मान्सूनच्या सुरुवातीला पावसाच्या चार-पाच प्रदीर्घ सरीनंतर होणारे काजव्यांचे आगमन पाहून आपणास रात्री चांदण्याने फुललेला आसमंतच भूतलावर आला आहे की काय असा भास होतो. काजवा हा लहान भुंग्यासारखा, माणसास निरुपद्रवी असणारा कीटक. ध्रुवीय प्रदेश वगळता जगभरात त्याच्या तब्बल दोन हजार प्रजाती आढळतात. त्यांचे वास्तव्य मुख्यत: वाहत्या नदीकिनारी, पाणथळ जागी, जंगलात, उंच गवताळ कुरणामध्ये आढळते; कारण या जीवाला जगण्यासाठी आद्र्रता आवश्यक असते त्याचबरोबर काळोखसुद्धा. हा कीटक निशाचर आहे. इतर अनेक कीटक वर्षांमधून कितीतरी जीवनचक्रे पूर्ण करतात, मात्र या लुकलुकणाऱ्या काजव्यास त्यासाठी तब्बल एक वर्ष लागते.

पावसाळय़ात एक मादी कीटक अंदाजे १०० अंडी देते. ती अंडी उंच झाडाच्या खोडावर, अथवा पाणथळ जागी किंवा उंच गवताळ प्रदेशात खालच्या ओलसर पालापाचोळय़ात घातली जातात. अंदाजे दोन आठवडय़ांत अंडय़ामधून अळी बाहेर येते आणि सुरू होतो तिच्या जगण्याचा संघर्ष. तिचे मुख्य अन्न म्हणजे जमिनीचे कीटक, अळय़ा आणि गोगलगायी. अन्न खाता खाता तिचा आकार वाढू लागतो. स्थित्यंतराच्या या प्रवासात ही अळी पाच वेळा तरी कात टाकते आणि नंतर फुलपाखराप्रमाणे कोश रूप धारण करते ते तब्बल पुढील पावसाळा येईपर्यंत. पावसाच्या चार-पाच सरी येऊन गेल्या की कोशामधून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात आणि त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते. या वेळी त्यांचे खाद्य म्हणजे हवेत उडणारे छोटे कीटक. काजव्यांचे लुकलुकणे विशिष्ट पद्धतीचे असते, काही काजवे कमी वेळात जलद गतीने लुकलुकतात तर काही मंद गतीने.

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

काजव्यांचा प्रकाश त्यांना अन्न शोधण्यास त्याचबरोबर प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडतो. त्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशामुळे अनेक रातकिडे त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचे भक्ष्य होतात. नर आणि मादी कीटक दोन्हीही लुकलुकतात. मादी काजव्याला आकर्षित करण्यासाठी नर काजवा विविध प्रकारे लुकलुकत असतो. या प्रकाश निर्मितीमागे प्रजोत्पादनामधून पुढील नवीन पिढी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असते. वेळ कमी असल्यामुळे बहुसंख्य नर कीटक काहीही न खाता कायम लुकलुकत असतात. मीलन झाल्यावर नर कीटकाचा मृत्यू होतो, मादी सुरक्षित ठिकाणी अंडी देऊन तीही मरून जाते. 

विषारी बेडकांत जसे कार्डिओटॉनिक बुफेडायनोलॉइड्स (cardiotonic bufadienolides) रसायन असते, तसेच काजव्यांत पायरॉन्स ल्युसिफॅगिन्स ( pyrones lucibufagins) स्टिरॉइड असते, त्यामुळे पृष्ठवंशीय प्राणी यांचा अन्न म्हणून विचारही करत नाहीत. काजव्यांचे लुकलुकणे पृष्ठवंशीय प्राण्यांसाठी दूर राहण्याचा इशाराच असतो, असे म्हणायला हरकत नाही.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader