हिंदूी महासागरातील आफ्रिकन खंडाच्या आग्नेय आणि भारताच्या नैर्ऋत्य किनारपट्टीवर स्थित मॉरिशस हे बेट ‘राष्ट्र’ असून त्याचे क्षेत्रफळ १८६५ चौरस किलोमीटर व त्याची किनारपट्टी ३३० किलोमीटर आहे. हे बेट ज्वालामुखीमुळे आठ दशलक्ष वर्षांपूर्वी पाण्यातून उदयास आले. प्रवाळ खडकांनी (कोरल रिफ) बेटाच्या सभोवतालचे ८७० किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. येथील कोरल रिफ जगातील सर्वात श्रीमंत सागरी खजिन्यांपैकी एक आहेत. हे हिंदूी महासागरातील जैवविविधता संवेदनशील क्षेत्रांपैकी (हॉटस्पॉट्स) एक असून फक्त येथेच काही विशिष्ट जातींचे प्रवाळ दिसतात. येथील समुद्राचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदूी महासागरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे शैवालांची संख्या मोठी आहे. लाल, हिरव्या आणि तपकिरी शैवालांच्या एकूण ४३५ प्रजाती येथे आढळतात. जगभरात अन्न आणि औषधांचा स्रोत म्हणून शैवाल मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते.

मॉरिशसचे समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असून किनाऱ्यांलगतचे पाणी नितळ पारदर्शक असल्यामुळे तळ सहज दिसतो. किनाऱ्यांवर लाटा आदळत नाहीत पण किनाऱ्यांपासून लांबवर पाण्यात त्या दिसतात. येथे बोटीतील पारदर्शक काचेतून किनाऱ्यापासून लांबवर खोल पाण्यात असणारे रंगीबेरंगी मासे, इतर जीव पाहता येतात व डॉल्फिनबरोबर पोहताही येते. ‘मॉरिशस सागरशास्त्र संस्था’ बेटा सभोवतालच्या महासागराच्या विविध पैलूंवरील संशोधनात अग्रभागी आहे. याशिवाय ‘अल्बियन मत्स्य संशोधन संस्था’ (एएफआरसी) ही सागरी संसाधन विशेषत: मत्स्य संशोधन आणि ब्लू इकॉनॉमीवर कार्य करते. हिंदूी महासागराच्या किनारपट्टीतील देशांसाठी सागर संशोधन आणि इतर कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन’चे (आयओआरए) मुख्यालय मॉरिशस येथे आहे.मॉरिशसमधील प्रवाळ जीवनाचे निरीक्षण करण्यासाठीचे ‘ब्लू बे मरिन पार्क’ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. ते ३५३ हेक्टरवर पसरलेले आहे. दक्षिण-पूर्वेकडील माहेबर्ग गावाजवळच्या खाडीतील ‘ब्लू बे’ ही उल्लेखनीय जैवविविधता असलेली प्रवाळ बाग आहे. येथील पाच मीटर व्यासाचे हजार वर्षांपेक्षा जुने ‘ब्रेन कोरल’ हे (लोबोफिलिया प्रजाती) मुख्य आकर्षण आहे. या पार्कमध्ये मासेमारीस बंदी असल्याने ३८ प्रवाळ आणि ७२ माशांच्या प्रजाती सुरक्षित असून त्या येथे मोठय़ा प्रमाणात आढळतात.

Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
Loksatta kutuhal Artificial omnidirectional intelligence
कुतूहल: कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता
Infectious diseases ai
कुतूहल : साथरोग विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
Loksatta kutuhal Artificial intelligence helps during COVID
कुतूहल: कोविडकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत
Loksatta  kutuhal Synthetic Intelligence Many Unanswered Questions
कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता : अनेक अनुत्तरित प्रश्न
Loksatta kutuhakl Difference between synthetic intelligence and artificial intelligence
कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतला फरक
artificial intelligence act
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया

डॉ. बाळासाहेब कुलकर्णी,मराठी विज्ञान परिषद

Story img Loader