खेकडय़ांमधील अत्यंत हुशार प्रजाती म्हणजे यती खेकडा (हर्मिट क्रॅब)! त्यांच्या ८०० हून अधिक प्रजाती असून समुद्रकिनाऱ्यापासून ते थेट खोल समुद्रात सर्वत्र त्यांचा अधिवास विखुरलेला आहे. खेकडय़ाच्या इतर प्रजाती स्वसंरक्षणासाठी स्वत:च्या कठीण कवचाचा वापर करतात. मात्र यती खेकडे स्वसंरक्षणासाठी मेलेल्या शंख-शिंपल्यांच्या कठीण कवचांचा उपयोग करतात.

समुद्रकिनारी पडलेले शंख यती खेकडय़ाच्या अत्यंत गरजेचे असतात. कारण एकदा का शरीराची वाढ झाली की या खेकडय़ांना त्यांचे सर्पिल आकाराचे शरीर सामावून घेईल असा शंख शोधावा लागतो. कित्येकदा तो मिळत नाही. मग अशा वेळी असे काही यती खेकडे एकत्र जमतात आणि सर्वात पुढे मोठा यती खेकडा आणि शेवटी सर्वात लहान अशा प्रकारे उतरत्या क्रमाने ओळीने एकाला एक धरून उभे राहतात आणि सर्वात मोठय़ा खेकडय़ाच्या योग्य आकाराचा नवीन शंख मिळाला की जसे तो त्याच्या जुन्या शंखातून बाहेर पडेल तसे एकामागून एक ओळीने शंखांची अदलाबदल सुरू होते आणि प्रत्येकाला मग अपेक्षेप्रमाणे एक आकार मोठा असलेला योग्य आकाराचा नवीन शंख मिळतो.

Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Public awareness board
पारव्यांना खायला टाकताय सावधान…! महापालिकेने उचलले हे पाऊल
Shocking in Thailand Shark Attacks 57-Year-Old German Woman During Her Swim At Khao Lak Beach
ती पोहत होती अन् अचानक शार्क माशानं पाय पकडला; रक्तस्त्राव आरडाओरडा अन्…पाहून तुमचाही थरकाप उडेल
A review of artificial intelligence in marine science
कुतूहल : समुद्रविज्ञान अभ्यासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
bush migratory birds have made their presence
अकोला : विदेशी ‘पाहुण्यां’ची अद्याप प्रतीक्षाच, ‘झुडुपी’ची हजेरी…
tiger attack Chandrapur
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
vulture Chandrapur marathi news
‘त्या’ गिधाडांना झाले तरी काय? एकापाठोपाठ एक…

काही यती खेकडे पाठीवर समुद्रफुलाला (सी अ‍ॅनिमोन) बसवतात. इतर माशांनी त्यांच्यावर हल्ला केला की पाठीवर बसवलेले समुद्रफूल हल्ला करणाऱ्या प्राण्यांवर मिसाइलप्रमाणे तिच्या शुंडकातून दंशपेशींद्वारा विष फेकते आणि त्यांच्या खाली असलेला यती खेकडा कोणत्याही भक्षकाची पर्वा न करता बिनधास्त चरत राहतो. याच्या बदल्यात आधारकाची गरज असलेल्या समुद्रफुलाला खेकडय़ाच्या पाठीवरून फुकट प्रवास करायला मिळतो. खेकडय़ाच्या उरलेल्या भक्ष्याचे तुकडे समुद्रफुलाला खायला मिळतात. खेकडा जेव्हा शंख बदलतो तेव्हा तो आपल्या समुद्रफुलाला पुन्हा पाठीवर उचलून घेतो. अशा रीतीने यती खेकडे, समुद्रफूल आणि शंख यांच्यात एक सहजीवनाचे नाते आढळते.

माणसांनी बेपर्वाईने फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, पत्र्याचे डबे यांचादेखील हे खेकडे घर म्हणून वापर करतात, पण यातून सुखरूप बाहेर येता न आल्याने ते मरून जातात. यांचे मरण पर्यावरणासाठी चांगले नाही. कारण हे खेकडे मृत जीवावशेष आणि जैवविघटनशील कचरा खाऊन समुद्रसफाई करत असतात. पर्यायाने समुद्राचे आरोग्य राखले जाते.- प्रा. भूषण भोईर ,मराठी विज्ञान परिषद

Story img Loader