पिकांच्या मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या पाण्याच्या फक्त एक टक्का पाणी पिकांच्या पेशीत साठवले जाते. वनस्पतीच्या पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाला बाष्पोच्छवास म्हणतात. याचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग सापडला, तर पिकांची पाण्याची गरज कमी होईल, दुष्काळी भागात तर याचे महत्त्व खूप असेल.
झाडातून होणारे बाष्पीभवन तीन प्रकारच्या घटकांवर अवलंबून असते. (१) हवामान व पर्यावरणीय घटक (सूर्यप्रकाश, आद्र्रता, तापमान, वारा) (२) झाडाचे शरीरशास्त्र घटक (पर्णरंध्रे, त्यांची उघडझाप, पानांची संख्या, मुळांची खोली, कॅनॉपी) (३) सिंचन पद्धती, वाऱ्याचा प्रतिरोध, खते हे बाष्पीभवन कमी करण्यासाठी नको असलेल्या वनस्पती काढून टाकणे, अनुत्पादक पानांची संख्या कमी करणे, काचघर, पॉलिथिन हाउस वापरून पिकांची वाढ करणे, वाऱ्याच्या दिशेने उंच झाडे लावणे या पद्धतींचा वापर करतात.
पॉलिथिन हाउस खूप खíचक असले तरी त्यामुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणात बचत होते. या रचनेमध्ये हवामान व पर्यावरणीय घटक यांचा विचार केला आहे.
दुसऱ्या प्रकारच्या घटकांचा विचार करताना, ज्या पिकांच्या जाती कमी बाष्पोच्छवास करतील अशा जाती निर्माण करणे हा मार्ग वापरू शकतो. सूर्यकिरणे पानावर पडल्याने बाष्पीभवन होते. त्यांना परावर्तित करणारी द्रव्ये पानावर फवारली तर पानाचे तपमान कमी होते. त्यामुळे पानावाटे होणारा बाष्पोच्छवास कमी होतो. ही द्रव्ये पर्णरंध्रे बंद करीत नाहीत. तसेच प्राणवायू व कर्बवायूच्या आदानप्रदानात अडथळे आणत नाहीत. बाष्पोच्छवासरोधक द्रव्ये वापरूनही पाण्याचा अपव्यय कमी करता येतो. या द्रव्यांवर सध्या संशोधन सुरू आहे. पर्णरंध्रे बंद करणारी किंवा त्यावर फिल्मसारखे आवरण निर्माण करणारी द्रव्येही उपलब्ध आहेत. या द्रव्यांची किंमत, त्यांचे सूर्यप्रकाशामुळे, सूक्ष्मजीवाणूंमुळे होणारे विघटन, पिकांच्या चयापचयात निर्माण होणारा अडथळा यांचा विचार करूनच या द्रव्यांचा वापर करावा लागतो.
तिसऱ्या प्रकारचे घटक विचारात घेताना, सिंचनाच्या प्रवाही पद्धतीत ठिबकपेक्षा जास्त बाष्पीभवन होणार, म्हणून पाणी मुळाशी देण्याचा विचार करतात. मातीचे नळकांडे भूमिगत करून हे साध्य करता येते.
कुतूहल – वनस्पतीतील बाष्पीभवन
पिकांच्या मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या पाण्याच्या फक्त एक टक्का पाणी पिकांच्या पेशीत साठवले जाते. वनस्पतीच्या पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाला बाष्पोच्छवास म्हणतात. याचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग सापडला, तर पिकांची पाण्याची गरज कमी होईल, दुष्काळी भागात तर याचे महत्त्व खूप असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-03-2013 at 04:25 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evaporate of plants