आपल्या महासागरांच्या ८० टक्क्यांहून अधिक खोल भागाचे अद्याप निरीक्षण झालेले नाही. तेथील समुद्राचा तळ अत्यंत खोल, थंड आणि अंधारमय आहे. तिथे ऑक्सिजनची कमतरता असते, तसेच कोणीही चिरडून जाईल एवढा उच्च दाब आढळतो! अशा रहस्यमय भागांपैकी एक म्हणजे मारियाना खंदक! हे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक मानले जाते. हा महासागरांतील सर्वात खोल भाग (१० हजार ९८४ मीटर) आहे. याचाच अर्थ तुम्ही माऊंट एव्हरेस्टला तळाशी चिकटवल्यास तो पूर्णपणे पाण्याने झाकला जाईल आणि वरच्या बाजूला दोन हजार १३३ मीटर अतिरिक्त पाणी असेल. वातावरणीय दाबापेक्षा कित्येक पट जास्त दाब इथे असतो. या खंदकाच्या सर्वात खोल भागाला ‘चॅलेंजर डीप’ म्हणतात. तेथील पाण्याचे तापमान एक ते तीन अंश सेल्सिअस एवढे असते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे उष्ण पाण्याच्या झऱ्यांमुळे त्याचे तापमान वाढतेही.  प्रकाशाचा अभाव आणि प्रतिकूल आम्लीय परिस्थिती तसेच अत्युच्च  दाब व बदलते  तापमान अशी बदलती स्थिती असूनही तेथे जीवसृष्टी आढळते. हे आश्चर्यकारक सजीव अभ्यासले जात आहेत.

अमेरिकन वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान अटलांटिक समुद्रात पृष्ठभागापासून २.७ किलोमीटर खोलीवर समुद्रतळाशी अज्ञात आणि रहस्यमय गूढ अशी छिद्रे दिसली आहेत. एका सरळ रेषेत विशिष्ट अंतर ठेवून कुणीतरी ही छिद्रे बनवली असावीत असे भासते. ही अजब आणि रहस्यमय छिद्रे पाहून वैज्ञानिकही अचंबित झाले आहेत.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर

जपानच्या किनाऱ्याजवळील पाण्यात सापडलेल्या ६.६ चौरस मीटर आकाराच्या विचित्र वस्तूंमुळे शास्त्रज्ञांना चकित केले आहे. हे निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित असा प्रश्न पडतो. पर्यटक या कुतूहलाने येथे डुबकी घेत असतात. हे लोकप्रिय पण रहस्यमय ठिकाण आहे. बर्मेजा हे युकाटन द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावरील एक रहस्यमय बेट आहे. १६व्या ते २०व्या शतकातील नकाशांवर याची नोंद आहे, परंतु कोणत्याही आधुनिक सर्वेक्षणाने त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. काहींच्या मते हे बेट अस्तित्वातच नव्हते, अथवा कदाचित समुद्राच्या वाढत्या पातळीने ते नष्ट केले. कदाचित सीआयएने अमेरिकेच्या आर्थिक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी बेट नष्ट केले असेल असाही एक  सिद्धांत आहे. म्हणून याला फँटम बेट नाव पडले असावे का?

डॉ. चित्ररेखा कुलकर्णी,मराठी विज्ञान परिषद

Story img Loader