सुफींच्या चिश्ती या संप्रदायाचे भारतातील संस्थापक ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी हे मूळचे पर्शिया म्हणजेच इराणचे. अजमेर येथे राहून कार्य करणाऱ्या हजरत मोईनुद्दीन चिश्तींबद्दल राज्यकत्रे, अमीर, उमराव, श्रीमंत गरीब तसेच सर्व जाती-धर्माचे लोक अपार श्रद्धा बाळगून आहेत, त्यांच्या अजमेर येथील गरीब नवाज दग्र्यापुढे लोक अद्यापही नतमस्तक होतात. या दग्र्याला अकबर, जहांगीर, शाहजहानसारख्या प्रबळ राज्यकर्त्यांनीही भेटी दिल्या. मोईनुद्दीन चिश्तींना त्यांचे भक्तगण ‘गरीब नवाज’, ‘कुतूबुल’, ‘सुलतानुलसालीकीन’ (साधकांचा राजा), ‘शमशुल फुक्रा’ (फकिरांचा सूर्य) वगैरे निरनिराळ्या नावांनी गौरवितात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूफी या पंथातील ‘चिश्तिया’ विचारप्रणालीचा पाया इराणमधील चश्त या शहरात अबू इसहाक शामीने घातला आणि त्यामुळे सुफींच्या या उपशाखेचे नाव चिश्ती झाले. हिंदुस्तानात चिश्ती विचारप्रणाली आणून तिचा प्रसार करणारे ख्वाजा मोईनुद्दीन यांचा जन्म पर्शिया ऊर्फ इराणमधील सिस्तन प्रांतातील संजर या गावात इ.स. ११४१मध्ये झाला. इस्लामी संस्कृतीत ख्वाजा मोईनुद्दीनचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मोईनुद्दीनने बालवयातच शिक्षणासाठी आपले संजर हे गाव सोडले आणि ते समरकंद येथे गेले. तेथे कुराण आणि इतर धर्मग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. शिक्षण संपल्यावर प्रसिद्ध सूफी शेख उस्मान हारूनी यांच्याकडून सूफी पंथाची दीक्षा मोईनुद्दीननी घेतली, गुरूसेवेत राहून त्यांच्याबरोबर भ्रमंती करून त्यांनी अनेक सुफी संतांच्या भेटी घेऊन चर्चा-संवाद घडवून आणले. गुरू शेख उस्मान हारुनींबरोबर मोईनुद्दीन यांनी मक्का-मदिनेची यात्रा केली. मदिनेत मुक्कामी असताना ख्वाजा मोईनुद्दीनना हजरत पगंबरांचा साक्षात्कार झाला असे म्हटले जाते. भाविकांचा असाही समज आहे की, साक्षात्कारात हजरत पगंबरांनी मोईनुद्दीनना असा संदेश दिला की, ‘तू माझा सच्चा भक्त आणि मित्र आहेस, तू यापुढे हिंदुस्थानात जाऊन इस्लाम आणि सुफी मताचा दिव्य संदेश तिथल्या लोकांमध्ये पोहोचव. या महत्त्वाच्या कार्यासाठीच तुझी अल्लाहने नेमणूक केली आहे!’        (पूर्वार्ध)

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com