परिधानयोग्य वस्त्रांचा व वस्त्रपद्धतींचा हा प्रवास जितका रमणीय तितकाच जागतिकीकरणाने भारतातील वस्त्र विश्वावर झालेला परिणाम. पूर्वी वस्त्र म्हणजे मानवी शरीराला संरक्षणासाठी आवश्यक असलेले कवच, एवढेच त्याचे कार्य समजले जाई. आता निरनिराळ्या क्षेत्रात वस्त्रशास्त्राने संशोधनाअंती औद्योगिक व तांत्रिक वस्त्रनिर्मितीत मिळविलेले यश आजमावूया.
यामध्ये भूगर्भ, अवकाश, वैद्यकशास्त्र, आधुनिक माहिती तंत्रज्ञान, डिजिटल (अंकात्मक) तंत्रज्ञान तसेच नेटवìकगमध्ये लागणारे फायबर ऑप्टिक्स या सर्वामध्ये सूत व वस्त्रांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
या सर्व तंत्रज्ञानांच्या कमी उत्पादन खर्चाच्या गरजांची परिपूर्ती हे वस्त्रशास्त्राचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतिशील संशोधनास योगदान आहे. या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची समन्वयात्मक भूमिका वस्त्र बजावत आहे. याचबरोबर तंत्रज्ञानाच्या संशोधनातील गरुडझेपेमुळे वस्त्रांच्या वाढत्या उपयुक्ततेस चालना मिळाल्याने वस्त्रांचा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये झालेला प्रवेश आपण अभ्यासणार आहोत. बांधकाम, अवकाशयान, डिजिटल (अंकात्मक) अशा अनेक तंत्रज्ञान क्षेत्रातील वस्त्रांचा चंचूप्रवेश व त्यामुळे ऊर्जा घेऊन येणाऱ्या पिढय़ांतील वस्त्रांनी स्वत:भोवती निर्माण केलेलं आभामंडल व त्यांची आकर्षकता या सदरामधील लेखांमधून अनुभवता येईल.
आतापर्यंत आपल्याला अवगत असलेल्या विणकाम (आडव्या/ उभ्या धाग्यांच्या) शास्त्रांव्यतिरिक्त साखळी अथवा शृंखला-वीण वस्त्रशास्त्र (निटिंग); तसेच विनावीण वस्त्रशास्त्र (नॉन-वोव्हन); त्याचे तंत्रज्ञान व यंत्रज्ञान, यामुळे संभव झालेले तांत्रिक वस्त्र हे बांधकाम क्षेत्र, अवकाशयान यामध्ये कसे वापरले जाते व त्यातही भारताने कशी गरुडझेप घेतली आहे याची माहिती आपण करुन घेऊ.
नसíगक व कृत्रिम स्रोतापासून तयार होणाऱ्या तंतू/ सूत/ वस्त्र याची माहिती तर आपण घेणारच आहोत. पण यातील संशोधनानी वस्त्रविश्वात आणलेली विविधता विलोभनीय आहे. या सर्वाचा आढावा या सदरातील लेखांमधे असेल. वस्त्रांचे रंग, छपाई, आधुनिक फिनििशग पद्धती, या सर्वामागचे तंत्रज्ञान या सदरातून आपण जाणून घेणार आहोत.
श्वेतकेतू मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा