श्रुती पानसे contact@shrutipanse.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या घराघरातून परीक्षेचं गरम वारं वाहतं आहे. हे वारं आधी पालकांच्या अंगात शिरतं. ते मुलांच्याही अंगात शिरावेत, यासाठी ते अथक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांच्या आड त्यांचीच काही वाक्यं येतात ही वाक्यं मुलांच्याच नाही, तर त्यांच्याही मेंदूशी मत्री करणारी नसतात.

आपल्या मुलामुलींची परीक्षा डोक्यावर आहे, पण त्यांना कसलंच गांभीर्य नाही, हा एक सगळ्यांचाच प्रमुख आक्षेप असतो. आणि त्यातूनच त्यांच्यावर नकारात्मक शिक्के बसतात. असे शिक्के मारण्याची सवय खूप जणांना असते.

असे शेरे  बाहेरच्या माणसांसमोर मारले तर मूल कमालीचं दुखावतं. लोकांसमोर त्यांना ओशाळवाणं वाटतं.  वरवर कितीही बिनधास्तपणे वागत असलं तरी मनातून त्याला काय होतंय, हे घरातल्यांनी- आई-बाबांनी तरी समजून घेतलंच पाहिजे. घरातून- आपल्या माणसांकडून त्याला सुरक्षितता हवी असते. पण समजा ही सुरक्षितता मिळाली नाही. सतत टीका सहन करावी लागली तर मूल घरच्या माणसांपासून तुटतं. हे व्हायला नको असेल तर काही वाक्यं पालकांनी टाळायलाच हवीत.

‘तू इतरांसारखा हुशार नाहीस. म्हणून.’, ‘तिला बघ किती चांगले गुण मिळालेत. नाही तर तू..’  अशासारखी वाक्यं निदान परीक्षेच्या काळात तरी उच्चारू नयेत. नकारात्मकता नकोच. या वाक्यांमुळे अभ्यासाला बसण्याची इच्छा होत नाही. आपल्याला इतरांसारखे चांगले गुण मिळत नाहीत. कसे मिळणार? आपण काही हुशार नाही. आपण कधीच इतरांसारखे हुशार होऊ शकत नाही. आपण हुशार असतो तर आई-बाबांना आवडलो असतो. आता मात्र आवडत नाही,  विचारांची अशी साखळी मुलांच्या मनात स्वाभाविकपणे तयार होत जाते.

पालकांच्या इतकं काही मनात नसतं. आपल्या मुलांनी अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशा विचाराने पालक त्याला काही सुचवू बघत असतात. पण त्या वाक्यांचा चांगला परिणाम होण्याऐवजी नेमका उलटा परिणाम होत असतो. तो मुलांसाठी खूपच घातक ठरतो.

आपल्या  मुलांनी आयुष्यात छान उभं राहावं यासाठी पालकलोक दिवसभर भरपूर मेहनत करत असतात. मुलांनी योग्य दिशेला जावं, अशी त्यांची इच्छा असते. पण वागणं- बोलणं मात्र बरोबर विरुद्ध असतं; असं होतंय का?