भारतीय ज्ञानपीठाचा १९७३ चा साहित्य पुरस्कार गोपीनाथ माहान्ति यांना त्यांच्या ‘माटीमटाल’ या उडिया कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६२ ते १९६६ या कालावधीतील सर्व भारतीय भाषांतून निवडली गेली. त्या वर्षी हा पुरस्कार विभागून (कन्नड कवी द. रा. बेन्द्रे यांच्यासह) देण्यात आला.

माहान्ति यांचा जन्म ४ एप्रिल १९१४ रोजी ओरिसातील कोनापूर जिल्ह्य़ातील नागवली या गावी जमीनदार कुटुंबात झाला. वडिलांचा मृत्यू झाल्याने, बालवयातच शालेय शिक्षणासाठी त्यांना आपल्या भावाकडे पाटना येथे जावे लागले. १९३० मध्ये मॅट्रीकच्या परीक्षेत ते दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३६ मध्ये कटक विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. झाले. १९३८ पासून के उडिशाच्या प्रशासकीय सेवेत रूजू झाले. विविध पदांवर काम करीत असताना उडिशाच्या अनेक गावातून  त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे ओरिसातील ग्रामीण जीवन, आदिवासी जीवनपद्धती, त्यांचे आचार-विचार, त्यांच्या समस्या ते जाणून घेऊ शकले.

eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
Those who do not accept Hindu Rashtra should go to Pakistan says Dhirendrakrishna Shastri
हिंदू राष्ट्र मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे वक्तव्य
cultural and educational rights under indian constitution article 29 and 30
संविधानभान : भाषेचा मायाळू विसावा
multiple languages issue considered in constituent assembly
संविधानभान : भारताचे बहुभाषिक कवित्व
official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा

१९३६ मध्ये त्यांनी लेखनास सुरुवात केली. त्यांची पहिली कादंबरी ‘मन  गहिरर चाष’ ही १९४० मध्ये प्रकाशित झाली. या काळात मार्क्‍स, रशियन क्रांती, गांधीजी व स्वातंत्र्यलढा यांचा  प्रभाव त्यांच्यावर होता. १९ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, २ नाटके, एक निबंधसंग्रह, दोन चरित्रे व आदिवासींच्या भाषेसंबंधात ८ पुस्तके आदी  त्यांची एकूण ४५ पुस्तके प्रकाशित झाली असून  चार हिंदी, बंगाली व इंग्रजीतून अनुवादित आहेत.

निर्धन, शोषित, पददलित  व आदिवासींच्या जीवनाचं चित्रण करणाऱ्या त्यांच्या ‘परजा’(१९४५), ‘अमृतर संतान’(१९४७) आणि ‘माटीमटाल’(१९६४) या साहित्य कृतीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.आदिवासीतील परजा, कन्ध, कोल्ह, डंब यांच्याबरोबर राहताना ते जमीनदार कुटुंबातील असूनही त्यांच्यात मिसळून गेले. विशेषत: कोराटपूर आणि तेथील आदिवासींशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले.   केंद्रीय साहित्य अकादमी (१९५५), सोविएत लँड नेहरू पुरस्कार (१९७०) पद्मभूषण (१९८१) आदी  अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

कालमापनाची प्राचीन एकके

पंचागामध्ये तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग या पाच अंगांचा समावेश असतो.  पंचांगामध्ये ग्रहणांची वेळ आणि कालावधी यांचाही तपशील असतो. म्हणजे वेळेचे मोजमापन भारतात प्राचीन काळापासून अचूकपणे करण्यात येत होते, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. गतीचे मापन करण्यासाठी कालमापन अत्यावश्यक आहे, हे आपण जाणतोच. खगोलशास्त्र किंवा ग्रहगतीशास्त्र यामध्ये कालमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्यचंद्रांच्या राशींमधून होणाऱ्या भ्रमणावर आधारलेली एक सुंदर व परिपूर्ण अशी कालगणनेची पद्धत प्राचीन भारतीयांनी विकसित केली.

पंचांगामध्ये असणाऱ्या चंद्रोदय आणि सूर्योदय यांच्या वेळा, सूर्यग्रहण किंवा चंद्र ग्रहणाचे कालावधी आणि ग्रहांचे भ्रमणवेग शोधण्यासाठी त्यांची पृथ्वीपासूनची अंतरे माहीत असलीच पाहिजेत; पण त्याचबरोबर कालमापनही अधिकाधिक अचूकपणे करणे आवश्यक आहे.

सूक्ष्म कालावधी मोजण्यासाठी प्राचीन काळी परमाणु, अणू, त्रसरेणू, त्रुटी, वेध, लव, निमेष, क्षण, काष्ठा, घटिका, पळे  अशी अनेक एकके भारतामध्ये अस्तित्वात होती; असे प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येते.

एक काष्ठा  म्हणजे दहा वेळा पापण्यांची उघड-झाप होय. १ परमाणु = ०.००००१६८ सेकंद (सुमारे); ५ गुर्वाक्षरे = १ काष्ठा ;  १ दिवस (= १४८८०० काष्ठा) = ८६४०० सेकंद.  म्हणजे १ सेकंद हा १.७२२२..  इतक्या काष्ठांचा असे म्हणता येते. इतकी सूक्ष्म कालगणना प्राचीन काळी अस्तित्वात होती. ही एक आश्चर्यचकित करणारी बाब आहे. पंचांगात असणारी तिथी, नक्षत्र, करण, योग या चार अंगांची माहिती किंवा तपशील जगातल्या इतर कोणत्याही कॅलेंडर्समध्ये आढळून येत नाही.

हिंदू खगोलशास्त्रात वर्ष संवत्सर, युग, महायुग, मन्वंतर, कल्प अशी एकापेक्षा एक मोठी कालमापने दिलेली आहेत. एक कल्प म्हणजे ४३२ कोटी वर्णे, ब्रह्मदिनाच्या प्रारंभापासून  शालिवाहन शकाच्या प्रारंभापर्यंत एकंदर ६ मन्वंतरे, कृतवर्यतुल्य ७ संधी, २७ युगे, कृत, त्रेता, द्वापार ही युगचरणे

आणि कलियुगाच्या प्रारंभापासून ३१७९ वर्षे इतका काळ उलटला असे मानले जाते. हा एकंदर कालावधी १,९७२,९४७,१७९ वर्षे इतका आहे. ही माहिती आपल्याला थक्क करणारी आहे.

प्रा. दिलीप गोटखिंडीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org