वनस्पतींच्या संकरित जाती हा आधुनिक शेतीतला महत्त्वाचा भाग आहे. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी संकरित जातींचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. पण या संकरित जातींचं मूळ एकोणिसाव्या शतकातील ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केलेल्या संशोधनात आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
प्राणी असो अथवा वनस्पती, त्यांच्यातील गुणधर्म पुढील पिढीत कसे संक्रमित होतात, हे शोधून काढणं त्या वेळी महत्त्वाचं पण खूप आव्हानात्मक होतं. मागील पिढीकडून पुढील पिढीकडे होणारी गुणधर्माच्या संक्रमणाची प्रक्रिया सर्वात प्रथम शोधणारे शास्त्रज्ञ ग्रेगर जोहान मेंडेल होत. त्यामुळे त्यांना ‘फादर ऑफ जेनेटिक्स’ असं संबोधलं जातं. पूर्वी ऑस्ट्रिया देशाचा भाग असलेल्या आणि आता चेक रिपब्लिकमध्ये समाविष्ट झालेल्या एका खेडय़ात, एका बागायतदाराच्या कुटुंबात ग्रेगर मेंडेल यांचा जन्म झाला.
एका चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून नेमणूक झाल्यावर चर्चच्या कामातून मिळणाऱ्या फावल्या वेळेत मेंडेलने तिथल्या बागेत वाटाण्याच्या वेलींवर प्रयोग करायला सुरुवात केली. वाटाण्याच्या वेलींवर केलेले प्रयोग आणि या प्रयोगांचे आनुवंशिकतेच्या दृष्टीने मिळालेले निष्कर्ष १८८५ साली त्यांनी प्रसिद्ध केले.
पण त्यांचे हे विचार काळाच्या इतके पुढे होते की, त्या वेळच्या शास्त्रज्ञांना ते अजिबात पटले नाहीत. त्यांनी मेंडेल यांच्या संशोधनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे मेंडेल प्रचंड निराश झाले.
चर्चच्या प्रमुख पदावर नेमणूक झाल्यानंतर मेंडेल यांना या प्रयोगांकडे लक्ष देणं शक्य झालं नाही. १८८४ साली जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते शास्त्रज्ञ म्हणून जगाला पूर्णपणे अपरिचित होते. १९०० साली त्यांनी प्रसिद्ध केलेलं संशोधन कार्य हॉलंडचे ह्यूगो डी व्हाइस, जर्मनीचे कार्ल कॉरेन्स आणि ऑस्ट्रियाचे एरिक व्हॉन टेशमार्क या तीन शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे अभ्यासलं आणि मेंडेल यांना त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचं श्रेय दिलं गेलं. पुढे हे संशोधन ‘मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम’ या नावाने प्रसिद्ध झालं आणि आधुनिक जनुक/अनुवंश शास्त्राचा पाया ठरलं. पण आपल्या हयातीमध्ये आपल्या कामाची दखल घेतली गेली नाही, हे शल्य उरात घेऊनच मेंडेल यांनी या जगाचा निरोप घेतला.
– प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वॉर अँड पीस : जखमा : भाग -२
जखमा या विकारामागे प्रामुख्याने चार प्रकारची कारणे असतात. घात, अपघात, पडणे, कापणे, मार लागणे, विषारी जनावरांचे, कुत्री, घोडा, शेळी इ. यांच्या आघातामुळे होणाऱ्या आगंतुक जखमा. मधुमेह, महारोग, क्षुद्रकुष्ठ, वाहते इसब, नायटा, काँग्रेस गवताची अॅलर्जी, शीतपित्त असे रोग. काही वेळा अन्य विकारांकरिता केलेल्या औषधोपचारांमुळे उत्पन्न झालेल्या जखमा; उदा. रुईची पाने, जमालगोटा, बिब्बा, बावची यांच्या लेपामुळे व्रण निर्माण होणे. शरीरात कफ वा पित्त किंवा दोन्ही साठून सूज येऊन मग जखम तयार होणे.
आगंतुक घात आघाताची जखम सुरुवातीला सुसाध्य असते. याचे लहान-मोठे स्वरूप मूळ कारणांवर आहे. जखमेकडे दुर्लक्ष झाले की, रक्त जास्त वाहते, पांडुता येते. मधुमेह, महारोग विविध प्रकारचे प्रमेह विकार यांच्यामुळे होणाऱ्या जखमा म्हणजे मूळ रोगाकडे दुर्लक्ष. जखमा लवकर भरून न येणे. पुन:पुन्हा चिघळणे, पांढुरकेपणा या लक्षणांवर लक्ष असावे. सांध्याच्या दुखण्याकरिता गुडघ्यावर रुईची पाने बांधल्यास काहींना त्याची प्रतिक्रिया येऊन लस वाहते. काही रुग्णांना बिब्बा, बावची, जमालगोटा अशांच्या तेलातील दाहकता सहन होत नाही. प्रथम टपोरे फोड येतात. त्यात पाणी असते. नेमक्या उपचारांअभावी जखमा चिघळतात. कफदोष शरीरात मंदगतीने सावकाश वाढत असतो. सुरुवातीला रुग्णाचे कफदोषामुळे झालेल्या सुजेकडे दुर्लक्ष होते. कळत न कळत प्रथम छोटी जखम व नंतर त्याचे मोठय़ा व्रणात रूपांतर होते. कारण तेव्हा काही कारणांनी शरीरात पित्त व उष्णता वाढलेली असते. वेळीच योग्य उपचार केले तर जखम आटोक्यात येते.
बाह्य़ोपचाराकरिता जखमेचे शोधन व नेमके रोपण करावे लागते. जखमेत पूं, कफ व सूज यांचा भाग किती हे पाहावे. जखम बरी होणे म्हणजे सूज व जखमेतील ओलेपणा घालवून कोरडेपणा आणायचा असतो. वायू तत्त्वाचे आधिक्य निर्माण करणे हा उद्देश ठेवून बाह्य़ोपचार करावेत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..रणथंबोर
मधे हिच्या आग्रहावरून रणथंबोरला गेलो होतो. अरण्याच्या आजूबाजूला राहून मग गाडय़ा भाडय़ाने घेऊन भल्यापहाटे श्वापदांच्या दर्शनाला निघणे आणि मग परत आल्यावर वाघ दिसला तर तृप्त होणे, अस्वल दिसले तर समाधान मानणे आणि काहीच दिसले नाही तर निदान शेकडोंनी मोर बघितले असे म्हणून स्वत:ची समजूत घालणे असा प्रयोग असतो. आम्हाला दोन वाघ आणि एक कधी न दिसणारे अस्वल दिसले तेव्हा प्रवासाचा खर्च भागिले तीन असा हिशोब झाला असे मी म्हटल्यावर ही भडकली आणि मग शांत झाल्यावर म्हणाली, ‘‘माझ्या पुढच्या सगळ्या ट्रिप्स माझ्या मैत्रिणीबरोबर करणार आहे.’’ कर्मधर्मसंयोग असा की तेवढय़ात एक भली मोठी बस आली आणि त्यातून एक पुरुष आणि पन्नास बायका उतरल्या. सगळ्या इग्लंडमधल्या होत्या, पुरुषही तिथलाच. त्या उतरल्याबरोबर जे पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते ते संपल्यातच जमा झाले इतक्या ह्य़ा किलबिल करू लागल्या. रंगीबेरंगी कपडे घातलेल्या ह्य़ा सगळ्या साठीच्या पुढच्या होत्या. त्या दिवशीची दुपार भाकड असल्यामुळे आणि मी पुस्तकात डोके खुपसल्यामुळे ही संशोधनाच्या मोहिमेवर गेली आणि रात्री जेवताना म्हणाली रविन ह्य़ा सगळ्या widows आहेत. सगळ्या इंग्लंडमधल्या. (आपल्याकडे विधवा हा शब्द वापरत नाहीत जणू काही तो काहीतरी गुन्हा असावा.) माझ्या वैद्यकीय नजरेतून ह्य़ांच्यापैकी कितींना रक्तदाब, संधिवात आणि मधुमेह असेल ह्य़ाचे कोष्टक मी मांडले आणि हा ह्य़ांच्या बरोबरचा पुरुष मागच्या लेखातला बहुतेक वैद्यकीय ज्ञान असलेला व्यवस्थापक असणार हे मी ठरवले. ते खरे ठरले. हा Male nurse होता. Nurse म्हटले की ती बाई असते. जनुक आले की मग male nurse उगवतो. अशा पन्नास विधुर पुरुषांची सहल अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. गेलेच तर तिघेचौघे शिकारीला जातील. एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात बाटली असेच त्याचे स्वरूप असते. हल्ली शिकार बंद झाली आहे त्याची जागा ह्य़ा दृष्टिसुखाने घेतली आहे. आपण घरी शतपावल्या घालत आहोत आणि एकदम एखादा पशुपक्ष्यांचा थवा आपल्याला बघायला आला तर आपल्याला काय वाटेल असा विचार मनात येतो. शिकार करून भागला आणि वन संरक्षणाचा शहाणपणा सुचला असे हल्लीचे स्वरूप. ह्य़ा पन्नासमधली एक बाई आमच्या शेजारच्या खोलीत होती. तिला एक वाघीण दिसली होती. आम्हाला म्हणाली मी सात वर्षांची होते तेव्हापासून मला वाघ बघायचा होता. आता सत्तरी ओलांडली आणि मी धन्य झाले. आणि त्यातल्या त्यात वाघीण दिसली तिच्या दोन छाव्यांबरोबर. कधी एकदा परत जाते आणि मैत्रिणींना त्या छाव्यांबद्दल सांगते असे झाले आहे.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत : २५ फेब्रुवारी
१६०० > संतकवी आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत एकनाथ यांचे पैठण येथे देहावसान. भारूड या प्रकारातून आत्मबोध आणि मनोरंजन यांचा मेळ त्यांनी घातला. ‘चतु:श्लोकी भागवत’ हा नाथांचा पहिला ग्रंथ. त्याशिवाय ‘एकनाथी भागवत, रुक्मिणीस्वयंवर, भावार्थ रामायण, गीतासार आदी ग्रंथ त्यांनी लिहिले. तारखेने एकनाथ महाराजांची पुण्यतिथी २५ फेब्रुवारीस येत असली तरी ‘नाथषष्ठी’ ही शालिवाहन शकाच्या कालगणनेनुसार (फाल्गुन वद्य षष्ठी शके १५२१) पाळली जाते.
१८५४ > तब्बल ११ खंडांत ‘भारतीय साम्राज्य’ हा इतिहासग्रंथ लिहिणारे नारायण भवानराव पावगी यांचा जन्म. ‘भाषाशास्त्र’ आणि ‘भारतीय नाटकशास्त्र’ हे त्यांचे अन्य ग्रंथ. ‘मनोरंजनशतक’ हे त्यांचे पहिले पुस्तक छंदोबद्ध पद्यरचनेचे होते.
२००२ > ‘अभिरुची’ मासिकाचे संस्थापक आणि संपादक पुरुषोत्तम आत्माराम ऊर्फ बाबुराव चित्रे यांचे निधन. ‘नवे लेणे’ हा निबंधसंग्रह १९६१ साली प्रकाशित झाला; परंतु त्यांचे स्फुटलेखन त्याहीनंतर सुरू राहिले असले तरी अनुवादकार या नात्याने त्यांची पुस्तके अधिक आली. सर्वपल्ली गोपालकृत नेहरू-चरित्राचा, तसेच जॅक लंडन यांच्या कथांचा अनुवाद त्यांनी केला आहे. कवी दिलीप चित्रे यांचे ते वडील.
– संजय वझरेकर
father of genetics : gregor johann mendel
navneet, kutuhal, war and peace, knowledge
कुतूहल : ‘जेनेटिक्स’चा जनक : ग्रेगर जोहान मेंडेल

वॉर अँड पीस : जखमा : भाग झ्र् २