आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन हा दर वर्षी २६ जुलैला साजरा केला जातो. या दिवशी जनमानसात या परिसंस्थेविषयी जागृती निर्माण केली जाते. एक अनोखी आणि खास अशी ही परिसंस्था असून ती सहज नष्ट होऊ शकते. ही परिसंस्था जगभर सागरी किनाऱ्यांवरील रहिवाशांना अन्न पुरवते तसेच समुद्राच्या लाटांपासून संरक्षण देते. एवढेच नाही तर ही परिसंस्था एका फार मोठय़ा जैवविविधतेला आधारभूत ठरते. मासे व इतर सागरी जिवांसाठी अधिवास पुरवते.

खारफुटी वनस्पती जगातील उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत खाऱ्या पाण्यात सोयीस्कररीत्या वाढतात. या वनस्पती ज्या भूभागात व परिसरात वाढतात त्या परिसराला खारफुटी (कांदळवन/ तिवर) परिसंस्था म्हटले जाते. ही परिसंस्था मोठय़ा प्रमाणात उत्पादक असून खूप संवेदनक्षम आहे. तिवरांबरोबरच या परिसंस्थेत इतर वनस्पती आणि प्राणी गुण्यागोविंदाने वाढतात, जगतात.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू

वन विभागाच्या २०२१च्या अहवालानुसार भारतात खारफुटी वनांचे क्षेत्र सुमारे चार हजार ९९२ चौरस किलोमीटर असून त्यात १७ चौरस किलोमीटर क्षेत्राची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यात ओरिसा (आठ चौरस किलोमीटर), महाराष्ट्र (चार चौरस किलोमीटर) आणि कर्नाटक (तीन चौरस किलोमीटर) ही तीन राज्ये आघाडीवर असून इतरत्र तीन चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. सुंदरबन खारफुटीवन भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे वन असून तमिळनाडूतील पिचावरम हे दुसऱ्या स्थानी आहे.

जमीन आणि समुद्र या दोन्हीमधील खारफुटी वन ही सीमारेषा असून ती किनारी भागांचे संरक्षण करते. खारफुटी वन सध्या धोक्याच्या स्थितीत असून कल्पनेपेक्षा ते तीन ते चार पट अधिक नष्ट होत आहे. कांदळवनातील माती ही कार्बन साठवण्याचा मोठा स्रोत असते. जमिनीवरील वनपर्यावरणात साठवल्या जाणाऱ्या कार्बनपेक्षा कांदळवनांत १० पट जास्त कार्बन साठवला जातो. पावसाळय़ात किंवा इतर वेळी पुराचे पाणी समुद्राला मिळते त्यावेळी त्यातील नको ते अन्न घटक आणि प्रदूषके काढूनच ते पाणी समुद्रात मिसळते. सागरी गवतासारख्या दिसणाऱ्या वनस्पतींमुळे प्रवाळ जातींचे संरक्षण होते. थोडक्यात पाण्याची गुणवत्ता कायम राखण्याची प्रक्रिया तिवर किंवा खारफुटी वने करतात. अशा वनांना अभय देणे आपले परमकर्तव्य आहे.

डॉ. किशोर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषद

Story img Loader