नुकतेच सारे जग कोविड-१९ या जागतिक महासाथीतून सावरले आहे. महासाथ म्हणजे काय असते हे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या काही प्रियजनांची आहुती देऊन प्रत्यक्ष ज्वलंत अनुभवले आहे. संसर्गजन्य रोगाची ज्या वेळी साथ पसरते त्या वेळी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. रुग्ण, ज्या रोगजंतूमुळे रोग होतो तो रोगजंतू आणि पर्यावरणातील घटक. रोगाची साथ दूषित अन्न, पाणी किंवा हवा यातून पसरली जाते. हवेतून पसरल्या जाणाऱ्या संसर्गजन्य रोगाची साथ प्रचंड वेगाने वाऱ्यासारखी पसरते आणि तिचे नियंत्रण करणेही तेवढेच कर्मकठीण असते. नेमकी या वेळी विदा विश्लेषण, यंत्रअध्ययन आणि विशाल भाषा प्रारूप या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आपल्या मदतीला येऊ शकते.

संसर्गजन्य रोगांची साथ येते आणि एकाच वेळी अनेक जणांना कवेत घेऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. एकाच वेळी असंख्य माणसांचा जीव धोक्यात येतो. अशी साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि तिचा पुढील प्रसार थोपवण्यासाठी रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, सर्वसामान्य नागरिक, सरकारी-खासगी दवाखाने, इस्पितळे, रोगनिदान केंद्रे, औषधाची दुकाने, सरकारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा या सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. या सर्व ठिकाणी प्रचंड माहिती (विदा) जमा होते. त्या माहितीचे एकत्रीकरण, संकलन आणि विश्लेषण प्रत्यक्ष त्या त्या वेळी करणे फार अवघड असते. कारण अशा वेळी तेथे युद्धजन्य परिस्थिती असते. त्यामुळे साथ रोखायची असेल तर कमीत कमी वेळात निर्णय घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करणे नितांत आवश्यक असते.

interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Vaikunth Crematorium
वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?

हेही वाचा : कुतूहल: कोविडकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत

अशा महासाथीच्या वेळी अनेक ठिकाणांहून माहिती गोळा होत असते. उदा. रुग्णांचे इस्पितळातील केस पेपर किंवा इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे, दृकश्राव्य माध्यमे, रोगनिदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वगैरे वगैरे.

ही प्रचंड क्लिष्ट, जटिल, अनेकविध स्राोतांमधून मिळालेली प्रचंड माहिती पारंपरिक संख्याशास्त्र वापरून त्यातून काही उपयुक्त आकृतिबंध काढणे शक्य नसते. त्यामुळे पुढील योग्य निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणे कठीण होऊन बसते. नेमकी या वेळी यंत्रअध्ययन आणि विशाल भाषा प्रारूप या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आपल्या मदतीला येऊ शकतात. अशा विविध स्राोतांमधून मिळालेल्या नोंदींचे मूल्यांकन करून भविष्यात एखाद्या संसर्गाचा उद्रेक होऊ शकतो का, याचा थोडाफार अंदाज बांधता येईल. अशी महासाथ थोपवण्यासाठी आगाऊ पावले उचलता येतील.

हेही वाचा : कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता : अनेक अनुत्तरित प्रश्न

नोबेल पारितोषिक विजेती अल्फा फोल्ड आणि डीप माइंड यासारखी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अखत्यारीत तयार झालेली संसाधने साथीच्या रोगांवर औषधे शोधण्यासाठी मदत करू शकतात.

Story img Loader