‘चित्तिरप्पावै’ (१९६८) ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेती सामाजिक कादंबरी. तिच्या रचनेमागे अकिलन यांना समजलेली, एक वास्तव घटना कारणीभूत आहे. समाजातील बहुसंख्य लोक नीतिमत्तेला पायदळी तुडवीत आहेत. सामाजिक कर्तव्याची जाण त्यांना राहिलेली नाही. यामुळे हळूहळू सारा समाजच कीड लागलेला दिसतो. सद्रक्षण आणि खलनिर्दालन करण्याची गरज या निमित्ताने लेखक अधोरेखित करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सरळ मनाच्या, हळव्या वृत्तीच्या, सात्त्विक, सुसंस्कारित अशा अण्णमलै या एका प्रतिभावंत चित्रकाराची आणि त्याच्यावर उत्कट प्रेम करणाऱ्या आनंदीची ही प्रेमकथा असून, अण्णामलैचे वडील चिदम्बरम् हे दारिद्रय़ातून वर आल्याने धनलोभाच्या जबर महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेले पात्र आहे. दंडपाणी आणि मणिक्कम ही पात्रेही धनलोभी आहेत. मणिक्कम हा चिदम्बरम्च्या मित्राचा मुलगा. मित्राच्या मृत्यूनंतर मणिक्कमचे, चिदम्बरने पुत्रवत पालनपोषण केले, शिक्षण दिले, नोकरी दिली. पण जबर महत्त्वाकांक्षी आणि व्यवहारी मणिक्कम् सतत अण्णामलैला त्रास देतो. अत्यंत स्वार्थी, कृतघ्न, भ्रष्टाचारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. अण्णामलै आणि आनंदीच्या सुखी जीवनाची होळी करून, त्यात आनंद मानणारी, स्वत:चा स्वार्थ पाहणारी, विकृत अशी ही व्यक्तिरेखा आहे. या मणिक्कमला आनंदीशी लग्न करायचे होते. पण आनंदीच्या वडिलांना हे मान्य नव्हते. तर दुसरीकडे आनंदी आणि अण्णामलै यांना विवाह करायची इच्छा असते, पण चित्रकला महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक असलेले आनंदीचे वडील कदिरेशन यांनी एका बालविधवेशी विवाह केला होता म्हणून नातेवाईकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता, हे माहीत असल्याने, चिदम्बरम्ना हा विवाह मान्य नव्हता. तेव्हा ते अण्णामलैचा विवाह दंडपाणी या श्रीमंत माणसाच्या शेफारलेल्या मुलीशी-सुंदरीशी करून देतात. आदर्शवादी अण्णामलै, आनंदीचे वडील कदिरेशन, संपादक शरवणम् या साधी राहणी, सरळ वृत्तीच्या, नैतिक मूल्याचं रक्षण करणाऱ्या पण तरीही नवीन विचारांचा मागोवा घेणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत- तर या उलट मणिक्कम, दंडपाणी, चिदम्बरम् या धनलोभी ऐहिक सुखाचाच विचार करणाऱ्या स्वार्थी व्यक्तिरेखा आहेत. अशा प्रकारे विविध प्रवृत्तीच्या उच्च-नीच मनोवृत्तीच्या, विचारसरणींच्या पात्रांच्या संघर्षांतून ‘चित्तिरप्पावै’चे कथानक फुलत जाते. आनंदीचे मंगळसूत्र, मणिक्कमशी झालेल्या झटापटीत खेचले जाते, तुटते. मंगळसूत्र तुटणे आणि आनंदीचे विवाहबंधनातून मुक्त होणे असे मानणे- हा एक पुरोगामी संदेश या कथाभागातून लेखकाने समाजाला दिला आहे, तर  एकंदर कादंबरीतील मूल्ये गांधीवादी आहेत.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

एककांचे उपसर्ग 

सर्वसाधारणपणे मोजमापन करताना आपण एककामागे आवश्यकतेप्रमाणे उपसर्ग लावतो. एखादा जिन्नस आपण जेव्हा किलोग्रॅममध्ये मोजतो; तेव्हा ग्रॅम या एककामागे ‘किलो’ हा उपसर्ग असल्याने आपल्याला तो जिन्नस १००० ग्रॅमचा आहे, हे कळते. येथे किलो म्हणजे १००० हे स्पष्ट होते. १००० ही संख्या आपण दहाच्या घातांकाच्या स्वरूपात १०३ अशीही लिहू शकतो.

मिली (१०-३), सेंटी (१०-२), डेसी (१०-१), डेका (१०१), हेक्टो(१०२), किलो (१०३) हे उपसर्ग एककांना लावून सर्वसाधारण व्यवहारात आपण वापरतो.

परंतु अतिसूक्ष्म आणि अतिविशाल मापन व्यक्त करायचे असेल तर त्याप्रमाणे एककांना उपसर्ग लावून ते व्यक्त करता येते. समजा, प्रशांत महासागरातील पाण्याचे वस्तुमान किती, हे सांगताना ते जवळपास १०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००० (एकावर चोवीस शून्ये) ग्रॅम इतके आहे, असे सांगण्याऐवजी ते जवळपास एक योट्टाग्रॅम (ॠ) आहे; असे सांगणे सोयीचे जाईल. पृथ्वीचे आकारमान साधारण एक योट्टालिटर (छ), तर वस्तुमान अंदाजे ६००० योट्टाग्रॅम आहे. येथे १०२४ साठी योट्टा () हा उपसर्ग वापरला आहे.

झेट्टा ( े) हे एककही मोठय़ा मापनासाठी वापरले जाते. त्याची १०२१ इतकी किंमत आहे. आपल्या दूधगंगा आकाशगंगेची त्रिज्या प्त१ झेट्टा मीटर (े)  म्हणजे प्त१०२१ मीटर इतकी आहे. (प्त हे चिन्ह त्यासोबतच्या किमतीच्या जवळपास आहे, या अर्थाने दिले आहे.)

एक्झा (ए=१०१८), पेटा (ढ=१०१५), टेरा (ळ=१०१२), गिगा( ॅ=१०९),  मेगा (ट=१०६) हे शब्ददेखील मोठय़ा मोजमापनात वापरले जातात. एक प्रकाशवर्ष म्हणजे अंदाजे ९.५ पेटामीटर. माणसाचं आयुष्य जर १०० वर्षांचं मानलं, तर तो काळ जवळपास ३ गिगासेकंदांचा असतो. गुरू ग्रह आणि सूर्य यातील अंतर ०.८ टेरामीटर आहे.

जे उपसर्ग लावताना आपण एककाला दहाच्या घाताने गुणतो, अशा एककांना गुणित एकके म्हणतात; पण काही वेळा त्या एककांना दहाच्या घाताने भागावे लागते; अशा एककांना अंशित एकके म्हणतात.

एक लहान पाण्याचा थेंब लिटरमध्ये सांगण्यापेक्षा मायक्रोलिटरमध्ये सांगणे अधिक सोयीचे. १०६ मायक्रोलिटर म्हणजे एक लिटर म्हणजेच एक मायक्रो (ग) म्हणजे १०-६.

नॅनो (ल्ल=१०-९), पिको (स्र्=१०-९), फेम्टो (ऋ =१०-१५), अ‍ॅट्टो (ं=१०-१८), झेप्टो (९=१०२१), योक्टो (८=१०-२४) हे  उपसर्ग अंशित एककांसाठी वापरतात.

उदाहरणार्थ काही विधाने :

  • प्रोटोन किंवा न्यूट्रॉनचे वस्तुमान प्त१.७ योक्टोग्रॅम असते.
  • प्रोटॉनची त्रिज्या प्त१ फेम्टोमीटर असते.
  • पेशीचे वस्तुमान पिकोग्रॅममध्ये मोजतात.
  • एककांना उपसर्ग लावल्याने मापनाच्या अंकांची मांडणी सुटसुटीतपणे करता येते, ते मापन समजण्यासही सोपे जाते.
  • अर्थात त्यासाठी लावलेल्या उपसर्गाची किंमत माहीत असणे आवश्यक आहे.

– चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org