अर्जुनाने लक्ष केंद्रित केलं आणि त्याला आसपासचं काहीच न दिसता फक्त पक्ष्याचा डोळा दिसायला लागतो, अशी गोष्ट सांगितली जाते. हे कशामुळे शक्य होतं? एक उदाहरण. अनेक वर्षांपूर्वी ज्या वास्तूला भेट दिलेली असते, तिथेच पुन्हा जातो. ती वास्तू सापडत नाही. तिथल्या जुन्या खाणाखुणा आपण शोधायला जातो. आठवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आसपासच्या सर्व विचारांमधून आपलं लक्ष कमी होतं, कारण आपला मेंदू फक्त एकाच ठिकाण लक्ष केंद्रित करतो ते म्हणजे आपल्या स्मरणात असलेली ती जागा. मेंदू जोरदार मदत करायला घेतो. ती वास्तू, त्याच्या आसपासचे रस्ते, दुकानाच्या पाटय़ा अन्य बारीक-सारीक तपशील हे डोळ्यासमोर दिसत राहतात. यासाठी विविध पेशी आपल्याला पुन्हा पुन्हा माहिती पुरवत राहतात. जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माहिती पुरवत राहतात. या वेळी इतर गोष्टी अंधुक झाल्यासारख्या वाटतात किंवा भासतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा