुरस्कार. १९८२- मिझरे तुर्सन झेंडे प्राइज (रशिया), १९८७- कबीर सन्मान पुरस्कार, १९९१- आनंद पुरस्कार आणि सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार, १९९१- ज्ञानपीठ पुरस्कार, २००३- पद्मभूषण विश्वभारती शांतिनिकेतन विद्यापीठाने त्यांना सन्माननीय देशिकोत्तम ही पदवी प्रदान केली. साहित्य अकादमीने (नवी दिल्ली) १९९२ मध्ये अधिछात्र (फेलो) म्हणून त्यांची नेमणूक केली.त्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २००९ मध्ये सियाल्दा एक्स्प्रेसचे नामकरण ‘पदातिक एक्स्प्रेस’ असे करण्यात आले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

Story img Loader