फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing the palm (मस्का लावणे) अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणदेखील आहे. ग्रीज हे पेट्रोलियम बेस ऑइल (प्राथमिक स्वरूपाचे, निर्वात उध्र्वपातनाने मिळालेले वंगणतेल) आणि विविध प्रकारचे साबण यांचे मिश्रण होय. हे साबण गरजेनुसार कॅल्शियम, लिथियम, सोडियम, बेरियम, अ‍ॅल्युमिनियम, टिटेनियम या धातूंपासून बनविलेले असतात. काही ग्रीजेसमध्ये बेंटोनची माती, सिलिका, पॉलीयुरिया यांसारखे पदार्थ ‘थिकनर’ म्हणून वापरतात. काही ग्रीजेसमध्ये आवश्यकतेनुसार रासायनिक पुरकेदेखील मिसळली जातात. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या ग्रीजमध्ये द्रव्यमाध्यम म्हणून प्रामुख्याने पॅराफिनिक किंवा नॅफ्थानिक स्वरूपाच्या पेट्रोलियम तेलांसोबतच वनस्पती तेले आणि सिंथेटिक तेलेसुद्धा वापरली जातात. याशिवाय, विविध प्रकारच्या ग्रीजेसमध्ये अँटी ऑक्सिडंट, एक्स्ट्रिम प्रेशर, अँटीरस्ट, पोर पॉइंट डिप्रेसंट, व्ही. आय. इंप्रुवर इत्यादी रासायनिक पुरके मिसळतात.
एखादे ग्रीज किती कठीण वा मृदू आहे हे त्याच्या दृढता-कसोटी (कन्सिस्टंसी) वरून अजमावले जाते. त्यासाठी ग्रीजचा भेदन बिंदू (पेनेट्रेशन पॉइंट) तपासावा लागतो. भेदन िबदू ठरविण्यासाठी २५ अंश सेल्सिअस तापमानाला पेनेट्रोमीटरमधून सोडलेली सुई किंवा शंकू ५ सेकंदात ग्रीजमध्ये किती खोलीपर्यंत आत घुसते हे मोजले जाते. गतीने फिरणाऱ्या यंत्रात मृदू ग्रीज वापरावे लागते तर संथ गतीच्या यंत्रसामग्रीसाठी कठीण ग्रीज लागते. खूपच मऊ असलेल्या ग्रीजची भेद्यक्षमता ४४५-४७५ असते तर कठीण ग्रीज ४०-७० भेद्यक्षमतेचे असते. ज्या तापमानाला ग्रीजमधले वंगणतेल साबणापासून वेगळे होते त्यास ‘अलग-बिंदू’ (ड्रॉप पॉइंट) म्हणतात. उच्च तापमानाला कार्यरत असणाऱ्या यंत्रणेसाठी उच्च अलग-बिंदू असलेले ग्रीज वापरावे लागते. घर्षण व यंत्रभागांची नासधूस रोखणे, गंजण्यापासून रक्षण, कचरा, पाणी, धूळ या बाह्य़ घटकांपासून बेअिरग्जचे रक्षण, वंगणाची गळती होऊ न देणे, तापमानाच्या विस्तारित कक्षेत कार्यरत राहणे, यंत्राच्या गतिशिल भागात अडथळा न आणणे, पाण्याचा अंश थोपवून धरणे इत्यादी कारणांसाठी ग्रीजची गरज असते.
जोसेफ तुस्कानो, (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

 प्रबोधन पर्व

राष्ट्रवादीबाण्याचे जहाल पत्रकार – शि. म. परांजपे
‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा शिक्षक आणि सहकारी म्हणून सहवास आणि मार्गदर्शन लाभलेल्या शि. म. परांजपे यांनी ‘काळ’ या आपल्या वर्तमानपत्रातून ‘केसरी’प्रमाणेच निर्भीड पत्रकारिता केली. त्यामुळे त्यांना ‘प्रखर राष्ट्रीय बाण्याचे पत्रकार’ म्हटले जाते. अनुप्रास, व्याजस्तुती, व्याजनिंदा इत्यादी साधनांचा वापर करून परांजपे सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक अपप्रवृत्तीवर कडाडून आणि प्रसंगी जहाल वाटावी इतकी कठोर टीका करत. उपरोध हे खास परांजपे यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्याइतका उपरोध आणि वक्रोक्ती-व्याजोक्तीचा वापर त्याआधी कुणीही केला नव्हता. परकीय सत्तेचे दडपण झुगारून देत त्यावर मर्मभेदी टीका करतानाच महाराष्ट्रीय जनतेलाही परांजपे यांनी खडबडून जागे करण्याचे काम आपल्या लेखनातून केले. लोकमान्य टिळकांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे, ‘‘लोकमत जागृतीसाठी परांजपे यांच्या मार्मिक, मुद्देसूद लेखांची मदतच होईल.’’ परांजपे हे सशस्त्र क्रांतिकारकांचा पुरस्कार करणारे पत्रकार होते. त्यांनी या क्रांतिकारांचा गौरव करणारे लेखही लिहिले. याचबरोबर संस्कृत साहित्यावर परांजपे यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. लालित्याने नटलेली काव्यात्म भाषा हेही त्यांचे एक उल्लेखनीय वैशिष्टय़. त्यांनी जवळपास एक हजाराहून अधिक लेख ‘काळ’मधून लिहिले. त्यातील निवडक लेखांचा ‘काळातील निवडक- भाग १ त १०’मध्ये समावेश केला आहे. त्यांच्या लेखनाने तत्कालीन समाजामध्ये पारतंत्र्याविषयी चीड निर्माण करून स्वातंत्र्याविषयीची जागरूकता वाढवण्याचे काम केले. लोकमान्य टिळकांच्या बरोबरीने पत्रकार म्हणून गाजलेल्या या राष्ट्रवादी पत्रकाराचे न. र. फाटक यांनी सविस्तर चरित्र लिहिले आहे. ब्रिटिश सरकारने ‘काळ’वर बंदी आणल्यावर त्यांनी काही काळ ‘स्वराज्य’ हे वर्तमानपत्रही चालवले. पांडित्य आणि प्रतिभा यांचा उत्कट मिलाफ असलेले परांजपे पुढे म. गांधींचे अनुयायी झाले. ‘शिवरामपंत गेले, पण ‘काळ’कत्रे जिवंत आहेत’ असे उद्गार परांजपे यांच्या निधनानंतर स्वा. सावरकर यांनी काढले होते. त्यातून त्यांच्या वैचारिक योगदानाची पुरेशी कल्पना येते.

मनमोराचा पिसारा
बॉडी लर्निग म्हणजे काय रे भाऊ?
मानसी, पकलोय मी! तुझ्या स्वभावामुळे!! म्हंजे कान फिटले माझे. तुला काहीही सांगा, तू उत्साहानं ‘हो’ म्हणतेस. ‘खरंच रे! अगदी बरोबर आहे तुझं!’ डोक्याकडे बोट दाखवून म्हणतेस. पटलंय. कळलंय! मग मात्र तुझा चेहरा जरा ओशाळा होतो, तुझ्या डोळ्यातली चमक मंदावते आणि म्हणतेस, ‘कळतंय रे वळत नाही ना!’ या तुझ्या न वळणाऱ्या सरळ मनाच्या सवयीला मी कंटाळलोय. मानसी किंचित कसनुसं हसली आणि म्हणाली, ‘हे पण कळतंय पण.’ ‘वळत नाही, असंच ना!’ मानस म्हणाला.
मानसी, स्त्रियांच्या बाबतीत हे ‘कळतं पण वळत नाही’ जरा जास्त प्रमाणात होतं. ‘म्हणजे?’ मानसी, डोळे वटारून म्हणाली, ‘तू पण ना तसलाच, बायकांना डोकं कमीच! असं म्हणणारा.’
‘नाही गं, तू माझं दुसरं रूप आहे, तू नि मी एकच नाही का? स्त्रिया जन्मताच अधिक भावनाशील असतात त्यामुळे! त्यांच्या बाबतीत कळतं पण वळत नाही हे अधिक खरं ठरलं, पण पुरुषदेखील कळतं, पण वळत नाही ही सबब काही कमी वेळेला पुढे करीत नाहीत.’ व्यायामाचा कंटाळा, योगासनांची टाळाटाळ दोघेही करतात. मानसी, तुला आता एक अस्सल फंडा सांगायचाय. हे बघ आपण शिकतो म्हणजे ‘लर्न’ करतो ना त्याच्या दोन मुख्य पायऱ्या. ‘माइंड लर्निग आणि बॉडी लर्निग.’
मानसीचे डोळे चमकले,
‘बॉडी लर्निग म्हणजे काय रे भाऊ? बॉडी बिल्डिंग ऐकून आहे पण.’ मानसी म्हणाली.
बॉडी लर्निग म्हणजे बुद्धीने कमावलेलं ज्ञान, माहिती किंवा एखादी आयडिया शरीरानी स्वीकारणं, अंगी बाणावणं. एखादी गोष्ट किंवा कौशल्य पूर्णपणे आत्मसात करणं, त्यावर ‘मास्टरी’ मिळविणं. अगदी साधं उदाहरण घेऊ. सायकल कशी चालवायची? हे दोन-चार वाक्यात सहज सांगता येतं. सायकलवर बसायचं बॅलन्स सांभाळायचा, पँडल मारायचं आणि हँडलनं नीट पकडायचं. झालं! हे झालं माइण्ड लर्निग. फारतर चार-दोन आकृत्या काढून, सायकल चालवून दाखवून माइंड लर्निग पूर्ण होतं. आता सांग, इतकं कळून, सायकल चालविता येईल का?
‘नाही! मानसी उत्साहानं म्हणाली, इथे माइण्ड लर्निग झालं, पण बॉडी लर्निग झालं नाही. कारण, सायकल चालवायला येण्याकरिता प्रॅक्टिस करावी लागते, पायांना नियमित हालचालींची सवय लागते, बॉडीचा बॅलन्स सांभाळायला शिकावं लागते. ढोपरं फुटतात, सायकलसकट पडावं लागतं. चेननं हात काळे व्हावे लागतात. पुन: पुन्हा सराव केला की बॉडी लर्निग होतं. मानस म्हणाला.
. आणि बॉडी लर्निग करता चिकाटी लागते, पुन: पुन्हा चुकलो तरी सोडून न देता प्रयत्न करावे लागतात. मन कंटाळतं, नाराज होतं आणि बॉडी आळशी होते म्हणून बॉडी लर्निग होत नाही. मानस
‘वळतंय, वळतंय म्हणजे कळायला लागलंय.’ मानसी उत्साहानं म्हणाली, तिचे डोळे चमकू लागले. चल लेटस् टेक द फर्स्ट लेसन. बॉडी लर्निग!!
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com