भारत सरकारने देशात मत्स्य व्यवसाय आणि सागरविज्ञानविषयी संशोधन करण्यासाठी अनेक संस्था उभारल्या आहेत. या संस्थांनी प्रत्यक्ष समुद्रावर जाऊन जलसंपत्तीचा अभ्यास करण्यासाठी काही जहाजांची नेमणूक केलेली आहे. ‘सागर संपदा’ ही अशीच एक संशोधन नौका आहे. या नौकेची बांधणी १९८४ साली डेन्मार्कमध्ये करण्यात आली. आकाराने ती व्यापारी जहाजाच्या मानाने लहान आहे. तिची लांबी सुमारे ७२ मीटर, रुंदी १६ मीटर आणि ती पाण्याखाली (ड्राफ्ट) साडेपाच मीटर असते. या नौकेवर सागरी विज्ञानविषयक संशोधनासाठी लागणारी उपकरणे, मासे साठवून ठेवण्याची सोय आणि प्रयोगशाळा आहेत. त्याशिवाय ३५ अधिकारी-कर्मचारी तसेच २२ शास्त्रज्ञांची राहण्याची सोय आहे. ही नौका सामान्यत: अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप द्वीपसमूह या भागांत कार्यरत असते. तिची रचना ६० अक्षांशांपर्यंत जाण्यासाठी केलेली असल्यामुळे ती प्रत्यक्ष ध्रुव प्रदेशात जाऊ शकत नसली तरी तिने दक्षिण गंगोत्री मोहिमेत योगदान दिले असून आजवर ४०० पेक्षा जास्त समुद्र सफरी केल्या आहेत.

‘सागर संपदा’वर मच्छीमारीसाठीची अतिशय प्रगत उपकरणे बसवली आहेत. त्यांच्या मदतीने शास्त्रज्ञ समुद्राच्या वेगवेगळय़ा पातळय़ांवर जाळी टाकून विविध भागांमध्ये मिळणाऱ्या मत्स्य संपदेचा अभ्यास करतात. माशांचे थवे शोधण्यासाठी त्यांना ‘सोनार’सारख्या उपकरणांची मदत होते. यात मासेमारीसाठी लागणाऱ्या वेगवेगळय़ा जाळय़ांचा (बॉटम ट्रॉल, पेलाजिक ट्रॉल, हाय स्पीड डिमर्सल ट्रॉल), उपकरणांचा आणि तंत्रांचाही अभ्यास होतो.
मासेमारीशिवाय सागरविज्ञान अभ्यासासाठी समुद्रतळाच्या गाळाचे नमुने घेण्यासाठी तसेच माशांचे खाद्य असलेल्या सूक्ष्म प्लवकांचा अभ्यास करण्यासाठी ‘बोंगो नेट्स’ वापरतात. हिच्यावर असलेल्या आठ सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये हवामानशास्त्र, रसायनशास्त्र, ध्वनिविषयक संशोधन, सूक्ष्मजीवशास्त्र, समस्थानिके (आयसोटोप्स) अशा विविध विषयांवर संशोधन होते. गेली ४० वर्षे सागरविज्ञान संशोधनात मोलाची कामगिरी करणारी ही नौका लवकरच आपली चाळिशी पूर्ण करेल. एका जहाजासाठी हे आयुष्य फारच दीर्घ समजले जाते. त्यामुळे सागर संपदेला पर्याय शोधण्याची मागणी जोर धरत आहे.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन

कॅप्टन सुनील सुळे, मराठी विज्ञान परिषद

Story img Loader