विंचेजो कॅस्चिरोलो याला इटलीतील बोलोग्ना (बोलोन्या) या शहराजवळ ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या खडकातून काहीसे वेगळे खडे मिळाले. या खडय़ांना लाल होईपर्यंत उष्णता दिली असता त्यातून प्रकाश बाहेर पडत असे. हे खडे नंतर बोलोग्ना-स्टोन म्हणून ओळखले जाऊ लागले. कार्ल शीलला या बोलोग्ना खडय़ांविषयी कुतूहल निर्माण झाले. १७७४ मध्ये कार्ल शीलला हे खडे एखाद्या मूलद्रव्याचे सल्फेट असल्याचे आढळले, पण त्यातून बेरिअम वेगळे करता आले नाही. सर हम्फ्री डेव्ही यांनी १८०८ मध्ये बेरिअम हायड्रॉक्साइडच्या विद्युत अपघटनाने शुद्ध स्वरूपात बेरिअम धातू मिळवला.

बेरिअमचे आवर्त सारणीतील स्थान सहाव्या आवर्तनात आणि अल्कधर्मी मृदाधातू गुणधर्म असलेल्या दुसऱ्या गणात आहे. या गणातील मूलद्रव्ये भूपृष्ठावरील मातीत सापडतात, म्हणून त्यांना मृदाधातू म्हणतात. बेरिअम हे अत्यंत क्रियाशील मूलद्रव्य आहे, त्यामुळे निसर्गात संयुगाच्या अवस्थेत सापडते.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
Surya Nakshatra Gochar 2024 | sun transit in Purva Phalguni Nakshatra
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशींना होणार अपार धनलाभ, सूर्यासारखं चमकणार नशीब

बेरिअम मृदू धातू असून त्याचा शुद्ध स्थितीतील रंग पिवळसर चंदेरी असतो. क्रियाशीलतेमुळे हवेतील ऑक्सिजनशी तो चटकन संयोग पावतो आणि काळ्या रंगाचा बेरिअम ऑक्साइड तयार होतो. ही प्रक्रिया फक्त पृष्ठभागावरच होत असल्याने पृष्ठभागाच्या आतील धातूचे ऑक्साइडमध्ये रूपांतर होत नाही. आतले थर शुद्ध बेरिअमच राहतात.

हवेतील ऑक्सिजनचा संपर्क तुटावा म्हणून बेरिअम रॉकेलमध्ये ठेवतात. पाण्याशी अभिक्रिया होत असल्याने पाण्यात साठवता येत नाही. पाण्याशी अभिक्रिया होऊन बेरिअम हायड्रॉक्साइड तयार होऊन हायड्रोजन वायू मिळतो, या अभिक्रियेत उष्णता निर्माण होते. विद्युत सुवाहकता हा धातूंचा गुणधर्म आहे. बेरिअम त्याला अपवाद नाही. बेरिअमचा वितलनांक ७३० अंश सेल्सिअस तर उत्कलनांक १९०० अंश सेल्सिअस आहे.

बेरिअम नायट्रेट हिरव्या अथवा फिकट हिरव्या ज्योतीने जळते म्हणून हे संयुग आतषबाजी करण्याकरता फटाक्यात वापरतात. बेरिअम आणि बेरिअमची संयुगे विषारी असली तरी बेरिअम सल्फेटचा वापर औषधांमध्ये केला जातो. पचनसंस्थेतील दोष शोधण्याकरता बेरिअम सल्फेटचा वापर करतात. उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये बेरिअम काबरेनेट वापरतात.

दूरचित्रवाणी संचातील पिक्चर टय़ूबमधील अनावश्यक वायू बाहेर काढण्यासाठी बेरिअम किंवा बेरिअमच्या संमिश्रांचा वापर करतात. रंगांमध्ये तसे काच उद्योगातही बेरीअमचे संयुग वापरले जाते.

– शरद पुराणिक, मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org