१९७८ चा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात ‘अज्ञेय’ यांनी आपल्या लेखनप्रक्रियेविषयी मनोगत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले-
‘‘आजचा भारतीय लेखक ज्या कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत साहित्यलेखन करतो आहे, तशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना कोणत्याही युगातील, कोणत्याही देशातील साहित्यिकाला करावा लागला नसावा. पण तरीही तो निष्ठापूर्वक आपले काम करतो. याचं श्रेय त्याच्या संकल्पशक्तीला जितकं आहे, तितकंच ज्यांनी भारताच्या लोकमानसाला मूक होण्यापासून वाचवले, इतकेच नाही तर त्याच्या आत्मप्रकाशनासाठी पुन्हा एक सुसंस्कृत माध्यमही प्रस्तुत केलं, अशा अस्मितेची ओळख करून देणाऱ्या गुरुजनांच्या दृष्टीला आहे.
माझ्या सर्जक जीवनाचे कष्ट जरी माझ्यामागे असले तरी वाचकांच्या आस्थेचं जे बळ मला मिळते ते माझ्यासाठी आजही अमूल्य आहे. मी असा विचार करतो की, साहित्यकारांचा शोध समग्र मानवजातीच्या शोधाशी तादात्म्य पावतो तेव्हाच त्याला ती शक्ती प्राप्त होते, तेव्हाच तो स्वत:ला स्वतंत्र करू शकतो. मी नेहमी प्रश्न विचारू शकलो पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून मी व्याकूळही झालो पाहिजे. मी जे काही लिहिलंय ते तुम्हाला त्या मूल्याच्या स्रोतांकडे घेऊन जाऊ शकले पाहिजे. कमीत कमी त्या लेखकाने त्याकडे जाणारा मार्ग तरी दाखवायला हवा. त्यामुळे तुमच्या मनात उत्सुकता जागृत होईल आणि तुम्ही प्रश्न विचारू लागाल. तुम्ही स्वत:चा मार्ग शोधाल. तरच मी माझे काम केलंय असं मी समजेन.
माझ्या लेखनातील जे तुमच्या मनात जिज्ञासा जागृत करेल तितकंच कामाचं आहे. जे उरलं ते सगळं टाकाऊ आहे. तुम्ही त्याचा तिरस्कार करू नये. कारण ते आपोआप जीर्ण होऊन नष्ट होऊन जाणार आहे. काळाचा तो निर्णय मला स्वीकारार्ह असेल. कष्टप्रद असला तरी तो मी स्वीकारीन. कारण मी न्यायाला मानणारा माणूस आहे.
साहित्य हे दुसऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतं. दुसऱ्यापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवतं. हे एक पायाभूत मूल्यच नाही तर मानवी मूल्यही आहे. ते पायाभूत सामाजिक मूल्यही आहे. साहित्याच्या सरळ कर्माचं ते साधं सरळ उद्दिष्ट आहे. त्याच्या आधारेच ‘नराचा नारायण’ होतो. तिथेच ते दोघे एकाकार होतात..
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
घूर्णन पद्धतीने विष्यंदतामापन
घूर्णन म्हणजे अक्षाभोवती फिरणे. विष्यंदता मापनासाठी घूर्णन पद्धती वापरली जाते. त्याचेही वेगवेगळे उपप्रकार आहेत. उपप्रकारानुसार त्यात दोन सपाट समांतर चकत्या/ एक सपाट व भोवऱ्यासारखा फिरणारा शंक्वाकृती दोलक/ एक सपाट व दंडगोलाकृती चकती असे उपप्रकार असतात. या सर्व प्रकारात एक भाग स्थिर असतो व दुसरा भाग फिरणारा असतो.
ज्या द्रवपदार्थाची विष्यंदता मोजायची आहे तो द्रवपदार्थ असलेले पात्र स्थिर असते. त्या द्रवपदार्थाचे आकारमान मोजून तो स्थिर व फिरणाऱ्या भागांच्या मध्ये घेतला जातो. विष्यंदतेच्या मात्रेप्रमाणे चकतीचा व्यास वा शंकूचा कोन ठरविला जातो. जसजशी विष्यंदता वाढत जाते, तसतशी कमी व्यासाची व कमी कोनाची चकती वापरावी लागते. कमी व्यासाच्या चकतीसाठी कमी द्रव लागतो, जास्त व्यासाच्या चकतीसाठी जास्त द्रव लागतो. वरील चकती नियंत्रित गतीने फिरविली जाते. स्थिर चकती व फिरणारी चकती यामधील द्रवामुळे त्या दोन्हीत काही प्रमाणात घर्षण होते. फिरणारी चकती व स्थिर चकती यात होणारे हे घर्षण त्या द्रवाच्या रेण्वीय गुणधर्मावर अवलंबून असते. या घर्षणामुळे चकती फिरण्यास विरोध होतो. हा विरोध फिरणाऱ्या चकतीचे क्षेत्रफळ, चकतीची फिरण्याची गती व दोन चकत्यांमध्ये असलेल्या द्रवाची विष्यंदता यावर अवलंबून असतो. चकतीचे क्षेत्रफळ व फिरण्याची गती यानुसार चकतीचे प्रमाणीकरण केलेले असते.
सौंदर्य प्रसाधने, मलम, टूथपेस्ट हे पदार्थ स्थायूसारखी स्थितिस्थापकता (Elasticity) व द्रवासारखी विष्यंदता (Viscosity) असे दोन्ही गुणधर्म एकत्रितपणे दाखवतात. अशा पदार्थाना विष्यंदस्थितिस्थापक (Visco-elastic) असे म्हणतात. आवश्यकतेप्रमाणे स्थितिस्थापकता किती व विष्यंदता किती, याचे प्रमाण ठरविले जाते. त्यासाठी आवश्यक रासायनिक घटक त्या उत्पादनात मिसळले जातात. अशा विष्यंदस्थितिस्थापक पदार्थाची चाचणी करताना फिरणारी चकती सलग न फिरवता काही अंश कोनात फिरविली जाते व त्याच स्थितीत सल सोडली जाते. हा कोन टप्प्याटप्प्याने वाढविला जातो. पदार्थात असलेल्या स्थितिस्थापक गुणधर्मानुसार काही विशिष्ट प्रमाणात ही सल चकती परत माघारी येते. हे माघारी येण्याचे प्रमाण व त्यासाठी लागणारा वेळ या दोन्हींची नोंद करणारी यंत्रणा या उपकरणात असते व त्यानुसार अशा विष्यंदस्थितिस्थापक पदार्थाच्या गुणधर्माचे मापन व अभ्यास करता येतो.
– प्रा. लुम्बिनी जोशी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org