हिंदूी महासागरातील आफ्रिकन खंडाच्या आग्नेय आणि भारताच्या नैर्ऋत्य किनारपट्टीवर स्थित मॉरिशस हे बेट ‘राष्ट्र’ असून त्याचे क्षेत्रफळ १८६५ चौरस किलोमीटर व त्याची किनारपट्टी ३३० किलोमीटर आहे. हे बेट ज्वालामुखीमुळे आठ दशलक्ष वर्षांपूर्वी पाण्यातून उदयास आले. प्रवाळ खडकांनी (कोरल रिफ) बेटाच्या सभोवतालचे ८७० किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. येथील कोरल रिफ जगातील सर्वात श्रीमंत सागरी खजिन्यांपैकी एक आहेत. हे हिंदूी महासागरातील जैवविविधता संवेदनशील क्षेत्रांपैकी (हॉटस्पॉट्स) एक असून फक्त येथेच काही विशिष्ट जातींचे प्रवाळ दिसतात. येथील समुद्राचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदूी महासागरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे शैवालांची संख्या मोठी आहे. लाल, हिरव्या आणि तपकिरी शैवालांच्या एकूण ४३५ प्रजाती येथे आढळतात. जगभरात अन्न आणि औषधांचा स्रोत म्हणून शैवाल मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा