मातीत  कोणते जंतू तग धरून राहातात आणि वाढतात, हे त्या मातीच्या गुणधर्मावर आणि त्या ठिकाणाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, कोंकणातल्या लाल मातीतली फॉस्फरसयुक्त संयुगे पाण्यात विद्राव्य नसतात. वनस्पतींप्रमाणेच सूक्ष्मजंतूंनाही फॉस्फरस या मूलद्रव्याची गरज असल्याने या मातीत निसर्गत: उपलब्ध असणाऱ्या अविद्राव्य फॉस्फेटचे पाण्यात विद्राव्य अशा रूपात परिवर्तन करणारे सूक्ष्मजंतूच अशा प्रकारच्या मातीत तग धरून राहातात. महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत लोहाची कमतरता असते. कारण या मातीत निसर्गत: असणारे लोह  जैव घटकांना उपयोगी पडत नाही. या लोहाचे रूपांतर जैव घटकांना उपयोगी प्रकारात करावे लागते. त्यामुळे जे सूक्ष्मजीव हे परिवर्तन घडवून आणू शकतात, तेच या मातीत तग धरून राहू शकतात. जर एखाद्या जमिनीत नायट्रोजनयुक्त संयुगांची कमतरता असेल तर हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करू शकणारे सूक्ष्मजंतूच अशा जमिनीत जिवंत राहू शकतील.
 थोडक्यात म्हणजे जमिनीत जी काही कमतरता आहे, ती दूर करू शकणाऱ्या सूक्ष्मजंतूंचे त्या जमिनीत अगोदरपासूनच वास्तव्य असते. अशा जमिनीत असणारी कमतरता नाहीशी  करण्यासाठी प्रयोगशाळेत वाढविलेल्या खास सूक्ष्मजंतूंची संवर्धने वापरा असे शेतकऱ्यांना सांगणे हा बनवाबनवीचाच प्रकार आहे. असे जंतू त्या जमिनीत बाहेरून घालण्याची अजिबात आवश्यकता नसते. कारण अशा प्रकारचे सूक्ष्मजंतू जमिनीत निसर्गत:च राहात असतात. गरज असते ती त्यांची जमिनीतली संख्या वाढविण्याची आणि यासाठी उच्च पोषणमूल्य असलेला कोणताही सेंद्रिय पदार्थ या जमिनीत घातला तर त्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते.
गहू, तांदूळ, ऊस अशा गवतवर्गीय पिकांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर सिलिका आढळते. हल्ली काही व्यावसायिक सिलिकॉनयुक्त संयुगे शेतात घाला असा प्रचार करीत आहेत, पण तसे करण्याचीसुद्धा काहीही आवश्यकता नसते. आपल्या मातीत मोठय़ा प्रमाणात सिलिकेट असते आणि मातीतलेच काही विशिष्ट सूक्ष्मजंतू हे सिलिकेट वनस्पतींना उपलब्ध करून देत असतात. त्यांना फक्त सेंद्रिय पदार्थ देऊन जमिनीतली त्यांची संख्या वाढविल्यास ते वनस्पतींना सिलिका उपलब्ध करून देतील.

 जे देखे रवी..      
हेन्री ग्रे चे शरीररचनाशास्त्र
शरीरचनेचा (अ‍ॅनाटॉमी) ग्रंथ लिहिणारे हेन्री ग्रे १८२७ ते १८५३ अशी फक्त ३६ वर्षे जगले, पण त्यांनी निदान साडेतीनशे वर्षे पुरेल असे काम रोवले. त्याच्या पुस्तकातल्या आकृत्या कार्टर नावाच्या त्याच्या सहव्याख्यात्याने काढल्या होत्या. हे कार्टर पुढे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात व्याख्याते होते. इंग्रजांनी इथे अनेक संस्थांमध्ये भरीव कामगिरी करून आपल्याला आधुनिक विश्वाच्या वेशीपर्यंत आणले ते कसे, हे अशा महत्त्वाच्या नेमणुका पाहूनही कळते.
हेन्री ग्रेच्या अ‍ॅनाटॉमीची जी नवी प्रत मी आणली, त्यात कार्टरच्या आकृत्यांखेरीज काही संगणकीय आकृत्याही आहेत. त्यामुळे हल्लीचे ग्रेचे पुस्तक मोठे आकर्षक आणि व्यवहारी झाले आहे. शरीर कसे घडते, याचे दाखले देत देत हे पुस्तक शस्त्रक्रिया कशी शक्य होते, हेही दाखवून देते. उदाहरण म्हणून थोडक्यात ११ मुद्दे इथे सांगतो.. (१) गर्भ एक मिलिमीटर वगैरे असतो तेव्हा त्यातल्या पेशींना भिंती नसतात. पेशींची केंद्रके मात्र स्पष्ट दिसतात.. जसे आकाशात तारे चमकतात, तशी! (२) पुढे पेशींना भिंती होतात, पण अतिसूक्ष्म असे वाहिन्यांचे जाळे तयार होते. (३) त्यानंतर या सूक्ष्म वाहिन्या एकत्र येतात, त्यातून मोठय़ा वाहिन्या तयार होतात. (४) या वाहिन्यांच्या आजूबाजूला स्नायू, हाडे, पापुद्रे बनत जातात. (५) हे सगळे होत असताना तेथे मज्जारज्जू हजर असतात.. त्यांच्याच इशाऱ्यावर ही रचना यशस्वी होत असते. (६) या सगळय़ा घडामोडींत धमनी ही कोठूनतरी आली आणि गेली स्नायूत वा त्वचेत, असे होत नाही. सगळी विधायक कार्ये हातात हात घालून होत असतात. (७) गावाचा आराखडा तयार व्हावा, गल्लीबोळ कुठे जाणार हे ठरावे आणि तसेच गाव वसावे, असे होत जाते. (८) रक्ताचा पुरवठा कसा होणार (धमन्या) आणि अशुद्ध रक्त कोठून जाणार (नीला) याचाही बंदोबस्त होतो. (९) आणि मग बाळाचे हृदय सुरू झाले, ठोके देऊ लागले की त्या गावात जणू दिवे लागतात आणि बाळ जिवंत होते. (१०) ही सारी क्रिया तीन साडेतीन महिन्यांत संपते.  बाळ अगदी लहान असते, पण त्याची संपूर्ण रचना तयार असते. (११) मग पुढील सहा महिने, तयार असलेले हे बाळ फक्त वाढते.
या मुद्दय़ांतला प्रत्येक महत्त्वाचाच, पण प्लास्टिक सर्जरीच्या दृष्टीने त्या वाहिन्यांच्या जाळय़ाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा. त्वचारोपण किंवा स्नायुरोपण करायचे असेल तर कोठल्या जाळय़ाची कोठली धमनी हे एकदा लक्षात आले की त्वचा किंवा स्नायूंना हलवून जखमा बऱ्या करणे सोपे होते.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Do You Know Which Animals can survive without oxygen
Animals That Live Without Oxygen: अविश्वसनीय! पण ‘हे’ प्राणी जगात ऑक्सिजनशिवाय जगू शकतात; कोणते ते घ्या जाणून…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
is Tiger hunt in yavatmal Decomposed body found in Ukani coal mine
वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
iit bombay researchers discover bacteria that prevent growth of pollutants in agricultural soil
शेत जमिनीतील वाढते प्रदूषक रोखणाऱ्या जीवाणूंचा शोध; आयआयटी मुंबईतील संशोधकांमुळे जमीन होणार सुपीक

वॉर अँड पीस
कृशता
काडीपैलवान असणे ही तरुण मुलामुलींच्या बाबतीत मोठी समस्या होऊन बसली आहे. वितभर छाती, चाळीस किलोच्या आत वजन, उंच शेकाटा किंवा खूप बुटके असणे अशा तक्रारी घेऊन पालक जेव्हा वैद्यकीय चिकित्सकांकडे येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. उंची वाढण्याला जशी वयाची मर्यादा आहे तसेच शरीरातील मांसल व मेदाचे भाग वाढण्यालाही मर्यादा आहेत. नेटाने दीर्घकाळ अचूक उपचार केले तर दहा-पंधरा टक्के वजन वाढणे शक्य होते. ते टिकविणे ही एक समस्या असते. उत्तम भूक, खाल्लेल्या अन्नाचे पचन या दोन गोष्टींच्या जोडीला किमान व्यायाम व मन प्रसन्न ठेवणे यांची नितांत गरज असते.
‘अचिंतया हर्षणेन ध्रुवं संतर्पणेन च।
स्वप्न प्रसंगाच्च कृशो वराह इव पुष्यति।।’ असा-
शास्त्रकारांचा सांगावा आहे. चिंता सोडावी, आनंदी राहावे, पुरेसे जेवावे व वेळेवर झोपावे. यामुळे कृश माणूसही पुष्ट होतो. आयुर्वेदीय औषधी महासागरात शेकडो बल्य औषधे आहेत. वर्तमानपत्रात भूलभुलैया करणाऱ्या जाहिरातीही खूप असतात. सर्वच कृश व्यक्तींना ‘सब घोडे बारा टक्के’ टॉनिक, कॅल्शियम, व्हिटॅमीन गोळय़ा अपेक्षित यश देत नाहीत. कारण आपण जे रोज खातो, पितो त्याचे चर्वण, त्याचे पचन, रसरक्तमांसादि धातूत रूपांतर झाले तरच अपेक्षेप्रमाणे वजन वाढते. दैनंदिन आहारात गहू, भात, मूग, चवळी, राजमा, उडीद, वाटाणा, हरबरा, शेंगदाणे, खोबरे, रताळे, बटाटा असे साधे, सोपे पदार्थ वजन वाढवू शकतात. मात्र हे पदार्थ पचविण्याकरिता, पाचकअग्नी सुधारण्याकरिता पिप्पलादि, पंचकोलासव असे काढे, पुदिना, आले अशी चटणी यांची योजना करावी, सामान्यपणे चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, शृंगभस्म, पुष्टीवटी या गोळय़ा, अश्वगंधारिष्ट हा काढा व रात्री आस्कंदचूर्ण घेतल्याने वजन निश्चयाने वाढते. पुरेसा व्यायाम, खारीक, बदाम, बेदाणा, सुके अंजीर, अक्रोड, काजू, पिस्ता, जर्दाळू व खजूर यांची मदत घ्यावी. जय बजरंग म्हणावे, भरपूर व्यायाम करावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
२४ जानेवारी
१८४३ > लेखक व कवी नागोराव गोविंद साठे यांचा जन्म. संतांच्या चरित्रांचे ओवीबद्ध निरूपण करणारी ‘लघुभक्तविजय’ ही काव्यरचना तसेच ‘ज्ञानचक्षू’ आदी अध्यात्मविषयक ग्रंथ त्यांनी लिहिले.
१९२४ > ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘इहवाद आणि सर्वसमभाव’, ‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय’ अशी- आजच्या प्रश्नांमागील तत्त्वचर्चा उलगडून दाखवणारी पुस्तके लिहिणारे विचारवंत व तत्त्वज्ञ मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म. ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास’ देखील त्यांनी मराठी वाचकांसाठी लिहिला. ‘नवभारत’ आणि ‘न्यू क्वेस्ट’ या नियतकालिकांचे संपादक म्हणून अनेक वर्षे ते कार्यरत होते, तसेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्षही होते. पुस्तक परीक्षणे, अनुवाद या प्रकारांतही काही लेखन मे.पुं.नी केले. त्यांच्या अनेक अप्रकाशित स्फुट लेखांची पुढे पुस्तके झाली, त्यापैकी ‘मर्मभेद’, ‘मे. पुं. रेगे यांचे टीकालेख’ (संपा. एस. डी. इनामदार), ‘मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ (संपा. सुनीती देव) आदी महत्त्वाची आहेत. २८ डिसेंबर २००० रोजी ते निवर्तले.
– संजय वझरेकर

Story img Loader