फ्लोरेन्सच्या टस्कनी राज्यावरील मेदिची घराण्याचे राजेपद, आक्रमण करून लॉरेनचा डय़ूक फ्रान्सिस स्टीफन याने १७३७ साली आपल्याकडे घेतले. फ्रान्सिस स्टीफनची पत्नी मारिया थेरेसा ही ऑस्ट्रियाची राणी होती. पुढे फ्लोरेन्स आणि टस्कनीचा राज्यप्रदेश ऑस्ट्रियाच्या राज्यात सामील केला गेला. १८५९ मध्ये फ्रान्स आणि सार्दिनिया यांच्या युतीने ऑस्ट्रियाचा पराभव केल्यानंतर दोन वष्रे फ्लोरेन्स फ्रेंच सत्तेच्या वर्चस्वाखाली राहिले. दोन वर्षांनी १८६१ मध्ये टस्कनी हा नव्याने तयार झालेल्या संयुक्त इटालीच्या राज्याचा एक प्रांत बनला आणि फ्लोरेन्स बनले टस्कनी प्रांताची राजधानी. संयुक्त इटालियन राज्याची राजधानी प्रथम टय़ुरिन येथे होती. लवकरच १८६५ मध्ये फ्लोरेन्स येथेच ही राजधानी नेण्यात आली. राजधानी झाल्यावर जुनी, मोडकळीस आलेली घरे व इमारती नव्याने बांधण्यात आली, शहराचे नव्याने नियोजन करून रस्ते रुंद करण्यात आले, पिआत्झा डेला रिपब्लिका हा शहरातला प्रमुख चौक विस्तारित करण्यात येऊन सुशोभित केला गेला. इ.स. १८६५ ते १८७१ या काळात फ्लोरेन्समध्ये इटालीची राजधानी राहिल्यावर १८७१ मध्ये रोम ही इटालियन प्रजासत्ताकाची राजधानी झाली. त्यापूर्वीची दहा वष्रे फ्लोरेन्सचे तत्कालीन प्रसिद्ध हॉटेल ‘कॅफे जियुब रॉस’ने आपली राजकीय भूमिका चांगली पार पाडली. या हॉटेलात अनेक राजकारणी लोकांचे अड्डे भरून राजकीय निर्णय घेतले जात. १९व्या शतकात फ्लोरेन्सची लोकसंख्या दुप्पट झाली तर विसाव्या शतकात तिप्पट! या काळात येथे पर्यटन वाढले, व्यापार वाढला, नवीन उद्योग सुरू झाले. या काळात जेम्स आयìवगसारखे प्रसिद्ध लेखक आणि अनेक चित्रकार, शिल्पकार फ्लोरेन्समध्ये स्थायिक झाले. अनेक इंग्लिश सरदारांनी मध्ययुगीन काळात बांधलेले येथील प्रासाद आणि त्यातील कलावस्तूंच्या संग्रहांचे रूपांतर म्युझियममध्ये झाले. स्टीबर्ट म्युझियम, म्युझियम होर्न, विला ला पिएट्रा ही सध्याची प्रसिद्ध म्युझियम्स हे एकेकाळचे सरदारांचे वाडे होते!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
सफरचंद
वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने खरे फळ म्हणजे फुलातील बीजांडकोशाचे फळात रूपांतर होणे आणि आतल्या बीजांडाच्या बिया तयार होणे. फुलाच्या देठाच्या अग्रभागी पसरट भागावर पुष्पस्थळी असते, फुलात मुख्यत: बाहेरची हिरवी संदले, पाकळ्या, पुंकेसर आणि सर्वात आतला स्त्रीकेसर हे चार भाग असतात. परागीभवनानंतर फलधारणा होते. आपण फळे खातो ती सगळीच फळे शास्त्रीयदृष्टय़ा खरी फळे असतीलच असे नाही.
पेर, सफरचंद ही खरी फळे नाहीत ही फळे उभी किंवा आडवी कापली की, मध्यभागी काळ्या तपकिरी बियांभोवती थोडा कडक भाग दिसतो. तेच खरे फळ पण आपण नेमके तेच काढून टाकतो. आपण खातो तो भाग म्हणजे पुष्पस्थळी पाकळ्याच्या खाली असलेला भाग.
रेड व रॉयल डिलिशस (तांबडी), गोल्डन (सोनेरी), मॅक्नटॉश (तांबूस- गुलाबी), छाऊबाटीया अनुपम (तांबडे पिवळे पट्टे) आणि लाल अंबरी (तांबूस पिवळी) ह्या विविध सफरचंदाच्या जाती भारतात वाढवल्या जातात. रॉयल गॅला-न्यूझिलंड, वॉश्िंाग्टन रेड आणि ग्रॅनी स्मिथ अमेरिका या जातींची सफरचंदे परदेशातून भारतात आणली जातात. चांगल्या प्रतीच्या सफरचंदाची साल तुकतुकीत, घट्ट व थोडी जाड असते. गर घट्ट गोडसर व रवाळ असतो. हिरवी सफरचंदे आतून करकरीत, घट्ट, आंबटगोड असतात. गुलबट जातीची सफरचंदे गोड असतात. गोल्डन जातीची सफरचंदे मऊ आणि अतिशय स्वादिष्ट असतात.
सफरचंद कापून ठेवल्यास काही वेळातच तपकिरी होते. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. कापलेल्या सफरचंदाच्या पेशीमधले लोह आणि हवेतील ऑक्सिजन यांचा संयोग होऊन ‘आयर्न ऑक्साईड’ हे संयोग तयार होते. पेशीमध्ये असलेले पॉलीफिनॉल ऑक्सिडेझ हे वितंचक (एन्झाईम) ही क्रिया जास्त वेगाने घडवते. त्यामुळे कापलेले सफरचंद तपकिरी दिसते म्हणून सफरचंदाचे ज्यूस तपकिरी- तांबडे दिसते. रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेले आयर्न ऑक्साईड खाण्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. कापलेले सफरचंद तपकिरी होऊ नये म्हणून िलबाचा रस लावून ठेवले किंवा कापलेले सफरचंद पाण्यात अथवा घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवल्यास वितंचकाची क्रिया मंदावते.
भरपूर पोषक द्रव्याचा साठा असलेले सफरचंद रोज खाल्ले तर डॉक्टरची पायरी चढावी लागणार नाही.
– डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Paaru
अहिल्यादेवीचा जीव धोक्यात? बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट
Queen Elizabeth II's wedding cake slice sold in auction
Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध?
Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर