मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले की त्याचं कारण शोधण्यासाठी आयक्यू टेस्टिंग करून घेतात. मात्र या टेस्टचे निष्कर्ष हेच अंतिम सत्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या चाचणीत ज्यांचा गुणांक चांगला आला आहे, त्यांनी खूश व्हावं अशीच परिस्थिती असते. पण ज्यांचा बुद्धिगुणांक कमी येतो, ती मुलं मात्र स्वत:च्याही नजरेतून उतरतात. आपण हुशार नाही ही भावना त्यांच्या मनात घर करून बसते. त्यांच्यासह शिक्षक आणि पालक हेही समजून जातात की हे मूल हुशार नाही. आयक्यूच धड नाही, तर मार्क कुठून मिळणार आणि आता कसं होणार, असे प्रश्न निर्माण होतात.
अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता चाचण्यांमधला हा धोका आता लक्षात आला आहे. आयुष्यात मिळणारं यश आणि बुद्धिगुणांक यांचा काही संबंध आहे का, याचा शोध घ्यायला जाणकारांनी सुरुवात केली आहे. त्यातून या चाचणीची मर्यादा लक्षात येते आहे. या चाचण्यांमधून प्रामुख्याने ‘भाषा’ आणि ‘गणित’ / ‘तर्क’ तपासलं जातं. जे या दोन क्षेत्रांत बऱ्यापैकी पातळी गाठून असतात, त्यांचा बुद्धिगुणांक चांगला येतो. जे खेळात, संगीतात, विविध हस्तकौशल्यांत अव्वल असतील त्यांच्यासाठी या चाचणीत प्रश्न तयार केलेले नसतात. याचा अर्थ त्यांना बुद्धी नसते असा घेता येत नाही.
सर्वात महत्त्वाची आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपल्या शाळांमध्येही भाषा (सर्व विषय भाषेत येतात) आणि गणित या दोन विषयांचा जास्त पगडा आहे. जे या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, ते साहजिकच बुद्धिमान समजले जातात. बाकीचा खूप मोठा वर्ग या परिघाच्या बाहेर राहतो. तो बुद्धिमान समजला जात नाही. ही यातली अतिशय वाईट बाजू आहे. साधारणपणे कोणत्याही वर्गात पहिले नंबर मिळवणारी ८ ते १०% मुलं सोडली तर इतर मुलांना शालेय काळात बहुसंख्य वेळा स्वत:च्या बुद्धीचा शोध लागत नाही. एवढं मात्र नक्की कळतं की ‘आपण यातले नाही!’
त्यांच्या मेंदूमध्ये असलेल्या विविध क्षेत्रांत जुळलेले न्युरॉन्स हीच खरी बुद्धी आहे. या अथांग बुद्धीचा शोध लावण्यासाठी मुलांना मदत केली पाहिजे.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com