‘केदारेश्वर बॅनर्जी सेंटर ऑफ अ‍ॅट्मॉस्फेरिक अँड ओशन स्टडीज’ची (केबीसीएओएस) स्थापना अलाहाबाद विद्यापीठात सन २००० मध्ये केंद्र शासनाच्या साहाय्याने झाली. प्रकल्पांसाठी पृथ्वीविज्ञान मंत्रालय, इस्रो-यूजीसीने निधी पुरवला. केबीसीएओएसच्या दक्षिण ध्रुव वैज्ञानिकांनी ‘अ‍ॅकॅडमी बॉरिस पेट्रोव्ह’ या खास जहाजातून अंटाक्र्टिक महासागरी वातावरणाच्या विदेचे विश्लेषण केले. ‘एमएन सहा सेंटर ऑफ स्पेस स्टडीज’ ही संस्था अलाहाबाद विद्यापीठाने केबीसीएओएसनंतर वर्षभरात स्थापन केली. केबीसीएओएसमध्ये एम.टेक. आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना जमीन, वायुमंडल, सागर विज्ञानाचे अद्ययावत ज्ञान देऊन देशासाठी मोठय़ा जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम केले जाते.   

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र जाणून घेताना..

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण

 केबीसीएओएस स्वत:सारखे काम करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात असते.  उदा. अमेरिकेतील ‘लामॉन्ट डोहार्टी अर्थ ऑब्झव्‍‌र्हेटरी’, इटलीतील ‘इंटरनॅशनल थिऑरेटिकल फिजिक्स सेंटर’, पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ट्रॉपिकल मिटीरिऑलॉजी’. या संस्था माहिती सामायिक करून परस्पर सहकार्याने अचूक हवामान प्रतिमाने तयार करतात. केबीसीएओएसचे साथीच्या रोगांच्या नियंत्रणासारखे प्रकल्प जनसामान्यांना उपयोगी पडतात. भारतात अजूनही मलेरिया मोठय़ा प्रमाणात आहे. मलेरियामुळे यकृत बिघडून रक्तपेशी फुटतात. अतिदुर्बल रोग्यांचे मृत्यूही होतात. केबीसीएओएससारख्या दूरस्थ विदा मिळवणाऱ्या वातावरणाचा सखोल अभ्यास करणाऱ्या संस्थांकडील माहितीमुळे मलेरियासारखे रोग आटोक्यात येऊ शकतात. पावसाळय़ानंतर मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतो, फेब्रुवारी-एप्रिलमध्ये घटतो. ओरिसा, आसामसारख्या ईशान्येकडील राज्यांत मलेरिया-पीडित जास्त आहेत. भारतात रोगसंक्रमण कोठे  होईल, डास कधी वाढतील ही माहिती रोगनियंत्रणास उपयुक्त ठरते. पुढील ५० वर्षांत, जागतिक तापमानवाढ गृहीत धरून मलेरियाविरोधी धोरणे ठरवण्याजोगी माहिती केबीसीएओएस जमवत आहे. प्लास्मोडियम फॉल्सीपॅरम या जीवघेण्या मलेरियाकारकाची पाहणी महत्त्वाची ठरेल. जीव वाचतील. आरोग्य-मोहिमांचे पैसे, श्रम योग्य वेळी व योग्य जागीच खर्च होतील.

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र पक्ष्यांचे स्थलांतर

१९६१-२००५ या ४५ वर्षांत एल निनो, ला निनाने समुद्रप्रवाह-प्रभावित वर्षे आणि समुद्रप्रवाह-अप्रभावित वर्षे यांच्या तुलनेने भारतात हिवताप संक्रमणात फरक पडला का, ते पाहणार आहेत. त्याआधारे केबीसीएओएस २०५० पर्यंतच्या मलेरिया-संक्रमणाचे आडाखे बांधत आहे. पिकांना सूक्ष्म-तुषाररूपात पाणीपुरवठा करून परिणाम बघणे किंवा रांची, झारखंडमध्ये उपग्रहांच्या साहाय्याने जमिनीवरील गोडय़ा पाण्याचे स्रोत शोधणेही विचारात आहे. बिहारमध्ये पर्यटकांची आकर्षणकेंद्रे कोणती आहेत याचा केबीसीएओएसने अभ्यास केला आहे. तेथे विकास केल्यास प्रवाशांसाठी हॉटेले बांधून, रोजगारनिर्मिती करता येईल.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader