यास्मिन शेख

हे वाक्य वाचा- ‘‘मराठीतील प्रतिथयश साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले होते.’’ या वाक्यातील आशय लक्षात येतो; पण एका शब्दाचे सदोष रूप लक्षात येईलच असे नाही. तो शब्द आहे- ‘प्रतिथयश’ या शब्दातील पहिला शब्द ‘प्रतिथ’याला काहीच अर्थ नाही. योग्य शब्द आहे ‘प्रथितयश’. प्रथित शब्दामध्ये धातू आहे प्रथ् (संस्कृत) अर्थ- पसरणे, प्रख्यात होणे. या धातूपासून विशेषण होते- प्रतिथ (सं.) अर्थ – प्रख्यात. यश (सं.) अर्थ-कीर्ती. प्रथितयश या शब्दाचा अर्थ आहे- ज्याची किंवा जिची कीर्ती प्रख्यात आहे असा किंवा अशी. प्रथ् या धातूपासून नाम (सं-नाम, स्त्रीलिंगी) होते – प्रथा – अर्थ – चाल, रूढी, प्रख्याती, प्रथितयश या शब्दाचा अर्थ योग्य आहे. आणि तोच शब्द वरील वाक्यात वापरणे आवश्यक आहे. ‘प्रतिथयश’ हा शब्द निर्थक आहे. वरील वाक्य असे हवे – ‘मराठीतील प्रथितयश साहित्यिक वि. स. खांडेकर..’
अशाच आणखी एका चुकीच्या शब्दाची योजना आपण वारंवार करतो. वाक्य- ‘त्याच्या म्हणण्याचा मतितार्थ तुझ्या लक्षात आला का?’ मतितार्थ शब्द सदोष आहे; खरे म्हणजे अर्थशून्य आहे. निर्दोष, योग्य शब्द आहे- ‘मथितार्थ’. मथ् (संस्कृत धातू) अर्थ घुसळणे. मथ्पासून साधलेले विशेषण आहे – मथित. अर्थ आहे – घुसळून काढलेला. चर्चा, वाद किंवा परीक्षण यांतून निघालेला. ‘मथितार्थ’ या शब्दाचा अर्थ आहे- घुसळून काढलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष, तात्पर्य. (‘अर्थ’ या शब्दाचा अर्थ आहे- चर्चेतून, परीक्षणातून निघालेला.) आणखी एक चुकीची पण रूढ असलेली वाक्यरचना अशी – ‘माझ्या मित्रावर इतकी संकटे आली, त्यामुळे त्याची झालेली दुरावस्था पाहवत नाही.’ या वाक्यात शब्दाचे चुकीचे रूप आहे- दुरावस्था. दुर किंवा दु: – शब्दाच्या आधी येणारा उपसर्ग. दुर अवस्था = दुरवस्था (दु:-वाईट) शब्दाचा अर्थ आहे – वाईट अवस्था. ‘दुरवस्था’ हा शब्द योग्य. असेच काही शब्द- दुर्दशा, दुर्दैव, दुर्बुद्धी, दुराचार, दुरात्मा, दरुगध, दुर्गुण, दुबरेध (कळण्यास कठीण), दुर्मिळ- (मिळण्यास कठीण) इत्यादी.

Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Disruption, entrepreneur, startup ,
 Disruption- मन्वंतर: प्रतिशब्द : अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 
Story img Loader