२९ डिसेंबर १९५९ या दिवशी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या मीटिंगमध्ये कॅल्टेक इथे सुप्रसिद्ध संशोधक रिचर्ड फाईनमन यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानाचा विषय होता, ‘देअर इज प्लेन्टी ऑफ रूम अ‍ॅट दी बॉटम.’ या व्याख्यानात त्यांनी पदार्थाच्या थेट अणूंची हाताळणी करण्याची शक्यता वर्तवली. एका अर्थाने ही नॅनो तंत्रज्ञानाचीच शक्यता फाईनमन यांनी व्यक्त केली होती.
‘नॅनो टेक्नॉलॉजी’ ही संज्ञा नोरिओ तानिगुची यांनी १९७४ साली सर्वप्रथम वापरली. अर्थातच त्या वेळी ही संज्ञा फारशी प्रचारात नव्हती. पण, १९८६ साली रिचर्ड फाईनमन यांच्या कल्पनेने प्रेरित झालेल्या अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील एरिक डेक्सलर या युवा संशोधकाने ‘इंजिन्स ऑफ क्रिएशन’ हे नॅनो तंत्रज्ञानावरचं जगातलं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. या पुस्तकात त्यांनी जीवशास्त्रीय प्रतिकृतींच्या आधारावर चक्क पदार्थाच्या रेणूंनी तयार झालेली सूक्ष्म यंत्रं कशी तयार करता येतील, याचं विवेचन केलं.
एरिक डेक्सलर केवळ पुस्तक लिहून थांबले नाहीत, तर नॅनो संकल्पना आणि या तंत्रज्ञानाचा प्रभाव यासंबंधी जनजागृती व समज वाढविण्याच्या हेतूने त्यांनी ‘दी फोरसाईट इन्स्टिटय़ूट’ या संस्थेची स्थापना करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. रासायनिक क्रियांच्या माध्यमातून अतिशय क्लिष्ट प्रतिकृती तयार करणं सोपं होईल, असं डेक्सलर यांचं म्हणणं होतं.
याच सुमारास म्हणजे १९८५ साली राईस विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड सॅली, रॉबर्ट क्लर्क या शास्त्रज्ञांनी हॅरि क्रोटो या खगोलशास्त्रज्ञांबरोबर २० षटकोन व १२ पंचकोनात कार्बनचे ६० अणू असलेला फुटबॉलसारखा दिसणारा रेणू तयार करण्यात यश मिळविले. त्याला नाव देण्यात आले ‘बकमिन्स्टर फुलेरिन.’ पुढे हा रेणू बकीबॉल म्हणून ओळखला जाऊ लागला. बकीबॉलचा शोध ही नॅनो तंत्रज्ञानाची नांदी होती.  पुढे १९८९ मध्ये ‘स्कॅिनग टनेिलग सूक्ष्मदर्शक’ यंत्राचा वापर एकेक अणू हाताळण्यासाठी यशस्वीरीत्या करण्यात आला.
अशा प्रकारे एरिक डेक्सलर यांचे सद्धांतिक कार्य आणि तत्कालीन प्रायोगिक विकास यांतून एक संशोधन क्षेत्र म्हणून नॅनो तंत्रज्ञानाचा उदय झाला.
हेमंत लागवणकर (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – कृष्णकमळ
तुला अगदी पहिल्या वेळी पाहिले, तो दिवस आठवतोय. अचानक कोपऱ्यावरच्या भिंतीचा आधार घेत ती वेल सरसर वाढत होती. रोज पाहावं तर पालवी फुटत होती, पण फुलांचा पत्ता नव्हता. पानं आणि एकूण पसारा अपरिचित वाटत होता. हिरवीगार मध्यम आकाराची पानं तजेलदार होती. ती आवडली, पण एके दिवशी लांबट कळे दिसले आणि हां हां म्हणता वेल बहरली.
फुलांच्या रंगांनी आणि आकारांनी मन हरखून गेलं. नेहमीच्या फुलासारखं तुझ्यात काहीच नव्हतं. तुझं रूप रहस्यमय आणि रुबाब तर आगळावेगळा. मग कळलं तुला ‘कृष्णकमळ’ म्हणतात. पॅशन फ्लॉवरचा एक प्रकार.
कृष्णकमळ म्हणजे साक्षात निसर्गलीला. रंगांची बहार आणि पुंकेसराची अजब मांडणी. वाटोळ्या आकाराच्या फुलाच्या पाकळ्या असंख्य. दोऱ्यासारख्या गच्च एकमेकाला बिलगून. देठाशी जरासा फिकट पांढरा. पुढे निळा-जांभळा. लहानपणी सूर्याचं चित्र काढताना त्याच्या किरणांची जशी प्रभा काढतो तशा या पाकळ्या. अगदी नाजूक. त्या पाकळ्यांनी शाकारलेलं हे पुष्प श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचा आभास निर्माण करतं. फुलाच्या केंद्रभागी कारंज्यासारखे पाच पुंकेसर आणि त्यावर आणखी केसरांची आरास.
बाहेरच्या पाकळ्यांना सभोवताली कमळासारख्या हिरवट पाकळ्या. फुलाला वरून पाहिलं तर चक्रातील, चक्रात चक्र असा थाटमाट. फुलाच्या केंद्रभागी किंचित ओलसरपणा आणि सुगंध.
कृष्णकमळाच्या वेलीच्या एका प्रकाराला पॅशन फ्रूटही म्हणतात. या फुलाचा रंग फिका. (आणखी विविध रंगही असावेत) फळ अतिशय आकर्षक. मोठय़ा लिंबाचा रंग नि आकाराचं, तेजस्वी, गुळगुळीत, चकचकीत कांतीची ही फळं झाडावर लागली की उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलचि ते असा भास.
पॅशन फळामध्ये इवलासा रस, पण आंबट-गोड आणि खास स्वाद..
आता तुला कृष्णकमळ का म्हणावं? का म्हणू नये, ‘निळासावळा श्याम’ म्हणावं असा गहिरा जांभळा रंग, थाटमाट कमळासारखा. आतल्या पुंकेसरांच्या उभारीला ‘पाच पांडव’ही म्हणतात.
मूळ ‘पॅशन’ म्हणजे लैंगिक उमाळा नाही तर १५व्या शतकातील ख्रिस्ती मिशनरींना या फुलाच्या (बहुतेक पाच केसरांमुळे) आकारात क्रुसिफिकेशनचा म्हणजे ख्रिस्ताच्या आत्मसमर्पणातील उमाळा जाणवला म्हणून ‘पॅशन’ असं नाव दिलं असावं.
कोणी कृष्ण म्हणतो तर कोणी ख्रिस्त. एकुणात तुला देवत्वाचा स्पर्श झालाय.
कृष्णकमळाच्या फुलांनी बहरलेली वेल बहारदार दिसते.
मित्रा, माझी दृष्टी ऱ्हस्व म्हण किंवा वावर मर्यादित म्हण. कृष्णकमळाचं दर्शन दुर्मीळ झालंय. बाजारात विरळा कुठे तरी चारदोन फुलं दिसतात, पण त्यांचा दिमाख असतो वेलीवरच!  
आहेत कोणाकडे त्यांचे फोटो, पाहू दे..
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
आभार : कुणाल घाटे (फ्लिकर), छायाचित्राबद्दल!

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
job at barc as a researcher research opportunity at barc
नोकरीची संधी : बीएआरसीत संशोधन संधी
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर

प्रबोधन पर्व – ‘हिंदू’, ‘हिंदी’ आणि ‘भारतीय’ आज समानार्थी आहेत?
‘‘व्युत्पत्तिशास्त्राप्रमाणे ‘हिंदू’ शब्द प्रादेशिक, भौगोलिक अर्थाचा आहे, असे आपण कितीही ओरडून सांगितले, तरीही सर्वसामान्य जनतेला या व्युत्पत्तिची पर्वा नाही. ‘हिंदू’ हा शब्द धर्माशी घट्टपणे चिकटला गेलेला आहे व तो शब्द आता वेगळा करून वापरणे कुणालाही अवघडच आहे. तो शब्द आता राष्ट्रवाचक व धर्मवाचक अशा दोन्हीही अर्थानी वापरला जाणार आहे. शब्दासाठी फार काळ घोटाळत राहू नये. खरे म्हणजे हिंदी, हिंदू, भारतीय हे तीनही शब्द समानर्थी व्हायला पाहिजेत. राष्ट्रवादाचा अर्थ त्यामुळे बदलत नाही. ‘हिंदी’ हा शब्द आता प्रचारातून जातच चालला आहे. हिंदू किंवा भारतीय हे आजतरी समानार्थी शब्द नाहीत. हिंदू राष्ट्र हा शब्द कायद्याने वज्र्य केला, तर भारत शब्द प्रादेशिक व धार्मिक अर्थाने वापरला जाईल. आज जे थोडे अंतर आहे ते लवकरात लवकर संपवून टाकावे. सावरकरांच्या व्याख्येत हिंदू हा शब्द आहेच, त्याचप्रमाणे भारत हा शब्दही आहे. म्हणजे आजची वस्तुस्थिती त्यांनी मांडली व भावी नामांतर कोणते असेल याचीही सूचक नोंद करून ठेवली.’’
‘हिंदू’ या शब्दाने सूचित होणाऱ्या अर्थाविषयी आणि अनार्थाविषयी ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर १९९४ साली लिहिलेल्या लेखात म्हणतात-
‘‘भारत हा शब्द दोन्ही बाजूंनी सरमिसळ होऊन वापरला जाईल असे दिसते. तो शब्द हिंदुत्ववाद्यांनीही स्वीकारावा. हिंदुत्वच शब्द वापरण्याचा व तो दीर्घकाळ ठेवण्याचा अट्टाहास करू नये. त्यातल्या त्रुटी, अज्ञात असलेला इतिहास, व्युत्पत्ती, परंपरा, वळण या दृष्टीने हा सोयीचा मधला मार्ग स्वीकारावा. भारत हा शब्द सगळ्यांनी रूढ करणे आवश्यक आहे. मागे आपण देशाची, संस्कृतीची नावे अशीच ‘समुद्रास्तुप्यंतु’ केलेली आहेत. नाव ते नाव, त्याला किती महत्त्व द्यायचे?.. ’’

Story img Loader