कुतूहल
अग्निरोधक फर्निचर
घरातील फर्निचर करण्यासाठी लाकडाचा बऱ्याच मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. लाकूड ज्वलनशील असल्याने ते लवकर पेट घेते आणि आग वेगाने पसरू शकते. परिणामी बऱ्याच मोठय़ा प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. या त्याच्या गुणधर्मामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर काही प्रमाणात सीमित होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आज अनेक अग्निरोधक रसायने उपलब्ध आहेत. यातील योग्य प्रकारची अग्निरोधक रसायने काळजीपूर्वक वापरल्यास आगीची भीती न बाळगता आपण लाकडी फर्निचरचा वापर मोठय़ा प्रमाणात करू शकतो. अशा अग्निरोधक रसायनाचे आवरण जर फíनचरवर असेल तर ते लवकर पेट घेत नाही आणि जेव्हा ते पेटते तेव्हा ते पेटल्यावर त्यातून कमी प्रमाणात उष्णता बाहेर पडते. या अग्निरोधक रसायनामध्ये फॉस्फरस, सिलिका, बोरोन आणि त्यांची संयुगे त्याचप्रमाणे मोनो अमोनिअम फॉस्फेट, ओर्थो फोस्फोरिक आम्ल, बोरॅक्स, बोरिक आम्ल आणि बोरिक ऑक्साइड इत्यादींचा समावेश असतो. या रसायनांचे ज्वलन झाल्यावर कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ तयार होते. तसेच पृष्ठभागावर फेस तयार झाल्याने जळणाऱ्या फíनचरचा हवेशी संपर्क तुटतो आणि त्यामुळे त्यांची ज्वलनक्षमता कमी होते.
अग्निरोधक रसायने ही लाकडाच्या आतमध्ये टाकल्याने ते लवकर जळत नाही. तसेच त्यावर लेप करतानाही अग्निरोधक रसायने वापरतात. फíनचरला जे लेप असते ते दिसण्यासाठी कसे आहे आणि त्याचा वापर किती काळ करून त्यांची दुरुस्ती कशी करायची, या सर्व गोष्टींवर ते अवलंबून आहे. त्या लाकडाला रंग किंवा द्रवरूप रंग तर कधी पिग्मेन्ट, तर कधी पारदर्शक पदार्थाचा थर दिला जातो.
लाकडी फíनचरवर वातावरणाचा परिणाम होतो. पावसाळ्यात वातावरणात बाष्प जास्त असल्याने ते फुगते तर उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे लाकडातील बाष्प निघून गेल्याने ते आकसते. त्यामुळे त्याला असे लेप हवे की दोन्ही वातावरणात उपयोगी असेल.
लाकडी फíनचरची अजून एक समस्या म्हणजे त्याला लागणारी वाळवी.आर्द्रतेमुळे फर्निचरला वाळवी लवकर लागते. ही आर्द्रता कमी करण्यासाठी जलरोधक रसायने घरात आणि घराबाहेरील भागात वापरतात.
प्रा. श्यामकुमार देशमुख (सोलापूर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल: अग्निरोधक फर्निचर
घरातील फíनचर करण्यासाठी लाकडाचा बऱ्याच मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. लाकूड ज्वलनशील असल्याने ते लवकर पेट घेते आणि आग वेगाने पसरू शकते. परिणामी बऱ्याच मोठय़ा प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fireproof furniture