कुतूहल : सांगवडेवाडीची गटशेती
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु असे अनेक अल्पभूधारक शेतकरी एकत्र आले तर गटशेतीतून ते आपल्या बऱ्याचशा अडचणींवर मात करू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडेवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या उदाहरणातून हे दाखवून दिले आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतातील कामे, वाहतूक, बाजारातील स्पर्धा, उत्पादनखर्च इत्यादी समस्या भेडसावतात. सांगवडेवाडीतील असे समस्याग्रस्त शेतकरी एकत्र आले. त्यांनी आपला गट बनवला. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला गटाची बठक घेण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. खते, किडी, बियाणे, पीकसंरक्षण इत्यादींबाबत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चच्रेद्वारे त्यांनी मार्ग काढले. नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन त्याची देवाणघेवाण केली. भविष्यातील कामांचे नियोजन केले.
शहराजवळ असल्याने आपल्या शेतातील भाजीपाला तिथे निश्चितपणे विकला जाईल, याची खात्री वाटल्यामुळे त्यांनी शेतात टोमॅटो, वांगी, काकडी अशा भाजीपाला पिकांची लागवड केली. गटाने एकत्र खरेदी केल्यामुळे रोपवाटिकेतून रोपे स्वस्तात मिळाली. कमी क्षेत्रावर पूर्वी न परवडणारी ठिबक सिंचन पद्धत गटशेतीत वापरणे सोयीचे ठरले. एकत्रितपणे खते खरेदी केल्यामुळे प्रत्येक पोत्यामागे ४० ते ५० रुपयांची बचत झाली. शिवाय ही खते बाजारात जाऊन आणण्याची गरज भासली नाही. बांधावरच ती उपलब्ध झाली. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत झाली. गटामुळे किडींपासून पिकांचे रक्षण करणाऱ्या सापळ्यांवर अनुदान मिळाले. त्यामुळे फवारणीचा खर्च कमी झाला. एकत्रित लागण, तोडणी, वाहतूक करता येऊ लागली. मजुरांची गरज कमी भासू लागली. एका एका शेतकऱ्याला लागणारा उत्पादनखर्च गटशेतीमुळे विभागला गेला व नफ्याचे प्रमाण वाढले. पिकवलेल्या भाजीपाल्याची ते जिल्ह्याच्या ठिकाणीच विक्री करू लागले. तोडणी केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी आता सर्वच शेतकऱ्यांना जावे लागत नाही. गटातील एक-दोन शेतकरी जातात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचा वेळ, खर्च, ऊर्जा यांतही बचत झाली.
कृषी विभागाच्या सहकार्याने गटाने फळे व भाज्या यांवर प्रक्रिया करण्याबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यामुळे पिकाला योग्य दर मिळाला नाही तर त्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे फायदा मिळवण्याची सोय उपलब्ध झाली.
– प्रतिनिधी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
कुतूहल : सांगवडेवाडीची गटशेती
कुतूहल : सांगवडेवाडीची गटशेती अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु असे अनेक अल्पभूधारक शेतकरी एकत्र आले तर गटशेतीतून ते आपल्या बऱ्याचशा अडचणींवर मात करू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडेवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या उदाहरणातून हे दाखवून दिले आहे.अल्पभूधारक …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-06-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Group agriculture of sangvadewadi