शिणाणे (Green mussels) हे मृदुकाय जीव, मत्स्याहारी लोकांमध्ये त्यांच्या चवीमुळे आणि औषधी गुणधर्मामुळे विशेष प्रसिद्ध आहेत. शिणाणे, वाकुंडी, काकई अशाही नावाने ओळखले  जातात. भारतामध्ये खाण्यासाठी आणि व्यापारासाठी शिणाण्यांच्या हिरव्या आणि तपकिरी  अशा दोन प्रजाती वापरल्या जातात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळ, गोवा आणि कोकण भागामध्ये शिणाणे मोठय़ा प्रमाणावर  खाल्ले जातात. शिणाण्यांमध्ये उपयुक्त अशी खनिजे, बहु-असंपृक्त (Polyunsaturated) स्निग्ध पदार्थ, अमिनो आम्ल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म तसेच जीवनसत्त्वे असतात.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील खाडय़ांमध्ये तसेच समुद्र किनाऱ्याजवळील खडकाळ भागांमध्ये शिणाणे आढळून येतात. त्यांच्या कवचामधून निघणाऱ्या चिकट अशा  धाग्याने ते खडकांना, होडय़ांच्या तळांना तसेच समुद्र तळाशी असणाऱ्या कोणत्याही कठीण वस्तूंना घट्ट पकडून राहतात. किनारी भागातील मासेमारी करणारे मच्छीमार पाण्यामध्ये डुबकी मारून टोकदार कोयत्याच्या साहाय्याने हे शिणाणे काढतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये शिणाणे आढळून येण्याचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे, तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या मागणीचा विचार करता आता त्यांची खाऱ्या/निमखाऱ्या पाण्यामध्ये शेती करण्याचा विचार होत आहे.

Rose Winter Care: 7 Tips To Take Care of Your Rose Plants In Cold Weather
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर, जाणून घ्या टीप्स
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
soybean , soybean registration, soybean guaranteed rate,
सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ, तरीही दर हमीभावापेक्षा कमी

शिणाण्यांची  शेती करण्याच्या दोन  प्रमुख पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये खाडीपात्रामध्ये दीड ते दोन मीटर पाण्यामध्ये बांबू काठय़ांच्या साहाय्याने मंडप तयार करून त्यावर शिणाण्यांच्या माळा लावल्या जातात. तर जास्त खोल पाण्यामध्ये आणि समुद्रामध्ये लांब तरंगत्या दोरांवर शिणाण्यांच्या माळा लावल्या जातात. खाडीच्या पाण्यात हवाबंद पिंपांच्या साहाय्याने हे मंडप किंवा तराफे तरंगत ठेवले जातात आणि लोखंडी नांगराचा वापर करून ते एका जागेवर स्थिर ठेवले जातात.  जेथे स्थानिक बीज मिळत नसेल तेथे, अडीच ते तीन सें.मी. आकाराचे बीज किंवा बीज लागलेले दोर केरळ राज्यामधून आणले जातात.  शिणाण्यांचे बीज काथ्याच्या किंवा नायलॉन दोरांवर १.२ ते १.५ मीटरच्या अंतराने लावले जाते. तराफा पाण्याची क्षारता २० पीपीटीपेक्षा जास्त असलेल्या आणि  कमीत कमी दीड ते दोन मीटर  खोलीत लावतात. एका तराफ्यावर २०० ते ३०० दोर लावले जातात. पाण्यातील वनस्पती प्लावकाचा आहार घेऊन हे वाढतात. सहा ते सात महिन्यानंतर, १० ते १२ सें.मी. आकाराचे झाल्यावर शिणाणे  विक्रियोग्य होतात.

शिणाण्यांसाठी महाराष्ट्रात आणि गोव्यातून मागणी असल्याने  मच्छीमार लोकांसाठी शिणाणे पालन हा एक शाश्वत उपजीविकेचा पर्याय मत्स्यविज्ञानाचा वापर केल्यामुळे  निसर्गातून उपलब्ध झाला आहे. 

– डॉ. सुशांत विलास सनय

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader