विल्यम गॅसकॉइन (१६११-१६४४) हा इंग्लडचा खगोल अभ्यासक होता. बहुतेक खगोल अभ्यासकांप्रमाणे विल्यम गॅसकॉइनलाही गणितात चांगलीच गती होती. केपलरच्या खगोल गणिती गृहीतकांवर त्यांनी अभ्यास केला व त्याचा पाठपुरावा केला.

एकदा आकाश निरीक्षणासाठी असलेल्या दुर्बणिीच्या िभगांच्या रचनेत असलेल्या कोळ्याच्या जाळ्यातून त्याला क्रॉस वायरची संकल्पना सुचली व ती त्याने नंतरच्या दुर्बणिींमध्ये धातूची अतिशय पातळ अशी तार वापरून प्रत्यक्ष करून बघितली. त्यामुळे दुर्बीण लक्ष्यावर केंद्रित करण्याच्या पद्धतीत अधिक अचूकता आली. आजच्या आधुनिक दुर्बणिींमध्येही या तंत्राचा उपयोग केला जातो. वेगवेगळी नवनवीन उपकरणे बनविणे हा विल्यम गॅसकॉइनचा आवडीचा छंद होता.

मायक्रोमीटरस्क्रू गेज किंवा मायक्रोमीटर स्क्रू प्रमापी हे विल्यम गॅसकॉइनने बनविलेले एक अतिशय उपयुक्त असे उपकरण. अतिसूक्ष्म वस्तूंचा व्यास मोजण्याबरोबरच दुर्बणिी व सूक्ष्मदर्शक यंत्रावर बसवून याचा उपयोग खगोलीय वस्तू किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली असलेल्या नमुन्याचे आकारमानाचे मोजमाप करण्यासाठीही होतो. उपकरणात वापरलेला स्क्रू एका पूर्ण वर्तुळाकार फेऱ्यात किती अंतर पुढे जातो (स्क्रूचा पिच) व उपकरणातील िभगांचे नाभीय अंतर माहीत असलेले उपकरण दुर्बीण व सूक्ष्मदर्शक यंत्रावर बसविल्यास दुर्बणिीतून दिसणाऱ्या खगोलीय वा सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसणाऱ्या वस्तूचे अधिक अचूक मोजमाप करता येते. स्क्रूचा पिच जितका कमी तितके मोजमाप अधिक अचूक. अशा प्रकारची सुधारीत दुर्बीण वापरून हॉरॉकच्या सिद्धातानुसार चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेचे निरीक्षण प्रथमच करण्यात विल्यम गॅसकॉइन व त्याचा सहकारी क्रॅबट्री यांना यश आले. रिचर्ड टॉनलीने या खगोल शास्त्रज्ञाने या उपकरणात सुधारणा करून रॉबर्ट हुक यांना ते दिले. त्याचाच उपयोग करून रॉबर्ट हुकने धुमकेतू व अंतराळातील काही वस्तूंचे आकारमान अचूकपणे शोधून काढले.

१६४२ ला सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धाची झळ अनेक वैज्ञानिकांना बसली. विल्यम गॅसकॉइन त्यातला एक. त्यांच्या सर्व पत्रव्यवहारांवर बंदी आणली गेली.

१६४४ मधे विल्यम गॅसकॉइनच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व संशोधन वाङ्मय व पत्रव्यवहार ख्रिस्तोफर व रिचर्ड टॉनली यांच्या ताब्यात आले. जागतिक महायुद्धाच्या काळात त्यातील बराच भाग गहाळ झाला होता. उर्वरित वाङ्मय आजही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बॉडलीन ग्रंथालयात उपलब्ध आहे.

–  सई पगारे- गोखले

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. सी. नारायण रेड्डी –  काव्य आणि गीते

‘आपण गाणी लिहीत नाही तर ती स्फुरतात, कविता माझ्यासमोर फुलासारखी, वृक्षासारखी, तांडवासारखी, पहाडासारखी, आकाशासारखी सदैव उभी असते. कधी निसर्गाचे रौद्र रूप तर कधी भीषण रूप- मला वज्र्य नाही, असे  सी. नारायण रेड्डी ऊर्फ सिनारे यांचे म्हणणे आहे.

वयाच्या १२ व्या वर्षी सिनारेंनी शाळेत असताना आपली पहिली कविता लिहिली. ओका नाडु, ओका नक्का, ओका अडविली पोट्टा को सगम् (एके दिनी, एक कोल्हा, एका जंगलात भक्ष्य शोधायला गेला)- अशी ती प्रासयुक्त साधीसरळ अशी कविता होती. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह- ‘नव्वनि पुण्वु’ (न हसणारे फूल), १९५३ मध्ये प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाचे नावाजलेल्या समीक्षकांसह वाचकांनी अफाट कौतुक केले. सिनारेंची साहित्यसेवा विपुल आहे. ‘नागार्जुनसागरम्’ ‘कर्पुर वसंतरायुलु’, ‘ऋतुचक्रम्’, ‘जातिरत्नम्’, ‘विश्वंभरा’ इ. दीर्घकाव्ये- मंदरगती मंदहासम्, उदयमना हृदयम्, मंटलु मानवुडू, नडका ना तल्ली, तेजस्स् ना तपस्यू, कवितानां विरुनामा इत्यादी काव्यसंग्रह- ‘नव्वनी पुण्वु’, ‘अजंता सुंदरी’, ‘वेन्नेलवाडा’ ही काव्यनाटय़े, ‘आधुनिक आंध्र कवितम्’, ‘व्यासवादिनी’, ‘समीक्षम् ही साहित्य समीक्षणे’ सुमारे पस्तीस गझलांचा संग्रह व काही ‘रूब्बाईयात’ प्रकाशित झाले आहेत. शिखरालु- होयलु, ‘गांधीयम’, ‘मुत्याला कोकिला’ इ. तेलुगुत उर्दूसदृश गजलाही त्यांनी लिहिल्या आहेत. संत मीराबाईंच्या पन्नास भजनांचे अनुवादही केले आहेत.

तीन चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या, त्यापैकी ‘एकवीरा’ या चित्रपटातील संवाद व गीते खूप लोकप्रिय झाली. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी तीन हजारांहून अधिक गीते लिहिली. एन.टी. रामाराव यांनी आपल्या ‘गुलबकावली’ या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची प्रथमत: त्यांना संधी दिली. या चित्रपटातील गीतांना अफाट लोकप्रियता मिळाली. ‘अकबर, सलीम व अनारकली’ या  चित्रपटासाठी सिनारे यांनी लिहिलेली गीते व संवादही लोकप्रिय झाले. श्रोत्यांच्या व वाचकांच्या काळजाला हात घालण्याची त्यांची ताकद व मुख्य म्हणजे सुभाषितवजा रचनाबंधांनी सहस्रावधी लोकांच्या ओठावर त्यांची चित्रपटगीते आजही विहरत आहेत.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

Story img Loader