मँगनीज, लोह व इतर बहुविध धातूंचे गोळे (पॉलीमेटॅलिक नोडय़ूल्स) समुद्र तळाशी आढळतात. यात मौल्यवान धातू असल्याने आर्थिकदृष्टय़ा मानवासाठी ते मोठा खजिनाच ठरतात. हे गोळे सूक्ष्म कण ते काही २० सेंटिमीटर व्यासाचेही असतात. बहुसंख्य गोळे हे तीन ते १० सेंटिमीटर व्यासाचे असतात. त्यांचा आकार बटाटय़ाएवढा, गोलाकार, लंब वर्तुळाकार, चपटा, उडत्या तबकडीसारखा किंवा अनियमित असून पृष्ठभाग गुळगुळीत किंवा खडबडीत असतो किंवा त्यावर उंचवटे असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे गोळे अंशत: किंवा पूर्णत: गाळात रुतलेले, काही एकमेकांना चिकटलेले असतात. गाळात रुतलेल्या भागावर वेगवेगळय़ा घटकांची वाढ झाल्याने तो वरच्या भागापेक्षा खडबडीत असतो. समुद्र तळावर असलेले हे बहुधातूंचे गोळे सुमारे ५०० अब्ज टन वजनाचे असल्याचा अंदाज ‘अॅलन ए. आर्चर’ या लंडनच्या भूगर्भशास्त्रीय म्युझियमतज्ज्ञांनी १९८१ मध्ये वर्तवला होता.

बहुधातूंचे गोळे हे उथळ (बाल्टिक समुद्र) व खोल समुद्र (मध्य प्रशांत महासागर) तसेच सरोवरांमध्येही सापडतात. या गोळय़ांच्या अभ्यासावरून महासागराचे वैशिष्टय़ कळते. प्रथमत: १८६८ मध्ये सायबेरियाचा आक्र्टिक महासागर आणि कारा समुद्रात बहुधातूंचे गोळे सापडले. एच.एम.एस. चॅलेंजर या १८७२ ते १८७६ या संशोधन मोहिमेत हे गोळे बहुतेक महासागरांमध्ये आणि खोल समुद्रांमध्ये अधिक प्रमाणात आढळले. आंतरराष्ट्रीय समुद्र तळ प्राधिकरणाच्या मते क्लेरियन क्लिपरटन झोनमध्ये (प्रशांत महासागरातील भूगर्भाला तडे असणारा ७२४२ किलोमीटरचा प्रदेश) २१अब्ज टनांपेक्षा अधिक गोळे असून त्यात ५.९५ अब्ज टन मँगेनीज, २७ कोटी टन निकेल, २३ कोटी टन तांबे आणि ५ कोटी टन कोबाल्ट आहे. या गोळय़ांची वाढ खूप मंदगतीने होते.

खोल समुद्रातील परिसंस्था किंवा खाणकामाच्या संभाव्य परिणामांबद्दल फारच कमी माहिती आहे. गोळय़ांचे खाणकाम या खोल समुद्रातील परिसंस्थांच्या हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रावर परिणाम करू शकते आणि परिसंस्थेला सावरण्यासाठी लाखो वर्षे लागतात.

या प्रक्रियेमध्ये तळाशी राहणाऱ्या प्राण्यांचा थेट मृत्यू होतो. त्यामुळे सागर परिसंस्थेची प्रचंड हानी होऊ शकते. भारतातील सागर विज्ञान संशोधन केंद्रात असे धातू गोळे मिळवणे व त्यांचे विश्लेषण यावर संशोधन केले जाते.
प्राचार्य डॉ. किशोर पवार,मराठी विज्ञान परिषद