तेराव्या शतकात हजरत शेख निझामुद्दीन औलिया (अवलिया) हे भारतीय उपखंडातील सर्वाधिक लोकांची श्रद्धा मिळविलेले सूफी संत होऊन गेले. लोकांनी ‘महबूब- ए- इलाही’, ‘कुतुब-ए-देहली’, ‘दस्तगीर-ए-दोहजा’, ‘सुलतानुल मशायख’ इत्यादी उपाध्या दिलेल्या निझामुद्दीनांचे मूळ नाव होते बीन अहमद दानियक-अल-बुखारी. त्यांचा जन्म इ.स. १२३८ साली उत्तर प्रदेशातील बदायूं येथील. मूळचे तुर्की वंशातील निझामुद्दीनचे पूर्वज बुखारा (उझबेकिस्तान) येथे स्थायिक झाले होते. पुढे त्यांच्या आजोबांनी बदायूं येथे स्थलांतर केले. निझामुद्दीनचे वडील सय्यद अब्दुल्ला यांच्या मृत्यूनंतर आईसोबत ते दिल्लीत स्थायिक झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोरवयातच तसव्वूफ म्हणजे सूफी तत्त्वज्ञानामुळे प्रभावित झालेले निझामुद्दीन, सूफी संत फरीदुद्दीन गंजे शक्कर ऊर्फ बाबा फरीद यांचे शिष्य बनले. निझामुद्दीन अवघे २० वर्षांचे असताना बाबा फरीदने त्यांना आपले खलिफा नियुक्त करून दिल्लीला पाठविले. शिष्याला खलिफा नियुक्त करणे म्हणजे त्याला त्याचा शिष्यगण तयार करण्याची परवानगी देणे . दिल्लीच्या परिसरात गियासपूर येथे निझामुद्दीननी खानखाह बांधला. खानखाह म्हणजे फकीर, संत यांचा मठ, अध्ययन -अध्यापनाची जागा. हजरत निझामुद्दीन यांनी त्यांचा मृत्यू इ.स. १३२५ मध्ये झाला तोपर्यंत सूफी पंथातील चिस्ती संप्रदायाची दीक्षा देण्याचे काम नियोजनबद्धतेने केले. शेकडो शिष्य निर्माण करून िहदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत सूफी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांना पाठविले.

साधारणत: ७० वर्षांच्या कारकीर्दीत निझामुद्दीन यांनी दिल्लीवरील सल्तनतींच्या सात सुलतानांची कारकीर्द जवळून पाहिली. त्यांच्या शिष्यगणात शेख नसीरुद्दीन चिराग देहलवी, अमीर खुस्रो यांचा समावेश आहे. निझामुद्दीन यांचा दर्गा आणि कबर दक्षिण दिल्लीत आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com