तिसऱ्या (शिवल्या) या शिंपले वर्गातील असून अपृष्ठवंशीय मृदुकाय सागरी जलचर आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ तसेच बंगालच्या किनारपट्टीलगतच्या भागात त्या विपुल प्रमाणात आढळतात. त्यांना इंग्रजीत क्लॅम्स म्हणतात. भारतीय किनारपट्टीवर सापडणाऱ्या व खाण्यायोग्य असणाऱ्या काही प्रजाती आहेत. मेरेट्रिक्स, सुनेत्ता, मर्सिया, पाफिया, काटलेशिया, डॉनक्स अशी काही प्रजातींची नावे आहेत.

तिसऱ्यांचे शरीर दोन शिंपल्यामध्ये बंदिस्त असल्याने त्यांना ‘द्विपूट (बायवाल्व्ह)’ असेही म्हणतात. त्या समुद्रतळाशी चिखलात अथवा वाळूत रुतलेल्या असतात. मांसल पायाच्या साहाय्याने तिसऱ्या चलनवलन करतात. तिसऱ्यांना स्पर्श होताच हा पाय आत ओढून दोन्ही शिंपल्यांच्या आत त्या आपले शरीर बंदिस्त करतात. हे अनुकूलन संरक्षणासाठी असते. तिसऱ्यांमध्ये श्वसन व अन्नग्रहण क्लोमांमार्फत होते. पाणी आत घेण्यासाठी एक व बाहेर टाकण्यासाठी दुसरी नलिका असते. आत आलेल्या पाण्यातून प्राणवायू शोषला जातो व प्लवके तसेच इतर अन्नघटक गाळले जातात. नको असलेले अन्न गाळाच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. तिसऱ्यांच्या पाणी गाळून अन्न प्राशन करण्याच्या क्षमतेचा वापर मत्स्यशेतीमध्ये केला जातो. मत्स्यशेतीच्या तलावातील वापरून बाहेर टाकण्यात येणाऱ्या पाण्यात तिसऱ्यांची पैदास केली जाते. ह्या पाण्यात प्लवकांची वाढ मोठय़ा प्रमाणात झालेली असल्याने तिसऱ्यांना त्यांचे अन्न मिळते व अन्न गाळून घेण्याच्या सवयीमुळे पाणी आपसूक स्वच्छ होऊन प्रदूषणही कमी होते. 

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये

तिसऱ्या समूहात राहतात, पण लहान वयाच्या तिसऱ्या वरच्या तर पूर्ण वाढ झालेल्या मोठय़ा तिसऱ्या खालच्या अशा भिन्न थरांत राहतात. ओहोटीच्या वेळेस स्त्रिया व लहान मुलेही तिसऱ्या हाताने उकरून काढू शकतात. काही ठिकाणी ‘येंड’ नावाचे, लहान अर्धवर्तुळाकार जाळे तिसऱ्या काढण्यासाठी वापरतात.

तिसऱ्यांना जरी सर्व मत्स्यखाद्य प्रेमींची पसंती नसली तरी त्यांच्या उच्च पोषणमूल्यांमुळे त्यांच्या गोठवलेल्या मांसाला व मांसापासून बनवलेले लोणचे, सॉस, अशा मूल्यवर्धित उत्पादनांना परदेशांत चांगली मागणी आहे. तिसऱ्यांच्या कवचांपासून चुना, अलंकार, शोभेच्या वस्तू बनवतात. एके काळी शिंपल्यांपासून शर्टाची बटणे बनवीत असत. तिसऱ्या सागरी प्रदूषण संशोधनात मोठय़ा प्रमाणात वापरल्या जातात. त्यांच्या अन्नग्रहण पद्धतीमुळे स्वत:च्या शरीरात जड धातू, कीटकनाशके व इतर प्रदूषकांची साठवण करतात. त्यामुळे दूषित पाण्यातील तिसऱ्या खाणे टाळावे.

डॉ. सीमा खोत , मराठी विज्ञान परिषद

Story img Loader