मॅथ्यू फॉन्टेन मॉरी शेतकरीपुत्र होते. वडिलांनी छोटय़ा मॅथ्यूला शाळेत न घालता शेतकामाला जुंपले. पण अपघातात झाडावरून पडल्याने ते शेतकामायोग्य राहिले नाहीत, तेव्हा शाळेत घातले. १८२५ मध्ये ते अमेरिकन नौदलात शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू होऊन नंतर मोठे अधिकारी झाले. १८२६ ते १८३० दरम्यान मॉरी यांनी नौदलाच्या कामासाठी पृथ्वी प्रदक्षिणा केली. पुढे पदोन्नतीने ते लेफ्टनंट झाले. समुद्राबद्दल सखोल ज्ञान मिळवल्यामुळे मॉरी ‘आधुनिक समुद्रशास्त्राचे जनक’ ठरले. घोडागाडीच्या अपघातात मॉरी पंगू झाले. लष्कराला आवश्यक शरीरक्षमता नसल्याने संरक्षण दलाने त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा वेगळय़ा प्रकारे उपयोग करून घेतला.

समुद्रासारख्या जलाशयांच्या मापन, चित्रण, आलेखनात मॉरी तज्ज्ञ होते. तक्ते-आराखडे वर्णननोंदी करून संग्रह जपण्याचे काम त्यांच्याकडे होते. जलशास्त्र मापन-साधने, उपकरणे साठवणे, त्यांच्या सुधारित नव्या आवृत्त्या उपलब्ध करून देणे, यासाठी नौदल विभागाची जबाबदारी मॉरींना मिळाली. त्यांनी जगभरच्या शेकडो बोटींच्या कप्तानांना जलप्रवासांचे तपशील विशिष्ट पद्धतीत पाठवण्याची विनंती केली. अशा हजारो नोंदींतून त्यांना जगभरच्या समुद्रांतील नद्या म्हणजे प्रवाह, वारे, समुद्रांवरचे हवामान याबद्दल माहिती कळली. त्यावरून त्यांनी समुद्रातील नवे, कमी अंतराचे मार्ग शोधले. परिणामी युरोप, अमेरिका प्रवासातील ४५ दिवसांचा वेळ, इंधन, पैसे वाचू लागले. समुद्रप्रवास जास्त सुरक्षितही झाला. त्यामुळे जगभरचे समुद्रप्रेमी कृतज्ञतेने त्यांना ‘समुद्रप्रवासातील वाटाडय़ा’ म्हणू लागले.                   

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
six year old daughter of labour Swallowed one rupee coin family seek help for treatment
अल्पवयीन मुलीने नाणे गिळले; गरीब कुटूंबापुढे उपचाराचा खर्च पेलण्याचे आव्हान
Dog Sterilising Centre vasai virar
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले
colors of bjp flag used on trees and tents at various locations build for marathon
सत्ताबदलाचे पडसाद मॅरेथॉनवर; पिवळ्या रंगा ऐवजी भाजपच्या झेंड्याचे रंग

मॉरी यांनी १८५४ पासूनच्या अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलांनी केलेल्या समुद्रांच्या खोलीबाबतच्या नोंदी अभ्यासल्या. त्यांच्या लक्षात आले की, उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाशी एक लांबलचक पर्वतरांग आहे. तिची लांबी मोजण्याचा प्रयत्न केला. उत्तर-दक्षिण अटलांटिक महासागर तळावरील पर्वतरांग सुमारे १६ हजार किलोमीटर लांबीची आहे, तर जगातल्या साऱ्या महासागरांच्या तळपृष्ठावरील पर्वतरांगांची लांबी तब्बल ४०-५० हजार किलोमीटर आहे. झाडाच्या पानांवरील शिरांप्रमाणे महासागरतळावर, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणाऱ्या पर्वतरांगा आहेत, असे समर्पक वर्णन त्यांनी लिहून ठेवले आहे.  

‘फिजिकल जिओग्राफी ऑफ द सी’सारखे ग्रंथ लिहून मॉरी यांनी सागरविज्ञानाच्या सैद्धान्तिक संकल्पनांत भर घातली. नाविक सेवा देणाऱ्या, वापरणाऱ्या सर्वाना दैनंदिन जीवन-व्यवहारांमध्येही त्यांच्या कामाचा लाभ झाला. वंशभेदावर आधारित गुलामगिरीचे छुपे समर्थन ही मात्र मॉरींच्या जीवनातील काळी बाजू होती.

नारायण वाडदेकर,मराठी विज्ञान परिषद

Story img Loader