संधिपाद म्हणजेच ज्यांची चलनवलनाची उपांगे छोटय़ा सांध्यांनी जोडलेली असतात असे प्राणी. हा पृथ्वीतलावरील सर्वात मोठा प्राणिसंघ आहे. यातील ९० टक्के प्राणी कीटकवर्गातील असून इतर १० टक्क्यांपैकी काही पाण्यात आढळतात. त्यातील खाऱ्या-निमखाऱ्या पाण्यात राहणाऱ्या जीवांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. या संघात तीन गटांत (दोन उपसंघांत) सागरी प्राणी येतात. चेलीसराटा उपसंघ (वर्ग मेरीस्टोमाटा- उदा. नालधारी खेकडे व वर्ग पिक्नोगोनिडा- उदा. सागरी कोळी/ सुतेरे) आणि क्रस्टेशिया उपसंघातील (उदा. खेकडे, कोळंबी, शेवंड इ.) जीवांचे बाह्यकंकाल कायटीनयुक्त असते तर अंत:कंकाल नसते. बहुतांश प्राण्यांत डोके व धड (उदर) असून टोकाला ‘शेपटी’ असते. काहींना स्पृशा (मिशा) असतात. बहुतेक सजीव मुक्तपणे पोहतात, तर बार्नाकल्ससारखे काही समुद्रतळाला, होडीच्या पृष्ठावर वा इतर प्राण्यांच्या शरीराला चिकटून राहतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा