आपल्या महासागरांच्या ८० टक्क्यांहून अधिक खोल भागाचे अद्याप निरीक्षण झालेले नाही. तेथील समुद्राचा तळ अत्यंत खोल, थंड आणि अंधारमय आहे. तिथे ऑक्सिजनची कमतरता असते, तसेच कोणीही चिरडून जाईल एवढा उच्च दाब आढळतो! अशा रहस्यमय भागांपैकी एक म्हणजे मारियाना खंदक! हे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक मानले जाते. हा महासागरांतील सर्वात खोल भाग (१० हजार ९८४ मीटर) आहे. याचाच अर्थ तुम्ही माऊंट एव्हरेस्टला तळाशी चिकटवल्यास तो पूर्णपणे पाण्याने झाकला जाईल आणि वरच्या बाजूला दोन हजार १३३ मीटर अतिरिक्त पाणी असेल. वातावरणीय दाबापेक्षा कित्येक पट जास्त दाब इथे असतो. या खंदकाच्या सर्वात खोल भागाला ‘चॅलेंजर डीप’ म्हणतात. तेथील पाण्याचे तापमान एक ते तीन अंश सेल्सिअस एवढे असते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे उष्ण पाण्याच्या झऱ्यांमुळे त्याचे तापमान वाढतेही. प्रकाशाचा अभाव आणि प्रतिकूल आम्लीय परिस्थिती तसेच अत्युच्च दाब व बदलते तापमान अशी बदलती स्थिती असूनही तेथे जीवसृष्टी आढळते. हे आश्चर्यकारक सजीव अभ्यासले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा