सी-ग्रास किंवा सागरी गवत म्हणजे समुद्रात उगवणारी एक प्रकारची वनस्पती. ‘सी-ग्रास’ हा शब्द वापरणारे अशेरसन (१८७१) पहिले शास्त्रज्ञ असावेत. ही समुद्रकिनारी किंवा जमिनीवर वाढत नसून समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या आत आढळणारी एकमेव सपुष्प वनस्पती आहे. जशी माणसांमध्ये कुळे असतात, तशीच वनस्पतीतही कूळ पद्धत असते. त्यानुसार, समुद्री गवतांची चार कुळे आहेत. या वनस्पती बऱ्याच वर्षांपूर्वी जमिनीवरून समुद्रात स्थलांतरित झाल्या. त्या जमिनीवरील गवतासारख्याच दिसतात म्हणून त्यांना सागरी गवत म्हणतात. एखाद्या गवताळ प्रदेशाप्रमाणेच या वनस्पती बऱ्याच प्रमाणात एकाच जागी आढळल्यामुळे समुद्राखाली कुरण निर्माण झाल्याचा भास होतो. इतर हिरव्या वनस्पतींप्रमाणेच या वनस्पतीसुद्धा सौर ऊर्जेपासून अन्न तयार करतात. त्यामुळे जिथपर्यंत सूर्यकिरण पोहोचतात तेवढय़ा खोलीपर्यंतच या वनस्पती उगवतात. हे गवत काही वेळा समुद्रतटापासून जवळच असते. अशी समुद्री कुरणे आसपासच्या परिसरातील बराच कार्बन शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषण करतात आणि म्हणूनच त्यांना जगभरातील सर्वात उत्पादक परिसंस्था म्हटले जाते.

सागरी गवताचे परागीकरण समुद्राच्या पाण्यातच होते. प्रवाळाप्रमाणेच सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग असलेली सागरी फुलझाडे त्यांच्या उत्पादकतेच्या पातळीमुळे असंख्य पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी सागरी प्रजातींसाठी अन्न, निवारा आणि रोपवाटिका क्षेत्र प्रदान करतात. सागरी गवत समुदायांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेतील बदलांबद्दल संवेदनशीलता असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील परिसंस्थांचे एकूण आरोग्य निश्चित करणारी ती एक महत्त्वाची वनस्पती आहे. सागरी गवत अनेक कार्ये करते. त्यातील प्रमुख म्हणजे समुद्रतळ स्थिर करणे. इतर सागरी जीवांसाठी अन्न आणि निवासस्थान प्रदान करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे, सागरी प्राण्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे, इत्यादी.

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

सागरी गवतामध्ये विस्तृत मुळांची प्रणाली उभ्या आणि आडव्या दोन्ही बाजूंनी पसरते आणि गवताप्रमाणेच समुद्रतळाला वनस्पतींना स्थिर ठेवण्यास मदत करते. समुद्रतळाशी सागरी गवत नसल्यास ते वादळांच्या तीव्र लाटांच्या प्रभावामुळे असुरक्षित ठरतात. सागरी गवताचे आर्थिक मूल्य इतर उद्योगांद्वारे मोजले जाऊ शकते, उदाहरणार्थ मत्स्यपालन, निसर्ग आणि वन्यजीव पर्यटन. मासेमारी उद्योगासाठी सागरी गवत महत्त्वपूर्ण आहेत आणि ते स्थानिक अर्थव्यवस्थांनाही आधार देतात.

मंजुश्री पारसनीस ,मराठी विज्ञान परिषद

Story img Loader