|| डॉ. श्रुती पानसे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वयाची पहिली दोन वर्ष भाषाशिक्षणासाठी चांगली असतात. या काळात आसपासचे सर्व आवाज मुलांचे कान टिपत असतात. घरच्या, शेजारच्या माणसांकडून, नातेवाईकांकडून ज्या भाषा सहजरीत्या मुलांच्या कानावर पडतात, त्या त्यांना बोलता येऊ शकतात. जन्मापासून जी मुलं एकापेक्षा जास्त भाषांच्या/ भाषिकांच्या संगतीत असतात, त्यांना कमी-अधिक प्रमाणात त्या सर्व भाषा समजतात. मुलांना या भाषांमध्ये व्यक्त होण्याच्या संधी मिळाल्या तर मुलं या भाषा बोलूही शकतात.
मात्र एक लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे मुलं भाषा आत्मसात करत असतात; शिकत नसतात. त्यामुळे मुद्दाम शिकवायला जाऊ नये. त्यात सक्ती आणि जबरदस्ती आली तर मूल सहजपणे भाषा आत्मसात करू शकणार नाही. मेंदूची ही क्षमता लक्षात घ्यावी आणि सहज- पूरक वातावरण तयार करता आलं तर करावं. मुद्दाम शिकवायला जाऊ नये. तसं झालं तर विपरीत परिणाम होतो.
नवीन माणूस भेटतो तेव्हा
जेव्हा एखादा नवीन माणूस भेटतो तेव्हा डोळे आणि मेंदू कामाला लागतात. नवी माहिती साठवण्याच्या दृष्टीने मेंदू विविध भागांना आदेश सोडतो. दृश्य क्षेत्र (व्हिज्युअल कॉर्टेक्स) हा भाग चेहरा लक्षात ठेवतो. इथं त्या माणसाचे कपडे, त्या कपडय़ांचा रंग, आसपासचा परिसर, मागची दृश्यं हीदेखील तिथंच साठवली जातात. त्या माणसाचं नाव मेंदूच्या डाव्या भागात असलेल्या भाषेच्या क्षेत्रात साठवलं जातात. त्या माणसाचा आवाज, त्याच वेळेला ऐकू येणारे इतर आवाज हे ऑडिटरी कॉर्टेक्समध्ये साठवले जातात.
या माणसाला पुन्हा आठवायचं झाल्यास आपल्या लक्षात येतं की, आपलं त्याच्याकडे किती लक्ष होतं. तो माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आपण त्या वेळी खूप घाईत होतो का, आपला मूड चांगला होता की वाईट, यावरून त्या माणसाचे कमी-अधिक प्रमाणात बारकावे आपल्या लक्षात राहतील. तो माणूस आपल्याला फारसा महत्त्वाचा वाटला नाही तर फारसा लक्षातही राहत नाही.
contact@shrutipanse.com