शेतीविषयक संशोधनातून कमी पाण्यात वाढणारी पिके शोधण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, इक्रीसॅट या संस्थेने कमी पाण्यात सहा ते सात महिन्यांत तयार होणाऱ्या ज्वारीच्या वाणाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांत तो निवडला तर ज्वारीचे हेक्टरी १० टन उत्पादन मिळेल. शिवाय पाण्याच्या वापरात प्रचंड बचत होईल. खरीप हंगामानंतर गव्हाचा पेरा करण्यासाठी भाताचा पेंढा जाळून शेते मोकळी केली जातात, त्यामुळे तिथे जे प्रदुषण होते, ते थांबेल. तसेच ज्वारीचा कडबा दुभत्या जनावरांसाठी चांगला चारा असल्यामुळे दुधाच्या उत्पादन व्यवसायाला चालना मिळेल. ज्वारीची काढणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात कमी पाण्यावर येणारी कडधान्ये किंवा तेलबिया यांचे एक पीक घेऊ शकतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. मात्र हे लाभ प्रत्यक्षात आणायचे असतील, तर आपल्या जेवणात व पर्यायाने शेतात घ्यावयाच्या पिकात ज्वारीला प्राधान्यक्रम दिला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा