हेमंत लागवणकर, मराठी विज्ञान परिषद

दैनंदिन व्यवहारात ऊर्जेची गरज जसजशी वाढायला लागली तसतसे मानवाने अनेक नवनवीन ऊर्जास्रोत शोधून काढले. काळाची गरज म्हणून पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांचादेखील वापर केला जाऊन लागला. सौरऊर्जा, पवनऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा असे ऊर्जेचे अनेक प्रकार वापरात आले. पवनऊर्जा मिळविण्यासाठी उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांमुळे आकाशातले ढग दूर पळतात आणि पावसाला अडथळा निर्माण होतो, असा एक समज सातारा जिल्ह्यात उभारलेल्या पवनचक्क्यांच्या संदर्भात गेल्या दशकामध्ये तयार झाला होता. मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शास्त्रीय निकषांच्या आधारे सिद्ध झाले.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…

आता युरोपात पवनऊर्जेच्या पर्यावरणस्नेही स्वरूपाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि गंमत म्हणजे, त्यामागचे कारणसुद्धा ‘पवनचक्क्या’ हेच आहे. पवनऊर्जा मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टर्बाईनच्या सुमारे नव्वद टक्के भागाचे पुनर्चक्रीकरण केले जाते आणि त्याचा पुनर्वापर होतो. मात्र पवनचक्क्यांच्या पात्यांचे पुनर्चक्रीकरण करणे शक्य होत नाही. २०२५ पर्यंत युरोपात पवनचक्क्यांच्या पात्यांमुळे तीस हजार टन कचरा तयार होईल; आणि २०३० मध्ये हेच प्रमाण दुप्पट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण शक्य नसल्याने पवनऊर्जेला पर्यावरणस्नेही म्हणावे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

पवनचक्क्यांच्या पात्यांचा अंतर्भाग ‘बालसा’ या अमेरिकेत आढळणाऱ्या वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. झपाटय़ाने वाढणाऱ्या या वृक्षांचे लाकूड वजनाला अगदी हलके असते. बालसा वृक्षाच्या लाकडी पट्टय़ांवर पॉलीव्हिनाईल क्लोराईड, काचतंतू, कार्बन तंतू, राळ इत्यादी पदार्थाचे मिश्रण रासायनिक प्रक्रिया करून चढविले जाते. यामुळे ही पाती वजनाला हलकी पण मजबूत आणि टिकाऊ होतात. मात्र या रासायनिक प्रक्रियेमुळेच पात्यांचे पुनर्चक्रीकरण शक्य होत नाही. काही पाती पुलाच्या बांधणीसाठी आणि उद्यानांमध्ये मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडय़ा, बोगदे इत्यादी तयार करण्यासाठी उपयोगात आणली जातात; पण हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. पवनचक्क्यांची बरीचशी पाती कचराभूमीवर टाकली जातात आणि तिथे हा कचरा साठत जातो.

जर्मनीमध्ये काही सिमेंट कंपन्या पवनचक्क्यांची टाकाऊ पाती चक्क सरपण म्हणून वापरतात आणि त्यापासून उष्णता ऊर्जा मिळवतात. काही बांधकाम व्यावसायिक टाकाऊ पात्यांचा चुरा बांधकाम साहित्यात मिसळतात. पण, संशोधकांच्या मते, असा वापर करणे हे या समस्येचे कायमस्वरूपी उत्तर नव्हे. त्यामुळे पवनचक्क्यांची पाती करण्यासाठी पर्यावरणस्नेही पर्यायी पदार्थाचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. त्यांना यात यश मिळेल का, याविषयी कुतूहल आहे.

Story img Loader