भारतीय संगीत क्षेत्रामध्ये आता एक दंतकथा बनलेले उस्ताद अली अकबर खान यांचे सर्वोत्तम अभारतीय शिष्य गणले गेलेले प्रसिद्ध सरोदवादक केन झुकरमन हे मूळचे अमेरिकन. जन्म १९५२ सालचा, न्यू जर्सी येथला. अली अकबरांकडे ३७ वष्रे भारतीय संगीत आणि सरोदवादनाची तालीम घेतलेले केन झुकरमन सरोदवादनाचा कलात्मक आविष्कार घडवणारे, द्रुतगतीतही नजाकतीचा प्रत्यय देणारे संगीतकार म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतल्या एका संगीत प्रेमी कुटुंबात जन्मलेल्या केन यांच्या बालपणीच त्यांच्या आई-वडिलांनी स्वित्झर्लंडमध्ये स्थलांतर केल्यामुळे केन यांचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्येच झालं. या काळात स्वित्झर्लंडमधील बेसल या ठिकाणी एका संगीत शाळेत केन मध्ययुगीन काळातील पाश्चिमात्य संगीत शिक्षणासाठी जात असत आणि तिथे त्यांनी भारतीय संगीताची महती ऐकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युरोपमधील एका संगीत समारोहात केननी अली अकबरखान यांचे मंत्रमुग्ध करणारे सरोदवादन ऐकले आणि त्यांना जसे आपले जीवितकार्य सापडले. केननी खाँसाहेबांना आपल्याला सरोद शिकविण्यासाठी गळ घातली. केनची तयारी पाहून ते त्यांनी मान्य केले. सुरुवातीची काही वष्रे केन भारतात येऊन खाँसाहेबांकडे सरोद शिकत आणि १९८५ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये खाँसाहेबांकडे सरोदवादन शिकले. आपले गुरू अली अकबर यांच्याबरोबर साथीला राहून केन यांनी युरोप, भारत आणि अमेरिकेत अनेक संगीत समारोहांत आपली कला सादर केली आहेच पण गुरूंच्या निधनानंतर त्यांचे एकल वादनाचे कार्यक्रम जगभरात होत असतात. भारतात तर त्यांचे कार्यक्रम पुढच्या संपूर्ण वर्षांसाठी नक्की झालेले असतात. केनचे मित्र तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, स्वपन चौधरी यांच्या साथीने होणारे सरोदवादनाचे कार्यक्रम लोकप्रिय झाले आहेत. ‘इंडिया मीट्स पíशया’, ‘सलोन डी म्युझिक’, ‘नेचर ऑफ रागाज’ हे त्यांचे काही लोकप्रिय अल्बम. केन यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी सरोद या वाद्यात भारतीय संगीताला अनुकूल असे अनेक तांत्रिक बदल करून घेतले आहेत. केन आपल्या कार्यक्रमातून वेळ काढून स्वित्झर्लंडमधील संगीत संस्थेत अध्यापनही करतात.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com