आजकाल मुलांचे खेळ म्हणजे बहुधा कॉम्प्युटर गेम्स किंवा व्हिडीओ गेम्स. पण साठ-सत्तर वर्षांपूर्वी ते तर सोडाच पण पत्ते, गंजिफा यांसारख्या बठय़ा खेळांचीही बंदीच होती. त्यामुळे बहुतेक मुलं पकडापकडी, लपाछपी, खोखो, लंगडी, हुतूतू, आटय़ापाटय़ा, सूरपारंब्या यांसारख्या मदानी खेळांचीच कास धरायची. पण त्यासाठीच्या मदानांची काय कथा सांगावी? त्यापायी मग कोपरं ढोपरं फुटणं, कातडी सोलवटून निघणं ही नित्याचीच बाब असे. रणांगणावरील ते अलंकार मिरवत घरी यायची मात्र भीती वाटायची. धपाटे मिळतील म्हणून नाही तर त्या जखमांवर आयोडिनचा बोळा फिरवला जाईल म्हणून. कारण तो असा काही झोंबायचा की त्यामुळं उठणारी कळ मूळ वेदनेला पार झाकोळून टाकायची. भीक नको पण कुत्रा आवर अशातलीच गत होई. पण ती झोंबाझोंबी एकदा संपली की जखम स्वच्छ आणि जंतुविरहित ठेवण्यात त्या आयोडिनचा सिंहाचा वाटा असे हे लक्षात यायचं. त्यापायी उठलेल्या पिवळट रंगाच्या खुणा अंगावर मिरवतच मग पुढचे दोन चार दिवस काढले जात. म्हणूनच असावं कदाचित, पण आयोडिनची छोटी बाटली प्रत्येक घरात हमखास मिळे. कोणत्याही प्रकारच्या जखमेवरचा तो रामबाण उपाय होता. मग ते विळीवर कापलेलं बोट असो, ठेच लागल्यामुळं चपलेच्या अंगठय़ाबरोबर उडालेला पायाचा अंगठा असो की खरचटल्यामुळं सोलवटलेली कातडी असो.

वास्तविक, घरोघरच्या बाटलीतल्या त्या द्रावणाला आयोडिन म्हटलं जात असलं तरी ते निखळ रासायनिक मूलतत्त्व आयोडिन नसे. आयोडिन आणि पोटॅशिअम आयोडाइड यांचं अल्कोहोल आणि पाणी यांच्या द्रावणामध्ये विरघळवलेलं मिश्रण असं ‘टिंक्चर आयोडिन’ असे. त्यात आयोडिन असताना परत त्याच्या पोटॅशिअमबरोबरच्या संयुगाची काय गरज, असा सवाल उभा राहिलाच तर त्याचा जबाबही हाजीर आहे. त्या संयुगाची आयोडिनबरोबर विक्रिया होऊन त्यातून ट्रायआयोडो आयन तयार होतो आणि तो आयोडिनला पाण्यात विरघळवण्यास मदत करतो.

A heartwarming video of a woman selling flowers in heavy rain
“दुनिया में कितना गम है, मेरा गम सबसे कम है” धो धो पावसातील फुल विक्रेत्या महिलेचा Video व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
driving Licence | how to get Learning Licence
Learning  Licence : ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया
move your chats photos from Android to iPhone
Android वरून iPhone वर चॅट्स, फोटो कसे ट्रान्सफर करायचे? फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा
kolkata murder rape polygraph test
Kolkata Rape-Murder Case: पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय? कोलकाता प्रकरणात ही चाचणी कशासाठी?
Viral video parents do not have to worry about childrens homework special machine will take care of that video
पालकांनो आता मुलांच्या अभ्यासाची चिंता मिटली! कशी? ते ‘या’ VIDEO मध्ये एकदा पाहा आणि तुमचं मत सांगा

जंतुनाशक म्हणून आयोडिनची क्षमता जास्त आहे. त्यामुळे केवळ जखमा स्वच्छ ठेवण्यासाठीच नाही तर घरातली फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक जंतुनाशकांमध्ये आयोडिनचा समावेश असतो. उतारवयात होणाऱ्या व्हेरिकोज व्हेन्स या विकारावरही आयोडिनचा बोळा फिरवण्याची शिफारस डॉक्टर करतात ते त्या फुगलेल्या नीलांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणूनच. तो बोळा म्हणजे क्षणाची झोंबाझोंबी पण अनंत काळचा दिलासा, हेच खरं.

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org