गॅलिलिओ गॅलिली या निर्भीड वृत्तीच्या इटालियन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाचा जन्म १५६४ साली पिसा येथे झाला. एका रविवारी चर्चमधील हलणारे झुंबर पाहून त्याने स्वत:च्या हाताच्या नाडीवरून लंबकाच्या दोलनाच्या वेळेसंबंधी विविध प्रयोग केले. त्यावरून त्याने हे सिद्ध केले की, लंबकाचे दोलन त्याच्या दोरीच्या लांबीवर अवलंबून असते. यानंतर गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक बॅलन्स बनविला. घरच्या वाईट आíथक परिस्थितीमुळे गॅलिलिओला विद्यापीठीय शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पुढे उदरनिर्वाहासाठी गॅलिलिओने शिकवण्या सुरू केल्या. त्याच्या विद्वत्तेमुळे पाटुआ विद्यापीठात त्याला नोकरी मिळाली. त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बणिीमुळे लागले. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धांतांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बणिीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धांतांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८ व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वष्रे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो.

– सुनीत पोतनीस

History of Geography How Big is the Universe
भूगोलाचा इतिहास: विश्वाचा आकार केवढा?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mangal Gochar 2025
मंगळ करणार मिथुन राशीमध्ये गोचर, ‘या’ चार राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Sun gochar in makar
पैसाच पैसा! एक वर्षानंतर सूर्य करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
People get money and wealth after the age of 35 years
वयाच्या ३५ वर्षानंतर चमकू शकतात ‘या’ लोकांचे नशीब, शनि देवाची दिसून येईल कृपा
zodiac signs get money and wealth by the shiva grace
शिवच्या कृपेने मिळणार ‘या’ तीन राशींच्या लोकांना पैसाच पैसा! २०२५ मध्ये चमकणार यांचे नशीब
d Gukesh
D Gukesh : आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण! जगज्जेतेपदाचा चषक स्वीकारताना गुकेशची भावना
Garry Kasparov on d gukesh
बुद्धिबळातील सर्वोच्च शिखर सर, सर्वांत युवा जगज्जेत्या गुकेशची कास्पारोव्हकडून स्तुती

sunitpotnis@rediffmail.com

 

सर्पगंधा

सर्पगंधा या वनस्पतीच्या नावावरून काही तरी सर्पाशी संबंध असावा असा कुठे तरी संकेत मिळतो. तो बरोबरच आहे. सोळाव्या शतकात ‘लिओनॉई राऊल्फ’ या जर्मन शास्त्रज्ञाच्या नावामुळे राऊलफिया हे नाव पडलं, तर सापासारख्या लांबच लांब मुळ्यांचा आकार म्हणून ‘सप्रेटिना’ हे नाव पडलं. ही वनस्पती अ‍ॅपोसायनेसी कुळातील असून ‘राऊलफिया सर्पेटिना’ असे या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे. तशी ही वनस्पती भारतीयांना फार पूर्वीपासून माहीत आहे. भारतीय वैद्य जे ‘सर्पगंधा’ औषध वापरीत, त्यापासून सर्पासील हे आधुनिक औषध बनविण्यात आले आहे.

सर्पगंधा ही वनस्पती वनौषधी झुडूप असून, साधारण ६० ते ९० सेंटिमीटपर्यंत उंच वाढते. भारतात ही हिमालयातील सिमल्यापासून आसाम, त्रिपुरापर्यंत तसेच गंगेचे खोरे, बिहार, बंगाल, ओडिशा, अंदमान इ. भागांत जंगलात वाढताना दिसते. महाराष्ट्रात कोकण, पश्चिम घाट आणि विदर्भातही आढळते.

खोडावरील साल पिवळसर असते. पाने साधी, लांबट आकाराची, तीन तीनच्या समूहात असतात. पानांचा रंग वरून गर्द हिरवा, तर खालून फिक्कट हिरवा असतो. मुळे सापासारखी लांब, जाड असून, मुळाची साल फिक्कट उदी रंगाची. फुलांचा रंग तांबडट-पांढरा. फुलांचा गुच्छ शेंडय़ावर किंवा पानांच्या बेचक्यात येतो. फुले लहान, पांढरी किंवा तांबडटसर असतात. फुलाचे डेखे लालभडक असतात. फळे वाटाण्याएवढी, काळसर जांभळ्या रंगाची असून, मांसल व कठीण कवचाची असतात. बिया, खोड व मुळापासून हिची लागवड करता येते.

सर्पगंधा वनस्पतीच्या मुळापासून अजमालाईन, सर्पेटाईन, रॉऊलफाईन, रेसरपीन ही महत्त्वाची अल्कोलॉईड मिळवली जातात. यापकी रेसरपीन हा औषधगट रक्तदाब कमी करण्यासाठी वापरला  जातो. नव्‍‌र्हस सिस्टमवर ही औषधे वापरतात. वेडय़ा, भ्रमिष्ट लोकांसाठी औषध म्हणून या वनस्पतीचा वापर होत असल्याने या वनस्पतीला ‘पागल की दवा’ असेही म्हणतात. तसेच मासिक पाळी वेळेवर व योग्य प्रमाणात येण्यास मुळांचा वापर करतात. सर्पदंशात मुळाचा लेप जखमेवर लावतात. सर्पगंधेस जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी असल्याने वनक्षेत्रातून ही पूर्णपणे नष्ट होत चालली असून ती संकटग्रस्त बनली आहे.

 

– शुभदा वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

 

 

 

Story img Loader