भारतातील वस्त्रविविधता
भारतात वस्त्रनिर्मिती पूर्वापार होत आलेली आहे. इतकेच नव्हे तर जवळपास प्रत्येक प्रांताची ओळख म्हणून काही वस्त्रे अजूनही बाजारात आपले स्थान टिकवून आहेत. पंजाबकडे स्वेटर, मफलर इत्यादी गरम कपडय़ांचा पुरवठादार म्हणून पाहिले जाते. बंगालची परंपरा कलकत्ता साडय़ांनी अबाधित राखली आहेच, शिवाय बालुचारी, कंथा, तंगल हे प्रकारही बंगालची ओळख करून देतात. आसाममधून येणाऱ्या मुगा सिल्क आणि एरी सिल्क साडय़ा आपले स्थान टिकवून आहेत. ईशान्य भारतातील मणिपुरी स्त्रिया आपली विणण्याची कला अजूनही जोपासत आहेत. लखनवी चिकन आणि बनारसी साडय़ांनी उत्तर प्रदेशचे स्थान निर्माण केले आहे. बिहारने तुस्सार व कंथा या प्रकारांनी आपला ठसा उमटवलेला आहे. छत्तीसगढचे नाव कोसा सिल्क आणि आदिवासी करत असलेल्या भरतकामामुळे मशहूर आहे तर ओरिसा बोमकाय व संबलपुरी ही आपली वैशिष्टय़े सांभाळून वस्त्रोद्योगात आपले स्थान टिकवून आहे. मध्य प्रदेशच्या चंदेरी, महेश्वरी साडय़ांचे स्थान आणि गुजरातची बांधणी साडी व कच्छी कशिदा आपापल्या प्रांतांचे झेंडे मिरवत आहेत. राजस्थानचे नाव टिकवून ठेवण्यात कोटा साडय़ा आणि ब्लॉक िपट्रचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राची शान पठणीत आहेच शिवाय सोलापुरी चादरीचे एक वेगळे महत्त्व आहे. कर्नाटकाची ओळख िपट्रेड आणि क्रेप सिल्क साडय़ा तसेच इरकली व शहापुरी लुगडी करून देतात. धर्मावरम, वेंकटगिरी, कलमकरी या साडय़ांमुळे आंध्र प्रदेश आपली ओळख टिकवून आहे तर तेलंगणाचा बोलबोला गढवाल, नारायणपेठ, पोचमपल्ली या साडय़ांमुळे होतो. तामिळनाडू कांजीवरम व कोइंबतूर सिल्कमुळे ओळखला जातो शिवाय होजियरी क्षेत्रातही तिरुपूरमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. याहीपेक्षा अधिक वस्त्रप्रकार भारतात आहेत. भारतात जेवढी जैवविविधता आहे तितकीच ही वस्त्रे विविध आहेत. या विविधतेत सर्वच वस्त्रे आपापली वैशिष्टय़े टिकवून आहेत. महात्मा गांधींच्या स्वयंपूर्णतेच्या विचाराशी हे सुसंगत असे कार्य आहे. इतकेच नव्हे तर आम जनतेची आवडनिवड भागवण्याची क्षमता या वस्त्रविविधतेत आहे.
संस्थानांची बखर
उदयपूर राणांची अखेरची कारकीर्द
उदयपूर महाराणा प्रतापसिंह प्रथमच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अमरसिंह उदयपूरच्या गादीवर आला. अमरसिंहाची बादशाह जहांगीरच्या मोगल सन्याबरोबर तीन वेळा युद्धे झाली. या तिन्ही युद्धांत अमरसिंहाचा पराभव झाल्यावर त्याने जहांगीराशी तह करून मोगलांचे मांडलिकत्व पत्करले. या तहान्वये चितोडगढचा किल्ला आणि उदयपूरचा मोगलांनी घेतलेला प्रदेश सिसोदियांच्या अमलाखाली परत आला. उदयपूरच्या गादीवर भीमसिंह इ.स.१७७८ मध्ये आला. या काळात उदयपूर राज्याची आíथक परिस्थिती अत्यंत डबघाईला आली होती. वेतन न मिळाल्याने अनेक मराठा सनिकांनी चितोडची लूटमार केली होती. अखेरीस १८१८ साली भीमसिंहाने ब्रिटिशांशी संरक्षणात्मक करार करून उदयपूर हे एक ब्रिटिशअंकित संस्थान झाले. उदयपूर संस्थानाचे राज्यक्षेत्र २७५०चौ.कि.मी. होते आणि ब्रिटिशांनी त्याला १९ तोफसलामींचा मान दिला. १९३० साली राजेपदावर आलेल्या भूपालसिंह ऊर्फ भोपालसिंह हा १९४७ मध्ये स्वतंत्र भारतात विलीनीकरणाच्या दस्तऐवजांवर सही करणाऱ्या प्रथम संस्थानिकांपकी एक होता. १९४८ साली भूपालसिंहाची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९४६ मध्ये त्याची भारतीय लष्करात मानद मेजर जनरलपदी आणि १९५४ साली लष्कराच्या ग्रेनेडियर विभागाच्या मानद कर्नलपदी नियुक्ती झाली.महाराणा फतेहसिंह याची कारकीर्द इ.स. १८८४ ते १९३० अशी झाली. त्याने फतेह सागर तलाव आणि आधुनिक भारतीय वास्तुशास्त्राचा सुरेख नमुना असलेला चितोडगडचा फतेह प्रकाश महाल बांधला. आमंत्रण असूनही १९०३ आणि १९११ साली झालेल्या दिल्ली दरबारला फतेहसिंह उपस्थित राहिला नाही. तसेच १९२१ साली प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्डने उदयपूरला भेट दिली.त्याप्रसंगी राजशिष्टाचाराप्रमाणे त्याच्या स्वागताला महाराणा फतेहसिंह यांनी स्वत: न जाता मुलगा भूपालसिंहाला पाठविले. त्यामुळे ब्रिटिश राजवटीने त्याचे काही अधिकार कमी केले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com